सौर कृषि पंपाच्या प्रसारासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन- नितीन गडकरी

जळगाव, ता. २५ जानेवारी २०१६( प्रतिनिधी) – भविष्यातील ऊर्जेची गरज लक्षात घेता शाश्वत शेतीच्या व शेतकऱ्यांच्या स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने सौर कृषी पंपाची उपलब्धी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. उच्च कृषितंत्रज्ञानासह कृषि क्षेत्राला नवी दिशा देणारे हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी जैन इरिगेशन अधिकाधिक योगदान देईल असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. जैन इरिगेशनच्या सौर कृषिपंप गुणवत्ता संशोधन प्रकल्पास व फलोत्पादन संशोधन केंद्रास त्यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत महाराष्ट्राचे कृषि मंत्री एकनाथ खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. जैन इरिगेशनतर्फे कंपनीचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी त्यांचे स्वागत केले. संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांनी त्यांना विविध प्रकल्पांची माहिती दिली.

सौर कृषिपंपाच्या गुणवत्तेत कोणतीही तडजोड न करता हे पंप प्रत्यक्ष शेतीवरही पूर्ण क्षमतेने दीर्घकाल चालावे यावर जैन इरिगिशनने भर दिला आहे. भारतातील नैसर्गिक स्थिती लक्षात घेऊन कृषिक्षेत्राच्या गरजेनुरूप यात शेतकऱ्यांना साध्य करता येतील असे बदलही यात केले आहेत. जैन इरिगेशनच्या एनर्जीपार्क येथील सौर कृषिपंपाच्या टेस्टिंग लॅबला भेट देऊन ना. गडकरी यांनी समाधान व्यक्त केले.

या भेटीत त्यांनी येथील फलोत्पादन प्रात्यक्षिक क्षेत्रावर भेट देऊन अतिघनदाट पेरू व मोसंबी लागवड क्षेत्राची पाहणी केली. जगात प्रथमच जैन इरिगेशनने भारतीय जमिनीत शेतकऱ्यांना भरघोस पेरूचे उत्पादन होईल असे उतिसंवर्धित पेरूची रोपे विकसीत केली आहेत. मोसंबी फळांमध्ये जैन इरिगेशनने संशोधनात मैलाचा टप्पा गाठला आहे. भारतात प्रक्रिया योग्य मोसंबी उत्पादनाच्या दृष्टीने खास ब्राझीलवरून आणलेल्या प्रजातीवर संशोधन करून येथील वातावरणाशी समरस होणारी मोसंबी रोपे विकसीत केली आहेत. या मोसंबी पिकाच्या प्रात्यक्षिक क्षेत्रालाही त्यांनी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.

उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या साक्षरतेत जैन इरिगेशनने भारतातील प्रत्येक जिल्ह्यात पीक निहाय व तेथील वातावरण निहाय शेतीसाठी कृषि तज्ज्ञांमार्फत शिक्षण विस्ताराचे मोठे कार्य निर्माण करून दाखविले आहे. कृषी शिक्षण विस्तारा पाठोपाठ शेतकऱ्यांपर्यंत शाश्वत शेतीच्या दृष्टीने सौर साक्षरतेवरही आता जैन इरिगेशनने भर देऊन राज्यातील सुमारे ७ लाख शेतकऱ्यांना सौर साक्षरतेचा मंत्र दिला आहे. शेतीतील विजेचा प्रश्न लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आता सौर कृषिपंपांसाठी पुढाकार घेतला आहे.  राज्यातील सुमारे ४००० शेतकरी कृषी पंपासाठी पुढे सरसावले आहेत हे विशेष.

फोटो कॅप्शन – जैन इरिगेशनच्या सौर कृषि पंपाच्या प्रात्यक्षिक वाहनाचा शुभारंभ करताना केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी. छायाचित्रात डाविकडून  अमर जैन, आ. संजय सावकारे, आ. उन्मेश पाटील, अशोक जैन, अतुल जैन, कृषिमंत्री एकनाथराव खडसे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भवरलालजी जैन, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आ. शिरीष चौधरी, खा. ए.टी. नाना पाटील आ. चैनसुख संचेती व मान्यवर  …

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s