वाकोदचा वटवृक्ष अनंताच्या प्रवासाला !

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, (प्रतिनिधी) ता. २७ : – ठिबक सिंचनाच्या माध्यमातून लाखों शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धीची पहाट फुलविणारे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री, डॉ. भवरलालजी जैन यांच्यावर आज दुपारी जैन हिल्स येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शेतकरी व मानवतेसाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या या द्रष्ट्या व्यक्तिमत्वाला अखेरचा निरोप देताना शेतकऱ्यांना अश्रूंचे बांध आवरता आले नाहीत. ज्या भूमीत त्यांनी आयुष्यभर शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञान विकसित करण्यावर, संशोधनावर भर दिला, त्याच शेतीत उभारण्यात आलेल्या विशेष चौथऱ्यावर त्यांचे ज्येष्ठ सुपूत्र अशोक जैन यांच्यासह अनिल, अजित आणि अतुल या चारही सुपुत्रांनी अग्नि दिला. Continue reading “वाकोदचा वटवृक्ष अनंताच्या प्रवासाला !”

Advertisements

ग्रंथातील विचारधन शेवटपर्यंत प्रवासातील सोबतीला

आनंद प्रवचन,जैनिझम, यासारख्या ग्रंथाचे स्व. भवरलालजी जैन यांचे सुरू होते वाचन

जळगाव, २७ :विचारवंत आणि साहित्यिक असलेला एकमेव उद्योजक अशी भवरलालजी जैन यांची ओळख होती. आजवर त्यांनी विविध विषयांवरची हजारो पुस्तके वाचली होती. मुंबईला रुग्णालयात दाखल होण्याच्या क्षणापर्यंत त्यांचे वाचन सुरू होते. आचार्य श्री आनंद ऋषी लिखित ‘आनंद प्रवचन’ हे हिंदी पुस्तक, रिकाडो सिमलर मेवरिक लिखित ‘ द सक्सेस स्टोरी बिहाईंड द वर्ल्डस्‌ मोस्ट अनयुज्वल वर्क प्लेसेस’, हे इंग्रजी पुस्तक तसेच जैनाचार्य ग्यानचंद्रजी लिखित ‘जैनिझम्‌- द युनिव्हर्सल फिलॉसॉफी’ या पुस्तकांचे ते वाचन करत होते. काही पुस्तकांत तर वाचनाच्या खुणाही त्यांनी करून ठेवल्या होत्या. त्यांच्या दालनातील टेबलावर त्यांनी व्यवस्थित रचलेली ही पुस्तके पाहणाऱ्याला अनामिक हुरहूर लावत होती. Continue reading “ग्रंथातील विचारधन शेवटपर्यंत प्रवासातील सोबतीला”

अन् भवरलालजी आजही मॉर्निंग वॉकला…

Press Note

जळगाव, (प्रतिनिधी) – प्रत्येक व्यक्तिचा आयुष्यात बांधुन घेतलेला एक शिरस्ता असतो. ती व्यक्ती जर शिस्तप्रिय असेल तर मोसम कुठलाही असो, त्यात बदल होत नाहीत. गेली चार दशके ज्या परिसराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्या जैन हिल्स व व्हॅली परिसरात भवरलालजी जैन यांचा मॉर्निंग वॉक हा नित्याचा ठरलेला होता. ऋतु कुठलेही असो, उनं पाऊसाची पर्वा न करता या साधकाची पाऊले रोज सकाळी 6.00 वाजता प्रत्येक कोपरान् कोपरा झाडांचा वेध घेत जैन हिल्समध्ये मुक्तपणे फिरायची. या मॉर्निंग वॉकमध्ये विषयांची बांधणीही झाडांच्या बोली भोवतीच ठरलेली असायची. Continue reading “अन् भवरलालजी आजही मॉर्निंग वॉकला…”

स्व. भवरलालजी जैन यांचे हजारोंनी घेतले अंतिम दर्शन

शनिवारी दुपारी 3.00 वाजता जैन हिल्स येथेशासकीय इतमामात अंत्यसंस्कार

जळगाव, दि 26. (प्रतिनिधी) – जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन यांना शेवटचे डोळे भरून पाहण्यासाठी जैन इरिगेशनचे सहकारी, शेतकरी आणि अनेक मान्यवर व्यक्तींनी अंतिम दर्शन घेत अश्रुंना वाट मोकळी केली. 26 रोजी सकाळी 8 वाजेपासून आबाल वृद्ध, स्त्री-पुरुषांनी अंतिम दर्शन घेतले. Continue reading “स्व. भवरलालजी जैन यांचे हजारोंनी घेतले अंतिम दर्शन”