केंद्रिय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांची जैन हिल्सला भेट

जळगाव, दि. 6 (प्रतिनिधी)- केंद्रिय कौशल्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज जैन हिल्स येथील गांधी रिसर्च फाउंडेशनच्या गांधी म्युझियम व टिश्युकल्चर लॅबला भेट देऊन मेक इन इंडियाचे वैभव ठरलेल्या या तंत्रज्ञानाची बारकाईने माहिती घेतली.

अनपेक्षीत असलेल्या या भेटीत त्यांनी गांधी म्युझियमची बारकाईने पाहणी करुन माहिती घेतली. “महात्मा गांधींच्या जीवनकार्याची एवढ्या सचित्र पद्धतीने माहितीची मांडणी पाहून मी अक्षरशः भारावलो आहे. आपल्या इथे रिमार्क बुक असेल तर मला माझा रिमार्क नोंदवायचा आहे. ही निर्मिती ज्यांच्या दूरदृष्टितून साकारली आहे त्या भवरलालजी जैन यांना माझा सॅल्युट” या शब्दात   त्यांनी गौरव केला. यावेळी त्यांच्यासमवेत खासदार ए. टी. नाना पाटील, डॉ. राजेंद्र फडके होते. गांधी म्युझियमसमवेत त्यांनी येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राची इत्यंभूत माहिती घेतली.

योगायोगाने 60 विद्यार्थ्यांचा एक वर्ग सुरु होता. या वर्गात सरळ जाऊन त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मी राजीव प्रताप रुडी अशी साधी ओळख करुन देत मुलांना त्यांच्या करिअरविषयी विविध प्रश्न विचारले. मुलांशी मोकळी चर्चा करुन त्यांनी संवादासाठी आपला दूरध्वनी देऊन व्टिटरवर संपर्क करण्यास सांगितले. शेती, शेतकरी, ग्रामविकासातील आवश्यक असलेले युवा वर्ग यांना दिल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणाची त्यांना माहिती देण्यात आली. प्रशिक्षण विभागातील प्रमोद चिकेरुर हे त्यांच्या समवेत होते.

संपूर्ण जगात सर्वात मोठ्या प्रमाणात केळींचे रोपे निर्माण करणारी लॅब म्हणून जैन इरिगेशनकडे पाहिले जाते. टिश्युकल्चर तंत्रज्ञानाला ग्रामीण भागातील शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवून जे कौशल्य शेतकर्‍यांमध्ये रुजविले त्याची माहिती घेऊन रुडी यांनी समाधान व्यक्त केले. टिश्युकल्चर लॅबमधील ज्येष्ठ संशोधक डॉ. अनिल पाटील यांनी केंद्रिय राज्यमंत्री रुडी यांना सविस्तर माहिती दिली. या भेटीत त्यांनी गांधी म्युझियमची पाहणी करुन त्यांनी इथे वापरलेल्या प्रगत तंत्रज्ञानाबद्दल आनंद व्यक्त केला. गांधी रिसर्च फाउंडेशनचे समन्वयक उदय महाजन यांनी त्यांना माहिती दिली.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s