‘मेकींग ऑफ गांधी तीर्थ’चे लोकसभा चॅनलवर प्रसारण

जळगाव, दि. (प्रतिनिधी) –येथील ‘गांधी तीर्थ’ व गांधी म्युझियमची माहिती देणारा माहितीपट “ मेकींग ऑफ गांधीतीर्थ” चे प्रसारण दूरदर्शनच्या लोकसभा चॅनलवर ३० जानेवारी महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी ९.१० मिनिटांनी होत आहे. आगामी काळात ही डॉक्युमेंटरी राष्ट्रीय आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक व निर्माते मकरंद ब्रह्मे यांनी ती तयार केली आहे. ब्रह्मे यांनी दूरदर्शनवर अनेक नावाजलेल्या मालिका, हिंदी-मराठी चित्रपटासाठी निर्माता म्हणून काम केले आहे.

हा माहितीपट बनविण्यापूर्वी ब्रह्मे यांनी गांधी तीर्थला सहज भेट दिली होती. त्यातून त्यांना चित्रपट बनविण्याची प्रेरणा मिळाली. या चित्रपट निर्मितीच्यावेळी त्यांनी गांधी तीर्थचे संस्थापक भवरलालजी जैन, गांधी तीर्थचे अध्यक्ष मा. न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, गांधी तीर्थचे वास्तू रचनाकार, म्युझियमचे रचनाकार यांच्यासह अनेक महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा केली. त्यातून गांधी तीर्थच्या निर्मिती प्रक्रियेवर डॉक्युमेंटरी बनविण्याचे निश्चित झाले. जळगावमधील या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या गांधी म्युझियम व गांधी रिसर्च फाउंडेशनचे कार्य जगभर पोहोचावे या उद्देशाने आपण याची निर्मिती केली असल्याचे श्री. ब्रह्मे यांनी सांगितले.

महात्मा गांधीजींच्या जीवनावरील गांधी तीर्थ हे भारतातील तांत्रिक दृष्ट्या समृद्ध काळाशी सुसंगत असलेले व दृक-श्राव्याचा चपखल उपयोग करून घेतलेले एकमेव संग्रहालय आहे. हे म्युझियम बघताना महात्मा गांधी हे तुमच्या आमच्या सारखे सर्वसामान्य होते, ते पुढे महात्मा कसे बनले याची अनुभूती आल्याशिवाय राहत नाही, असे डॉक्युमेंटरीचे निर्माता मकरंद ब्रह्मे यांनी स्पष्ट केले. महात्मा गांधीजींच्या विचारांचा ठेवा पुढच्या पिढीला त्यांना समजेल अशा पद्धतीने मांडण्यात आलेला आहे; त्यामागे भवरलालजी जैन यांची दूरदृष्टी आणि गांधीजींच्या विचारां प्रती बांधिलकी मूर्त स्वरुपात व्यक्त झाल्याचेही श्री. ब्रह्मे म्हणतात.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s