वाफापद्धत, मल्चिंग आणि ठिबकवरील फर्टीगेशन हीच फायदेशीर शेतीची चतु:सूत्री

वाकोद, जळगांव, ता. १३: वाफ्यावर लागवड, पाणी बचत व फर्टीगेशनसाठी ठिबक आणि पिकासाठी मल्चिंग हे चार घटक फायदेशीर शेतीसाठी आजच्या काळात चतु:सूत्री ठरली आहे. बदलत जाणाऱ्या हवामानावर उपाय म्हणून शेतकऱ्यांना या चतु:सूत्रीचा अवलंब केल्याशिवाय पर्याय नाही, असा संदेश कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी अधिकाऱ्यांनी वाकोद येथील कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिला.

महात्मा फुले राहुरी कृषी विदयापीठ; कृषी विभाग आणि गौराई कृषी तंत्र महाविद्यालयाच्या वतीने वाकोद येथे आज (दिनांक १३ जानेवारी २०१६ रोजी) कृषी प्रदर्शन आणि भव्य शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाण्याचे दुर्भिक्ष्य व वातावरणातून निर्माण झालेली आव्हाने याच्याशी सामना करण्याचे बळ शेतकऱ्यांच्या अंगी यावे व त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने प्रगतीशील शेतकरी, शास्त्रज्ञ आणि सामान्य शेतकरी असा थेट संवाद यानिमित्ताने घडवून आणला. वाकोद पंचक्रोशीतील ३१ गावांमधून सुमारे दीड हजार शेतकरी या मार्गदर्शन मेळाव्यात सहभागी झाले होते.

यावेळी शेतकरी मेळाव्यात डॉ. किरण कोकाटे, संचालक, कृषी विस्तार,; महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पी.ए. तुरबतमठ, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी, विवेक सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जळगाव, तालुका कृषी अधिकारी रमेश जाधव, आत्माचे के.डी. महाजन, अनिल गवळी, कृषी विज्ञान केंद्राचे वैभव सूर्यवंशी, गौराई कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य देवेंद्र चौधरी, जैन इरिगेशनचे वरिष्ठ कृषीतज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, के. बी. पाटील, व्ही. बी. पाटील, बी.डी. जडे, गौतम देसर्डा यांनी शेतकऱ्यांना ठिबक सिंचन आणि फर्टीगेशनच्या शास्त्रीय पद्धती, कराराची शेती आणि कृषी मार्केटींग, विविध शासकीय योजना, कापूस लागवड तंत्रज्ञान यासारख्या विविध विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

वाकोद येथील गौराई कृषी तंत्र निकेतनच्या प्रक्षेत्रावर ब्राझिलची मोसंबी, आवळा, बांबू, सागवान, हाय डेन्सिटी पेरू लागवड, आंबा, डाळिंब इत्यादी फलोत्पादनासंदर्भातील प्रायोगिक लागवड करण्यात आली आहे. त्याची प्रत्यक्ष माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाली. प्रदर्शन स्थळी सौर कृषी पंप, सूक्ष्मसिंचन तंत्रज्ञान, बैलचलित आणि ट्रॅक्टरचलित कांदा पेरणी यंत्र यांसारख्या आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि औजारांचे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी ठेवण्यात आले होते. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विनोद राजपूत, डी.एम.बराटे, महेंद्र बाविस्कर यांनी परिश्रम घेतले, तर श्रीपाद जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

फोटोकॅप्शन

वाकोद येथे आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यात कांदा पेरणी यंत्राची माहिती घेताना शेतकरी.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s