भवरलालजी जैन यांना कर्मवीर भाऊराव पाटील सेवा पुरस्कार प्रदान

अंबड, (ता. १८ ऑक्टोबर १५): गेल्या ११६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेतर्फे दिला जाणारा कर्मवीर भाऊराव पाटील सेवा पुरस्कार जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र व जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला. Continue reading “भवरलालजी जैन यांना कर्मवीर भाऊराव पाटील सेवा पुरस्कार प्रदान”

Advertisements

आमचे चिवचिवाटी मित्र

ऑफिसच्या व्हरांड्याला लागूनच कमी उंचीची शोभेची झाडं आहेत. त्यातील दोन तीन झाडांवर सुगरण पक्षांनी आपलं बस्तानही बसवलंय. एका झाडावर या छोट्या पक्षांची दोन तीन कुटुंबे वास्तव्याला आहेत. त्यांचे तीन चार खोपे या झाड्याच्या दाट सावलीत लटकलेले दिसतात. Continue reading “आमचे चिवचिवाटी मित्र”

जैन इरिगेशनचा ‘हॅस्ट्रा’कडून गौरव

जळगांव, दिनांक ऑक्टो. प्रतिनिधी : जगभरातील छोट्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जे उच्च कृषी तंत्रज्ञान आवश्यक आहे, ते पिकनिहाय उपलब्ध करून देण्यासमवेतच त्यांना गरजेनुरूप मार्गदर्शनही देऊन त्यांच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जगभरातील १५ अग्रणी कंपन्यांमध्ये ‘जैन इरिगेशन’चा हॅस्ट्रा अहवालात समावेश करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर व्यावसायिक सल्लागार संस्था म्हणून कार्यरत असलेल्या फ्रान्सच्या ‘हिस्ट्रा’ या संस्थेने तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाने जळगांव येथे भेट देऊन ‘जैन इरिगेशन’च्या विविध उपक्रमांची अभ्यासपाहणी केली होती. कंपनीच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी समाधान व्यक्त केले आहे. Continue reading “जैन इरिगेशनचा ‘हॅस्ट्रा’कडून गौरव”