गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे आजपासून ‘महात्मा गांधी जल साक्षरता’ पदयात्रा

जळगाव, दि. (प्रतिनिधी) –येथील गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे ३० जानेवारी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त  ‘महात्मा गांधी जलसाक्षरता पदयात्रा’ काढण्यात येत आहे. जळगाव तालुक्यातील जळके, बिलवाडी, खर्ची खुर्द, दापोरी, खेडी खुर्द, बैजनाथ या गावांमध्ये ही यात्रा ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत विविध उपक्रम राबवेल. या गावांमध्ये यावर्षी जलसाक्षरतेवर भर दिला जाणार असून गावकऱ्यांच्या सहभागातून विविध उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. याच बरोबर आरोग्य तपासणी, रांगोळी स्पर्धा, जलसाक्षरता, सूतकताई, शैक्षणिक मूल्यवर्धन, स्वच्छता आदी लोकोपयोगी उपक्रम राबविले जाणार आहेत. ही पदयात्रा ३० जानेवारीला दुपारी १२ वाजता गांधी तीर्थ येथून प्रस्थान करेल.
स्वतःचे गाव आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, शिक्षण, आरोग्य इ. सांस्कृतिक गरजा स्वप्रयत्नाने भागविणे, ही ग्रामस्वराज्याची प्रमुख उद्दिष्ट्ये साध्य झाली तरच महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील सक्षम भारत आकारास येईल. महात्मा गांधी जलसाक्षरता पदयात्रेतून गावा गावात हा संदेश गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे पोहोचविण्याच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे पदयात्रा काढली जात आहे. या वर्षाच्या पदयात्रेचा विषय हा जल साक्षरतेवर केंद्रीत करण्यात आलेला आहे. जैन इरिगेशनचे तज्ज्ञ ग्रामस्थांना दृकश्राव्य, प्रेझेंटेशन, माहितीपटाच्या माध्यमातून जलसाक्षरतेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या शिवाय पंतप्रधान कौशल्य विकास योजने बाबत देखील पदयात्रेत सांगण्यात येणार आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s