कृषी क्षेत्राच्या जलसुरक्षेसाठी उच्च तंत्रज्ञानासह एकात्मिक नियोजनावर भर आवश्यक

जळगाव, ता. ८ जानेवारी २०१६- भारतात उपलब्ध असलेल्या जलसंसाधनांचा विचार करता पाण्याच्या काटेकोर नियोजनाच्या दृ्ष्टीने कृषीक्षेत्राच्या विकासासाठी यापुढे अधिक एकात्मिक नियोजनावर भर देणे आवश्यक आहे. या दृष्टीने जैन इरिगेशनने जलबचतीमध्ये ठिबकच्या माध्यमातून जो आयाम निर्माण केला आहेत्याची व्याप्ती अधिकाधिक वाढली पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय जलसंसाधनमंत्री सुश्री उमा भारती यांनी केले. जैन हिल्स येथील उच्च कृषी संशोधन केंद्र, फळप्रक्रिया प्रकल्प, टिश्यूकल्चर बायोलॅब, सोलर प्रकल्प, टिश्यूकल्चर पार्क व प्लास्टिक पार्क येथील सर्व संशोधन प्रकल्पास उमा भारती यांनी भेट देऊन जलबचतीच्या दृष्टीने विविध संशोधनांची माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत जलसंपदामंत्री गिरीश महाजन, खासदार ए.टी. नाना पाटील, जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन यांच्यासह वरिष्ठ शास्त्रज्ञ व सहकारी उपस्थित होते.

भारतातील कृषीक्षेत्राला आवश्यक असलेले पाणी, त्याची उपलब्धता व उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर होण्यामध्ये उच्च कृषी तंत्रज्ञानाची उपयोगिता याबाबत अनिल जैन यांनी सुश्री. उमा भारती यांना माहिती दिली. एकात्मिक विकासात शेतीच्या परिसरात असलेल्या लहानमोठ्या नाल्यावर बांध टाकण्यापासून ते शेताच्या बांधबंदिस्तीद्वारे जे पाणी अडले जाईल, तेच पाणी जमिनीत झिरपेल. या पाण्याचा काटेकोर वापर पीक नियोजनाच्या माध्यमातून अधिकाधिक फायदेशीर कसा करता येईल हे शेतकऱ्यांच्या लक्षात यावे यादृष्टीने जैन हिल्स येथील कृषी संशोधन केंद्र साकारले असल्याचे त्यांनी सांगितले.

बरड जमिनीचा उपयोग फलोत्पादनाच्या दृष्टीने अधिक चांगल्या पद्धतीने व्हावा या दृष्टीकोनातून डोंगराच्या बरड भागावर लावलेल्या पेरूबागेत जाऊन त्यांनी माहिती घेतली. पाण्याचे नियोजन, जमिनीनुसार पीक नियोजन व याला सौर ऊर्जेची जोड हे पाहून सुश्री. उमा भारती यांनी समाधान व्यक्त केले. त्या म्हणाल्या की जैन हिल्ससारखे संशोधन केंद्र देशाच्या कानाकोपऱ्यात उभारले पाहिजेत. यातूनच जलबचतीचा व फायदेशीर शेतीचा शेतकऱ्यांना मंत्र घेता येईल. कोरडवाहू जमिनीच्या नियोजनासमवेत जी पडिक जमीन आहे, तीसुद्धा अशा पद्धतीने देशाच्या कानाकोपऱ्यात उपयोगात येण्यासाठी काय करता येईल याबाबत विचार करू असेही त्यांनी स्पष्ट केले.

फोटो कॅप्शन

  • dsc7890 : केंद्रीय जलसंसाधन मंत्री सुश्री. उमा भारती यांना ठिबकच्या ॲटोमेशन सिस्टिमची माहिती देताना जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, शेजारी खासदार ए.टी. नाना पाटील.
  • dsc7987 : जैन इरिगेशनच्या फळप्रक्रिया विभागाला भेट देऊन फार्मफ्रेशच्या उत्पादनांची माहिती घेताना केंद्रीय जलसंसाधन मंत्री सुश्री उमा भारती, सोबत जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन, खासदार ए.टी. नाना पाटील, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s