पाईप व प्लंबिंग क्षेत्रातील कौशल्य विकासात जैन इरिगेशनचे योगदान मोलाचा- ना. गिरीश महाजन

नाशिक – केवळ व्यवसायिक दृष्टीने नव्हे तर याच्या जोडीला नव्या संकल्पनांना तळागाळात पोहोचविण्यासाठी कौशल्य विकासात जैन इरिगेशनने मोठी भूमिका बजावल्याचे गौरोद्‌गार राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काढले. महाराष्ट्राचे सहकार राज्य मंत्री दादाजी भुसे यांच्या विशेष उपस्थितीत नाशिक येथे जैन इरिगेशनच्या प्लंबिंगच्या क्षेत्राला विस्तारीत करणाऱ्या आनंद ट्रेडर्स या शोरुमच्या शुभारंभ कार्यक्रमात ना. महाजन बोलत होते. यावेळी अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक अशोकजी कटारिया, सम्राट ग्रुपचे सुजॉयजी गुप्ता, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय प्रबंधक सुनीलजी खैरनार, आनंद हार्डवेअरचे रामकिशन पलोड, आयपीएचे मिलींद शेटे, एमपीएचे रवी पाटील व आनंद ट्रेडर्सचे सीताराम आंधळे उपस्थित होते.

दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न केवळ शेतीसाठीच नव्हे तर नागरी पाणी पुरवठ्यासाठीही आव्हानात्मक होत चालला आहे. ज्या काटकसरीतून नगरांना पाणी पुरवठा केला जातो त्या पाणीपुरवठ्यातील सुमारे ३५ टक्के पाणी हे गळतीसारख्या प्रकारांमुळे वाया जाते. ही गळती रोखायची असेल तर पाणी पुरवठ्याच्या पाइपलाईनकडे, इमारतीच्या प्लंबिंगकडे अधिक काटेकोर लक्ष द्यावे लागेल. जैन इरिगेशनने प्लंबिंग आणि पाइपलाईनच्या क्षेत्रात दर्जेदार उत्पादनांसमवेत आता प्लंबिंग व्यवसायात कार्यरत असलेल्या प्लंबर्सच्या कौशल्य विकासासाठी पुढाकार घेतल्याने आणखी पाणीबचत साध्य होईल असा विश्वास जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केला.

कृषि क्षेत्रात जैन इरिगेशनने एक मैलाचा टप्पा गाठला आहे. आमच्या धुळे, नाशिक परिसरात असंख्य शेतकऱ्यांनी कमी पाण्यावर ठिबकच्या सहाय्याने फायदेशीर शेती कशी करायची याचा मूलमंत्र दिला आहे. या शब्दात सहकार राज्य मंत्री दादाजी भुसे यांनी गौरव केला. अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक अशोक कटारिया, सम्राट ग्रुपचे सुजॉयजी रॉय यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करून आनंद ट्रेडर्सला शुभेच्छा दिल्या. प्रारंभी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी सर्वांचे स्वागत करून आपले प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांच्याहस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत आनंद ट्रेडर्सला कंपनीच्या वितरकाचे प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. हे प्रमाणपत्र आनंद ट्रेडर्सचे तानाजी आंधळे यांनी स्वीकारले. या अनोख्या शुभारंभासाठी परिसरातील हजारों शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

फोटो कॅप्शन – आनंद ट्रेडर्सचा शुभारंभ करताना जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार राज्य मंत्री दादा भुसे, अतुलभाऊ जैन, अशोक कटारिया, सुजॉयजी गुप्ता, आमदार सानप व मान्यवर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s