गांधी तीर्थ येथे गांधीजींना श्रद्धांजली अर्पण; जीआरएफच्या पदयात्रेला प्रारंभ

जळगांव (दिनांक ३० जानेवारी २०१५) : महात्मा गांधीजींनी साध्या गोष्टीतून सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाचा मंत्र जगाला दिला. आधी केले मग सांगितले अशी त्यांची कृती होती. आजच्या अस्थिर जीवनमानात गांधीजींची समाजाला पुन्हा एकदा आवश्यकता आहे, असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ हिंदी साहित्यिक व कवि मंगलेश डबराल यांनी केले. महात्मा गांधीजींच्या पुण्यातीथीनिमित्त गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे प्रार्थना आणि गांधीजींना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी सेवादास दलूभाऊ जैन होते, तर नवी दिल्ली येथील कवि रणजीत वर्मा, आणि प्रसिद्ध लघुपट दिग्दर्शक व कवी देविप्रसाद मिश्र यांची प्रमुख उपस्थिती होती.

श्री. डबराल पुढे म्हणाले, ‘महात्मा गांधी निरंतन परिवर्तनीय होते. त्यामुळेच १९१५ चे त्यांचे विचार आणि १९४७ चे विचार यात बराच फरक दिसून येतो. ते परिवर्तनशील आणि क्रांतीकारी विचारांचे होते. आज समाजात दिवसेंदिवस हिंसा आणि क्रूरता वाढीस लागत चाललेली असल्याने समाजाला पुन्हा एकदा गांधीजींची आवश्यकता असल्याची गरजही श्री डबराल यांनी बोलून दाखविली. यावेळी मनोगत व्यक्त करताना सेवादास दलूभाऊ जैन म्हणाले महात्मा गांधीजींची हत्या झाली तेव्हा सर्व जनतेला दु:ख झाले होते. पण गांधीजींसारखे महापुरुष हे मरत नसतात, तर ते विचारांमुळे अमर राहतात. त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहेत. यावेळी नवी दिल्ली येथील कवी रणजीत वर्मा आणि देविप्रसाद मिश्र यांनीही मनोगत व्यक्त केले. अश्विन झाला यांनी गांधीजींच्या निवडक जीवनप्रसंगाचे आणि गांधीतत्वाचे कथन केले.

सकाळी दहा वाजून ५९ मिनिटांनी गांधीजींना श्रद्धांजली

नवी दिल्ली येथे ३० जानेवारी १९४८ रोजी सकाळच्या प्रार्थनेनंतर महात्मा गांधीजींची हत्या झाली. त्याच वेळेस संपूर्ण जगभरातील लाखो लोकांनी आज दोन मिनिटे मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यात गांधी तीर्थ येथील गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहकारी आणि जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांचाही समावेश होता. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते सुताचा हार अर्पण करून महात्मा गांधीजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच सामुदायिकरित्या सर्वधर्म प्रार्थना आणि गांधीजींचे भजन म्हणण्यात आले.

महात्मा गांधी जलसाक्षरता पदयात्रेला प्रारंभ

महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘महात्मा गांधी जलसाक्षरता पदयात्रे’ला प्रारंभ करण्यात आला. गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांबरोबरच जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे मोठ्या संख्येने या पदयात्रेत सहभाग नोंदविला. गांधी तीर्थ पासून शिरसोली रस्त्यापर्यंत जैन इरिगेशनचे सहकारी पदयात्रेत सहभागी झाले होते. सेवादास दलूभाऊ जैन यांनी पदयात्रेला हिरवी झेंडी दाखविली.

जळगाव तालुक्यातील जळके, बिलवाडी, खर्ची खुर्द, दापोरी, खेडी खुर्द, बैजनाथ या गावांमध्ये ही यात्रा ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी पर्यंत विविध उपक्रम राबवेल. या गावांमध्ये यावर्षी जलसाक्षरतेवर भर दिला जाणार असून गावकऱ्यांच्या सहभागातून विविध उपक्रम निश्चित करण्यात आले आहेत. या कालावधीत अनेक गावांमध्ये आवश्यकतेप्रमाणे जलसंधारणाचे कामही करण्यात येणार आहे.

फोटो कॅप्शन :

महात्मा गांधीजींच्या पुण्यतीथी निमित्त गांधी तीर्थ, जैन हिल्स येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्रसिद्ध हिंदी कवी मंगलेश डबराल, कवि रणजीत वर्मा, श्री सेवादास दलूभाऊ जैन आणि सहकारी.

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s