किरकोळ बाजारपेठेत जैन फूड डिव्हिजनचे पदार्पण

‍जळगाव, ता. ८ : शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्रक्रिया करून त्यांना बाजारभावाचे स्थैर्य देणारी जैन इरिगेशन कंपनी आता रिटेल बाजारपेठेत ग्राहकांसाठी लवकरच प्रक्रियायुक्त शेतमाल उत्पादनांची मालिका सादर करणार आहे. या मालिकेतील पहिले उत्पादन असलेले ‘जैन फार्मफ्रेश आमरस’ मुंबईच्या बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाला असून येत्या ६ महिन्यांत उर्वरित महाराष्ट्रात तसेच गुजरात, मध्य प्रदेशसह पश्चिमी व उत्तेकडील राज्यांतील किरकोळ ग्राहकांना उपलब्ध होणार आहे.

सध्या ‘जैन फार्म फ्रेश आमरस’ मुंबईतील हायपरसिटी व सहकारी भांडार स्टोअर्स मध्ये उपलब्ध असून येत्या दोन महिन्यांत संपूर्ण बृहन्मुंबईभर हे उत्पादन उपलब्ध होणे अपेक्षित आहे.

‘आमरस’ हे १००% नैसर्गिक उत्पादन आहे ज्यात कृत्रिम रंग, स्वाद किंवा टिकावूपणा वाढवणारी रसायनं (प्रिझर्वेटिव्ह) न घातलेला, निव्वळ गोडपणा वाढवलेला आंब्याचा गोठवलेला गर आहे. हापूस आणि केसर अशा दोन प्रकारांत वर्षभर याचा आस्वाद घेता येईल. हे उत्पादन A व C जीवनसत्वांनी समृद्ध असून उणे १८ डिग्री सेल्सियस तापमानात साठवण केल्यास २ वर्षांपर्यंत दुकानातील शेल्फवर टिकू शकते. १ किलो व ५०० ग्रॅम अशा दोन आकारांच्या खाद्य श्रेणीच्या व पुन्हा वापरता येण्याजोग्या डब्यांत आमरस उपलब्ध आहे. या उत्पादनाला उच्च दर्जा व प्रमाणासाठी बीआरसी, आयएसओ : १४०००, ओहसास :१८०००, हलाल आणि कोशर यांसारखे आंतरराष्ट्रीय मानांकने आणि प्रमाणपत्रे प्राप्त झालेली आहे.

अलिकडेच जैन फार्म फ्रेश फूड लि. (JFFFL) नावाने उपकंपनी (सब्सिडरी) म्हणून नावारुपाला आलेला जैन इरिगेशन्सचा हा खाद्य विभाग १९९४ पासूनच आंबा, केळी, पेरू, स्ट्रॉबेरी इत्यादि फळांचा गर काढणे आणि कांदा, लसूण, जिंजर अशा भाज्यांचे निर्जलिकरण या खाद्यप्रक्रिया व्यवसायात कार्यरत होता. कोका-कोला, फ्रिटो-ले, नेस्टले आणि युनिलिव्हर अशा जागतिक ग्राहकांना ‘बी टू बी’ पद्धतीने ही उत्पादने पुरवणारी जैन इरिगेशन जगातली या अग्रगण्य कंपनी ठरली आहे. कंपनीचा किरकोळ (रिटेल) मार्केटमधील हा प्रवेश हे भारतातल्या वेगाने वाढणार्‍या प्रक्रियाकृत खाद्य व्यवसायात मूल्यनिर्मिती करण्याच्या संधीच्या दिशेने उचललेले एक छोटेसे पण लक्षणीय पाऊल आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s