गांधी पदयात्रेत ग्रामसुधारणेसाठी गावकऱ्यांचा पुढाकार

खर्ची खुर्द. दि. ३ (प्रतिनिधी) – कोणत्याही खेड्याच्या विकासाची दिशा ही त्या गावातील लोकसहभागावर अवलंबून असते. लोकसहभागासमवेत जर त्या गावातील लहान मुले जुळल्या गेली तर गाव विकासाच्या उंबरठ्यावर यायला वेळ लागणार नाही असे प्रतिपादन गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलुभाऊ जैन यांनी केले.

गांधी पुण्यतिथी निमित्त गांधी रिसर्च फाउंडेशनव्दारा काढण्यात आलेल्या पदयात्रेचा दोन दिवसीय मुक्काम एरंडोल तालुक्यातील खर्ची या गावी आहे. आज या गावात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी खर्चीचे सरपंच राजेंद्र पाटील, राजू महाजन व गांवकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्राम विकासात स्वच्छतेची भूमिका अधिक महत्त्वाची असते. मानवी वर्तनुकीशी व स्वभावाशी याचा सरळ संबंध जोडलेला असतो. अनेकांची ‘कळते पण वळत नाही’ अशी अवस्था असल्याने त्यांना साक्षर करण्याची गरज आहे. ही वर्तनुकीशी संबंधीत जनसाक्षरतेची चळवळ गावातील लहान मुले अधिक सक्षमतेने पार पाडू शकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लहान मुलांनीही आपल्या पालकांजवळ असलेल्या वाईट सवयी सोडण्यासाठी आग्रह धरला पाहिजे असेही ते म्हणाले.

या पदयात्रेतील सहभागी सदस्यांनी सर्व प्रथम जळके, बिलवाडी या गावात जलसंधारण, स्वच्छता व लहान मुलांच्या मौखिक आरोग्याबद्दल जनजागृतीसह विविध उपक्रम राबविले. खर्ची गावातही ग्राम स्वच्छतेसह महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, ग्रामस्वच्छता शालेय विद्यार्थ्यांसाठी मूल्य संवर्धन आदी कार्यक्रम घेण्यात आले.

फोटो कॅप्शन खर्ची येथील ग्रामस्थांशी सुसंवाद साधताना सेवादास दलुभाऊ जैन

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s