गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आज भाव सुमनांजली कार्यक्रम

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी) – महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनमार्फत महात्मा गांधीजींचे भावविश्व व विचार सर्वांपर्यंत पोहोचावे या उद्देशाने ‘भाव सुमनांजली’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नादब्रह्मचे उपासक प्रा. संजय पत्की, सौ. अलका चव्हाण आणि सहकारी वृंद प्रार्थना, भजन आणि देशभक्तीपर गिते सादर करतील. हा कार्यक्रम दि. २९ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० ते ८.०० या कालावधीत कांताई सभागृहात होईल.
महात्मा गांधीजींच्या ६८ व्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला गांधी तीर्थतर्फे हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजण्यात आलेला आहे.

सुरांची आराधना ही ईश्वराच्या पुजेचे एक रुप होय. सप्तसुरांच्या माध्यमातून केलेली प्रार्थना ही मनाला आचार, विचार आणि संस्कार देऊन परिवर्तन घडविते. महात्मा गांधीजींना प्रार्थनेला कृतिशिलतेचे प्रेरणास्त्रोत मानले होते त्यांनी प्रार्थनेला अनन्य साधारण महत्त्व दिले होते. या दृष्टीनेच हा भावसुमनांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी केले आहे.
–००–
Bhav sumananjali Karyakram.pdf
Bhav sumananjali Karyakram.pdf.docx

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s