कांताई नेत्रालय, ग्रंथालय आणि उद्यानाचे उद्‌घाटन

जळगाव, दि. १९ (प्रतिनिधी) – ज्या जागेवर आम्हाला आमच्या उद्योगाचा पाया उभारता आला त्या उद्योगाचा विस्तार झाल्यानंतर आता या मुळ जागेवर कांताई नेत्रालय, ग्रंथालय आणि उद्यानाची उपलब्धी समाजासाठी करून देताना कृतज्ञतेसह असंख्य भाव-भावना दाटून येत असल्याचे भावोत्कट उद्गार जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांनी काढले. मागील अनेक वर्षांपासून जळगावमध्ये एका चांगल्या आंतराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा नेत्ररुग्णांना उपलब्ध व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. शिक्षण, कला, क्रीडा, पर्यावरण या समवेत आरोग्याच्या क्षेत्रातील ही उपलब्धी स्वयंपूर्ण व शास्वत होण्यासाठी समाजानेही पुढे यावे असे आवाहन त्यांनी केले. कांताई नेत्रालयाचा लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी डॉ. सुसील मुन्शी, कविवर्य ना. धो. महानोर, महापौर राखीताई सोनवणे, जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल, पीबीएमए एच.व्ही. देसाई आय हॉस्पीटल पुण्याचे कार्यकारी संचालक परवेज बिलीमोरीया, रमेशदादा जैन, प्रो. पु.ग. अभ्यंकर, डॉ. गिरीश राव, कर्नल डॉ. मदन देशपांडे, दिनकर देशमुख, नितीन पाटील, सेवादास दलुभाऊ जैन, डॉ. सुभाष चौधरी, कांतिलाल चोरडिया, गिरधारीलाल ओसवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

या जागेवर येताना मनात असंख्य आठवणींचा कल्लोळ माझ्या मनात दाटून येतो असे सांगत भवरलालजी जैन यांनी येथील प्रयत्नांच्या पराकाष्ठेला उजळणी दिली. १९७८ मध्ये इथे जैन पाईप फॅक्टरी साकारली. सुरवातीला आपण पपेन पावडरचे इथे उत्पादन घेतले. हळूहळू याचा विस्तार होत गेला. या विस्तारातच पहिला हार्टअटॅक याच जागेवर आला. त्यावेळी मला यातून सहीसलामत बाहेर काढणारे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. सुसील मुन्शी व डॉ. सुभाष चौधरी यांच्या उपस्थितीत आज इथे आपण नेत्रालय, ग्रंथालय व उद्यानाचे लोकार्पण करित आहोत याला वेगळे परिमाण असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रत्येक शहरे आता मोठी होत आहेत. गावाच्या गरजा वाढत आहेत. प्रत्येक ठिकाणी शासन पुरेलच असे नाही. ज्या शहरात आपण वाढतो, मोठे होतो त्या शहरासाठी आपणही योगदान दिले पाहिेजे या निर्मळ भावनेतूनच आमच्या सामाजिक कार्याचा हा विस्तार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

माझ्या आयुष्यातील हा सर्वात मोठा गौरवाचा क्षण असल्याचे डॉ. सुसील मुन्शी यांनी सांगून भाऊंसमवेत झालेल्या पहिल्या भेटीच्या आठवणीला उजाळा दिला. काही क्षण आपण डोळे मिटून जर अंधाराला समोर गेलो तेव्हा दृष्टीहिनता काय असू शकते याची आपल्याला जाणीव होते. दृष्टी देणारे हे कार्य म्हणूनच अधिक महत्त्वाचे असून कांताई नेत्रालय यात गौरवपूर्ण कार्य करेल अशा शुभेच्छा ही त्यांनी दिल्या. यावेळी गणपती नेत्रालयाचे डॉ. गिरीश राव यांनी नेत्र चिकित्सा संदर्भात सर्व प्रकारच्या तपासण्या या कांताई नेत्रालयात उपलब्ध असल्याबद्दल समाधान व्यक्त करून भविष्यात संयुक्तपणे अंधत्व निवारणाच्या उपक्रमाला चालना देऊ असे सांगितले. प्रा. पी.जी. अभ्यंकर यांनी ग्रंथालयाच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. जैन पाईप नगर कॉलनीतील रहिवासी नितीन पाटील यांनी संपूर्ण कॉलनीच्यावतीने कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद जोशी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ. भावना जैन यांनी केले. जुईली कलभंडे हिने पसायदान गायले.

——————–

भवरलालजी म्हणजेच कर्म अवताराचा प्रत्यय – जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल.

कांताई उद्यानाचे उद्घाटन जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांच्याहस्ते झाल्यानंतर त्यांनी आपल्या भाषणात जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन व जैन इरिगेशनने केलेल्या सामाजिक कार्याचा गौरव केला. मागील पंधरवाड्यात केंद्रीय जलसंसाधन मंत्री उमा भारती यांनी जळगाव येथील झालेल्या बैठकीतील त्यांचे भवरलालजींबद्दल काढलेले गौरोद्गार उद्घृत केले. या पृथ्वीतलावर अनेक अवतार होऊन गेले. यात कर्म अवतार याचे सुद्धा अनन्य साधारण महत्तव आहे. काही पुरुष हे आपले अलौकीक कार्य करण्यासाठीच पृथ्वीतलावर येतात. जैन इरिगेशन, जैन हिल्स हे त्याचे द्योतक असल्याचे जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांनी पुनश्च सांगून सदिच्छा दिल्या.

फोटो कॅप्शन –  लोकार्पण सोहळ्यात मनोगत व्यक्त करताना भवरलालजी जैन, व्यासपीठावर डाविकडून परवेज बिलीमोरीया, दलुभाऊ जैन, राखीताई सोनवणे, ना.धो. महानोर, डॉ. मुन्शी, रुबल अग्रवाल, रमेशदादा जैन, डॉ. गिरीश राव, कर्नल मदन देशपांडे, डॉ. सुभाष चौधरी व मान्यवर.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s