हार्वर्ड विद्यापीठ आशिया कॉन्फरन्समध्ये जळगावच्या आशुली जैनचा सहभाग

मुंबई – (प्रतिनिधी) – मुंबईच्या सेंट झेवियर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांची नात व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन व अनुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांची कन्या कु. आशुलीसह कॉलेजचे अन्य ७ विद्यार्थी भारताचे प्रतिनिधीत्व करीत अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठात, आशिया कॉन्फरन्समध्ये सहभागी होत आहेत. हार्वर्ड कॉन्फरन्स इन आशिया प्रोग्राम (HCAP-2015) या कॉन्फरन्ससाठी सेंट झेवियर कॉलेज हार्वर्ड येथे सहभाग घेत आहे.

जागतिकीकरणात समता, सहिष्णुता आणि स्वातंत्र्य यांचा सांस्कृतिक व ध्येय धोरण याबाबत आशियामध्ये काय परिणाम झाले याबाबत हे विद्यार्थी आपले सादरीकरण करणार आहेत. आपल्या अभ्यासातील काढलेले निष्कर्ष, त्यावरच्या उपाय योजना वगैरे बाबत ते सविस्तर चर्चा करणार आहेत. हे विद्यार्थी २ आठवडे हार्वर्ड कॅम्पसमध्ये असतील. तद्‌नंतर १२ ते २० मार्च २०१६ दरम्यान हार्वर्डचे विद्यार्थी मुंबईला वरील विषयासंदर्भात कॉन्फरन्ससाठी येतील व मुख्यत्वाने कु. आशुली जैन त्यांना हा विषय अधिक समजावून सांगेल. हार्वर्ड ही एक जगप्रसिद्ध आणि अमेरिकेती ४०० वर्षे जुने अग्रगण्य विद्यापीठ आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s