पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्काराची तपपूर्ती

काळानुरुप उच्च आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण्यात येणारी शेती फायदेशीर ठरत आहे. त्याचाच परिपाक म्हणून उत्पादन वाढीसोबत उत्पादनाच्या गुणवत्तेतदेखील अनेक पटींनी वाढ झाल्याची उदाहरणे आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर उमलणारे हास्य, आनंद हेच खऱ्या अर्थाने जैन उद्योग समुहाचे फलित आहे. या कृतार्थ भावनेतून समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून या पुरस्कारांची निर्मिती झाली आहे.

पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार म्हणजे शेतीतला चालता बोलता ज्ञानकोषच होते. जन्मभर त्यांनी शेती आणि शेतकरी या विषयालाच वाहून घेतले होते. अफाट वाचन, तीव्र बुद्धिमत्ता, अलौकिक दूरदृष्टी, अपार कष्टाची तयारी, निस्वार्थवृत्ती अशा गुणांनी युक्त असलेली ही व्यक्ती देशात, महाराष्ट्रात पाणी वाटपाचे, सिंचनाचे नवे तंत्र रुजविण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली. म्हणूनच त्यांच्या पवित्र स्मृतीस आदरांजली वाहण्याची ही आमची कृतिशील ओंजळ म्हणजेच ‘डॉ आप्पासाहेब कृषी उच्च तंत्र पुरस्कार’ !

या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये व सन्मानचिन्ह असे असून तो दोन वर्षातून एकदा दिला जातो. पुरस्कार विजेता निवडीसाठी अनुभवी जाणकार शेतकरी, नामवंत गौरवान्वित कृषितज्ज्ञ, शास्त्रज्ञ, भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनचे स्थायी प्रतिनिधी अशा कृषीक्षेत्रातील तज्ज्ञांची समिती गठीत केली जाते. सूक्ष्म सिंचनपद्धती वापरून यशस्वीपणे विविध पिकांचे अधिक उत्पादन घेणाऱ्या तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञान अंगीकारून शेतीत नवनवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रत्यक्ष बांधावर जाऊन सर्व बाबींची पडताळणी ही समिती करते. त्यानुसार पुरस्काराच्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्याला हा पुरस्कार देऊन गौरवान्वित करण्यात येते.

शेतीला श्रमाची झालर देणाऱ्या भूमीपुत्राच्या ऋणातून मुक्त होणे तसे अवघडच. आपल्या अथक कष्टांना उच्च कृषी तंत्रज्ञानाची जोड देत भरघोस उत्पादन घेणार्‍या शेतकऱ्यांना पाठबळ मिळावे म्हणून जैन उद्योग समूहाच्या भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून पद्मश्री डॉ. आप्पासाहेब पवार आधुनिक कृषी उच्चतंत्र पुरस्कारासोबतच मृद-संधारणासाठी जैन नेंडूगाडू कृषी अभियांत्रिकी पुरस्कार, सूक्ष्म सिंचनासाठी जैन -इन्सिड सूक्ष्म सिंचन पुरस्कार, केळीसाठी जैन -इन्सिड सूक्ष्म सिंचन पुरस्कार, केळी उच्चतंत्र सिंचनासाठी गौराबाई केळी नवतंत्र पुरस्कार, केळीबाबत तामिळनाडू कृषी-विद्यापीठ (टी. एन. ए. यू.) बी. टेक. (फळबाग) पुरस्कार, केळी पिकासाठी आजीवन कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केळी जीवन-ध्येयपूर्ती पुरस्कार, आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करणार्‍या शेतकऱ्यांसाठी कांताई जैन कांदा (पांढरा) नवतंत्र पुरस्कार यशस्वी शेतकऱ्यांना सन २००२ पासून बहाल करण्यात येत आहेत.

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s