भवरलालजी जैन यांना कर्मवीर भाऊराव पाटील सेवा पुरस्कार प्रदान

अंबड, (ता. १८ ऑक्टोबर १५): गेल्या ११६ वर्षांपासून कार्यरत असलेल्या दक्षिण भारत जैन सभेतर्फे दिला जाणारा कर्मवीर भाऊराव पाटील सेवा पुरस्कार जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलाल जैन यांच्या वतीने त्यांचे सुपुत्र व जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी स्वीकारला.

अंबड येथे झालेल्या दक्षिण भारत जैन सभेच्या ९५व्या नैमित्तिक अधिवेशनात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी सदाभाऊ खोत यांना पद्मभूषण क्रांतीवीर नागनाथ अण्णा नाईकवाडी समाजसेवा पुरस्कार, लोकमतचे संपादक चक्रधर दळवी यांना प्रभातकार वा.रा.कोठारी आदर्श पत्रकारिता पुरस्कार व इतर पुरस्कार श्री त्रिलोक शोध संस्थान हस्तीनापूर येथील प.पू. पीठाधिश रविंद्रकिर्तीजी महाराज व खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न रावसाहेब पाटील, निवृत्त न्यायमूर्ती कैलासचंद्र चांदीवाल, अ.भा.तीर्थरक्षा कमिटी अध्यक्ष प्रमोदकुमार कासलीवाल, वस्त्रोद्योग मंडळाचे अध्यक्ष रवींद्र तुपकर आदींची उपस्थिती होती.

‘खेड्यापाड्यातील गोरगरिब अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीरांनी आपले आयुष्य वेचले. अनेकविध जातीधर्मातील विद्यार्थ्यात प्रेमभाव निर्माण करणे, वाईट रुढींना बाजूला सारत त्यांना शाश्वत विकासाचे शिक्षण देणे यासाठी कर्मवीर आग्रही होते. अशा उत्तुंग महान मानवाच्या नावाने असलेला हा पुरस्कार मला आपण देण्याचे ठरविले याबद्दल मी स्वत:ला धन्य समजतो,’ या शब्दात भवरलाल जैन यांनी पुरस्काराबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत, मात्र त्यांच्या मनोगताची ध्वनिफित सभागृहात प्रसारित करण्यात आली.

जैन समाज बांधवांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक दत्तक घेण्याचे आवाहन खा.राजू शेट्टी यांनी केले. त्याला प्रतिसाद देत जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी पन्नास मुलांना शिक्षण देण्यासाठी दत्तक घेण्याची घोषणा केली.

सामाजिक कार्यात जैन समाजाचा मोठा वाटा राहिलेला आहे. सकल जैन समाज जर एकत्र आला, तर व्यापक कार्य यातून निर्माण होईल असा विश्वास श्री त्रिलोक शोध संस्थान हस्तीनापूर येथील प.पू. पीठाधिश रविंद्रकिर्तीजी महाराज यांनी व्यक्त केला. प्रास्ताविक सागर चौगुले यांनी केले, तर आभार फुलचंद जैन यांनी मानले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s