केळी घडांचे वजन दुप्पटीने वाढविणे शक्य

भडगाव, दि. ५ (प्रतिनिधी) – टिश्युकल्चर केळीची लागवड करून ठिबक सिंचनने पाणी, खते, अन्नद्रव्ये यांचे व्यवस्थापन केल्यास केळी घडांचे वजन दुप्पटीने वाढविणे शक्य होते. त्यामुळे निर्यातक्षम केळी उत्पादन होईलच परंतु बाजार पेठेमध्ये केळीला चांगली मागणी येईल, असा महत्त्वपूर्ण सल्ला केळी तज्ज्ञ के.बी. पाटील यांनी दिला. जैन इरिगेशन व भडगाव तालुक्यातील वितरकांच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी नारायण मंगल कार्यालयात ‘कृषि प्रदर्शन आणि शेतकरी मेळाव्याचे’ आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय कृषि अधिकारी एन. व्ही. देशमुख, भडगाव तालुका कृषि अधिकारी डी. आर. ठाकूर उपस्थित होते.

के.बी. पाटील मार्गदर्शनात पुढे म्हणाले की, पुढील स्पर्धेच्या काळात केळीच्या घडांचे १५ किलोवरून ३० किलो पर्यंत सरासरी वजन वाढविणे व सरासरी झाडांची कापणी ६० टक्क्यांवरून ९५ टक्के वाढविणे गरजेचे आहे. खत आणि अन्नद्रव्याचे नियोजन करून स्पर्धात्मक परिस्थितीत कमी क्षेत्रात व कमी पाण्यावर शाश्वत केळीची शेती करणे शक्य आहे. भडगाव, कजगांव परिसरातील सुपिक जमीन केळीसाठी योग्य आहे. पूर्वीच्या काळी या परिसरातील केळी चढ्या भावाने विकली जायची. कमी उत्पादकतेमुळे येथील शेतकऱ्यांना केळीकडे पाठ केली होती. टिश्युकल्चर केळी व अचूक अन्न घटकांच्या व्यवस्थापनाने निर्यातक्षम गुणवत्ता केळी शक्य आहे असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

उन्हाळ्यात व हिवाळ्यात केळीचे व्यवस्थापन व्यवस्थित होत नाही. हिवाळ्यात केळीस अन्न घटक घेण्यासाठी थंड तापमानामुळे अडथळा निर्माण होतो. चरका रोगाला शेतकरी करपा समजतात, या रोगात झाडाची पाने पिवळी पडून अकाली सूकतात. त्यामुळे केळी उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. यासाठी शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन त्यांनी केले. येथील या मेळाव्यात शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञान सूक्ष्मसिंचन, फर्टिगेशन, पॉलीहाउस, शेडनेटमधील नियंत्रीत शेती, कांदा टिश्युकल्चर केळी, डाळींब, जैन सौर पंपाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले. यासाठी बी.डी. जडे, केळी तज्ज्ञ के.बी. पाटील, संजय पाटोळे, उमेश नावंदर या तज्ज्ञांनी शेतकऱ्यांशी सुसंवाद साधला. या कृषि प्रदर्शनात जैन इरिगेशनच्या विविध उत्पादनांचे स्टॉल मांडण्यात आले होते. त्याला शेकडो शेतकऱ्यांनी भेट दिली.

फोटो कॅप्शन – भडगाव येथील शेतकरी मेळाव्याचे उद्‌घाटन प्रसंगी उपविभागीय कृषि अधिकारी, एन. व्ही. देशमुख, तालुका कृषि अधिकारी डी.आर. ठाकूर, जैन इरिगेशनचे सहकारी डी.बी. चौधरी, बी.डी. जडे, के.बी. पाटील संजय पाटोळे आदी मान्यवर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s