राज्यातील ७ लाख शेतकऱ्यांनी घेतला सौर साक्षरतेचे मंत्र

जैन इरिगेशनची व्यापक मोहिम; २६२५ शेतकऱ्यांचा सौर कृषीपंपासाठी पुढाकार

जळगाव, ता. ३०: भविष्यातील शेती व शेतकऱ्यांना समृद्ध करण्यात सौर कृषी पंपाची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. महाराष्ट्रातील भौगोलिक रचना व अतिदुर्गम भाग लक्षात घेता सर्वत्र वीज पोहोचविणे आजवर शक्य झाले नाही. अशा दुर्गम भागात व याचबरोबर वीजेच्या टंचाईवर मात करण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांना आता सौर ऊर्जा पंपाचे बळ पोचविले जात आहे. यासाठी जैन इरिगेशन सिस्टिम्सतर्फे घेण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी सौर साक्षरता मोहिमेत राज्यातील सुमारे ७ लाख शेतकऱ्यांना सौर साक्षर करण्यात आले असून शेतकऱ्यांनी या मोहिमेला उदंड प्रतिसाद दिला आहे.

गेल्या दोन महिन्यात ही राज्यव्यापी मोहिम राबविण्यात आली. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण विभागातील तालुके आणि मुख्य बाजारपेठांच्या हजारो गावांमध्ये सौर साक्षरतेसंदर्भात प्रचार प्रसार करण्याचे काम जैन इरिगेशनने हाती घेतले आहे. त्याअंतर्गत एक स्वतंत्र अभियंत्यांची टिम नेमण्यात आली आहे. त्यांच्याद्वारे गावोगावी थेट प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. अनेकांना सौर ऊर्जा आणि त्यावर आधारित कृषी पंपाचे महत्त्व समजले असून आजतागायत २६२५ शेतकरी आपल्या शेतात सौर कृषी पंपासाठी पुढे सरसावले आहेत. त्यातील ४८ टक्के शेतकरी एकट्या विदर्भातील आहेत हे विशेष.

राज्यातील कृषीक्षेत्रासाठी सौर पंपाच्या माध्यमातून सूर्यप्रकाशाच्या मुबलक उपलब्धतेचा वापर करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने अभूतपूर्व ५ लाख सोलर कृषी पंप बसवण्याचा निर्धार केला आहे. पहिल्या टप्प्यात दहा हजार शेतकऱ्यांना प्रायोगिक तत्वाने अनुदानावर सौर कृषीपंप पुरविण्यात येणार आहेत. इच्छूक शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी व्हायचे असेल तर त्यांना 18005993000 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करता येईल.

सौर कृषी पंपांचे ऑनलाईन संनियंत्रण आणि देखभाल

राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. च्या वतीने राज्याच्या विविध भागात ८ हजार ९५९ कृषीपंप बसविणे आणि त्यांची देखभाल करण्याचे काम यासाठी जैन इरिगेशन करणार आहे. या कामात सुसूत्रता यावी म्हणून अत्याधुनिक जीपीआरएस प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. प्रत्येक सौर पंपावर जीपीआरएस आधारित रिमोट मॉनिटरींग युनिट (सौर संनियंत्रण प्रणाली) बसविण्यात आली असून त्याची जोडणी थेट महाराष्ट्र राज्याचा ऊर्जा विभाग आणि जैन इरिगेशन कंपनीचा ग्राहक सेवा विभाग यांच्या सर्व्हरला करण्यात आली आहे. या प्रणालीच्या माध्यमातून सौर कृषी पंप चालू आणि बंद करण्याच्या वेळा, तसेच पंपाने दिवसभरात किती पाणी वापरले याची माहिती मिळणे शक्य होणार आहे. याशिवाय पंप नादुरुस्त झाल्यास त्याची माहिती तत्काळ कंपनीच्या ग्राहक सेवा विभागात मिळणार असल्याने पंपांची देखभाल सोपी आणि जलद होणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s