तज्ज्ञांच्या संवादातून शेतकऱ्यांना मिळाला आत्मविश्वास

एरंडोल, ता ६ : राज्यातील अवर्षग्रस्त भागातील शेतकऱ्यांनी आपले मनोबल न खालावू देता जेवढा कालावधी त्याच्याजवळ पाणी उपलब्ध आहे, त्याचे गणित लक्षात घेऊन पीक पद्धतीत बदल केल्यास यातूनच मोठा दिलासा त्यांना मिळू शकेल असा विश्वास जैन इरिगेशनचे कृषी तज्ज्ञ के.बी. पाटील यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांच्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिक शेती उत्पादन प्रक्रियेची माहिती पोहोचावी यासाठी एरंडोल येथे झालेल्या शेतकरी संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी तालुका कृषी अधिकारी आर. एच. पाटील, शेडनेट तज्ज्ञ उमेश नावंदर, कृषी तज्ज्ञ बी. डी. जडे या मान्यवरांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

श्री. पाटील पुढे म्हणाले,‘ एरंडोल तालुक्यातील शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणाऱ्या डाळिंबासारख्या पिकाकडे वळावे.’ राज्यातील अधिकांश शेती कोरडवाहू आहे. ज्या शेतकऱ्यांकडे किमान पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांनी शेडनेट सारख्या शेतीकडे वळल्यास उन्हाळ्यातही अत्यंत कमी पाण्यात काकडी, सिमला मिरची, व इतर भाजीपाल्याच्या पिकातून चांगला आर्थिक फायदा करून घेता येईल असे शेडनेट व पॉलिहाऊस शेतीचे तज्ज्ञ उमेश नावंदर यांनी सांगितले. यावेळी प्रगतीशील शेतकरी व माजी आमदार महेंद्रसिंग पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

जैन इरिगेशनच्या पुढाकाराने वाकोदपासून सुरू झालेल्या कृषी प्रबोधनाच्या या उपक्रमांतर्गत आतापर्यंत तीन गावांमधील हजारो शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळाले आहे. याच उपक्रमाच्या पुढच्या टप्प्यात आज एरंडोल येथे शेतकरी संवादाचा कार्यक्रम झाला.

फोटो कॅप्शन : एरंडोल येथील शेतकरी संवाद कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना प्रगतीशील शेतकरी महेंद्रसिंग पाटील व व्यासपीठावरील मान्यवर.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s