जैन इरिगेशनचा ‘हॅस्ट्रा’कडून गौरव

जळगांव, दिनांक ऑक्टो. प्रतिनिधी : जगभरातील छोट्या शेतकऱ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जे उच्च कृषी तंत्रज्ञान आवश्यक आहे, ते पिकनिहाय उपलब्ध करून देण्यासमवेतच त्यांना गरजेनुरूप मार्गदर्शनही देऊन त्यांच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या जगभरातील १५ अग्रणी कंपन्यांमध्ये ‘जैन इरिगेशन’चा हॅस्ट्रा अहवालात समावेश करण्यात आला आहे. जागतिक पातळीवर व्यावसायिक सल्लागार संस्था म्हणून कार्यरत असलेल्या फ्रान्सच्या ‘हिस्ट्रा’ या संस्थेने तज्ज्ञांमार्फत अभ्यास करून नुकताच हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या तज्ज्ञांच्या शिष्टमंडळाने जळगांव येथे भेट देऊन ‘जैन इरिगेशन’च्या विविध उपक्रमांची अभ्यासपाहणी केली होती. कंपनीच्या या यशाबद्दल संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांनी समाधान व्यक्त केले आहे.

छोट्या शेतकऱ्यांना सूक्ष्मसिंचनासारखे उच्च कृषी तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले, तर त्या शेतकऱ्याचे उत्पन्न दुपटीने वाढते. ग्राहकांच्या उत्पन्नवाढीबरोबरच हे तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या कंपनीलाही आपल्या व्यवसायात शाश्वत वाढ साध्य करता येते. ग्राहकांच्या उत्पन्नवाढीतून कंपनीच्या विकासाची ही शाश्वत प्रणाली जैन इरिगेशने एक मापदंड म्हणून विकसित केल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदविले आहे. जगभरातील लाखो छोट्या शेतकऱ्यांच्या जीवनात आपल्या व्यवसायामुळे विकासात्मक बदल घडविण्यात अग्रभागी असलेल्या निवडक १५ कंपन्यांच्या कामकाजाबद्दलचा नाविण्यपूर्ण अहवाल जगात अशा प्रकारे प्रथमच प्रसिद्ध होत आहे.

‘जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’ ने छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीचा मार्ग देऊन उत्पादनांच्या किंमती अधिक नफ्याची अपेक्षा न करता मर्यादित ठेवल्या. याद्वारेच कंपनीच्या व्यवसायात शाश्वत वाढ झाली, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अनिश्चित स्वरूपात पडणारा पाऊस, उत्पादनातील अनियमितता अशा विपरित स्थिती असूनही सर्वसामान्य शेतकरी पिकविम्याचा मार्ग आजही अपेक्षेप्रमाणे अवलंबत नाहीत, यावरही या अहवालात चर्चा केली आहे. अहवालाच्या शेवटी कमी आर्थिक गुंतवणुकीतून छोट्या शेतकऱ्यांचे कसे भले होऊ शकते याबद्दल प्रकाशझोत टाकला आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s