गावच्या श्रमदानावरच जलसुरक्षितता शक्य..!

जळगाव, दि. 5 – सबंध भारतातील ग्रामीण भारताचा चेहरा हा जवळपास सारखाच असून आजही खेड्यातील लोक पुढे सरसावण्यापेक्षा कुणीतरी येऊन आपल्या गावाचा विकास करेल या भ्रमात आहेत. आपल्या गावाचा विकास हा गावातील लोकांच्याच हातात आहे हे सर्वांनी आता लक्षात घेतले पाहिजे असे स्पष्ट प्रतिपादन गुजरात विद्यापिठाचे माजी कुलगुरु सुदर्शन अय्यंगार यांनी काढले. गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्यावतीने काढण्यात आलेल्या जलसंधारण जनजागृती पदयात्रेच्या खर्ची येथील ग्रामसभेत ते बोलत होते. यावेळी डॉ. जॉन चेल्लादुराई, विनोद रापतवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कधी काळी खेडे जेव्हा वसले तेव्हा आपल्या पूर्वजांनी तेव्हाच्या सरकारला गावासाठी पाणी देता का किंवा इतर सुविधाबाबत विचारणा केली नव्हती. त्याकाळी गावातल्या गरजा या गावातच भागल्या जायच्या. ही स्वयंपूर्णता निदान  पाण्यापुरती आपण आणली पाहिजे असे अय्यंगार यांनी सांगून शिवारातले पाणी शिवारात व गावातले पाणी गावात रोकण्यासाठी  सज्ज झाले पाहिजे असे स्पष्ट केले.  ज्या गावात चांगली झाडी आहेत, अधिक वनसंपदा आहे अशा गावात पावसाचे पाणी जमिनित अधिक मुरते. धावत्या पाण्याला रोखण्यासाठी गावकर्‍यांनी स्वतः फावडे, कुदळ हाती घेऊन जलसंधारणाच्या कामासाठी पुढे सरसावले पाहिजे असे आवाहन केले.

या पदयात्रेत गांधी तीर्थचे पंधरा सहकारी सहभागी झाले असून एका गावात ही पदयात्रा दोन दिवस थांबून ग्रामस्वच्छता, गावातील मुलांसाठी विविध खेळ, महिलांच्या सहभागासाठी रांगोळी स्पर्धा, मुलांची दंत व मौखिक चिकित्सा आदी उपक्रम राबविले जात आहेत.

फोटो कॅप्शन : खर्ची येथे ग्रामसभेत मार्गदर्शन करताना माजी कुलगुरू श्री.अय्यंगार

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s