जैन इरिगेशनतर्फे पाचोरा येथे शेतकरी मेळावा

दि. ८ (प्रतिनिधी) – कमीत कमी पाण्यात शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी, ठिबक सिंचन, टिश्युकल्चर, खते व पाण्याचे सुयोग्य नियोजन करून उच्च कृषि तंत्रज्ञानाची कास धरली पाहिजे. चर्चासत्र व शेतकरी मेळाव्याच्या माध्यमातून असे उच्च कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते ही अत्यंत आनंदाची बाब आहे असे विचार पाचोरा तालुका कृषि अधिकारी डी.आर. ठाकूर यांनी व्यक्त केले. जैन इरिगेशन, पाचोरा तालुक्यातील वितरकांच्या संयुक्त विद्यमाने आशीर्वाद मंगल कार्यालयात शेतकरी मेळावा, चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते त्यात ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे वरिष्ठ अधिकारी डी.बी. चौधरी अध्यक्षस्थानी होते. यावेळी व्यासपीठावर रमेश बाफना, बाबुशेठ संघवी, रघुनाथ कुमावत, राजू शिंदाडकर, कल्पेश संघवी, विजय वाणी आणि आत्माचे सदस्य नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

सध्या शेती व शेतकऱ्यांमध्ये उदासिनता निर्माण झाली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना व्हावी व कमीत कमी खर्चात आधुनिक तंत्राचा उपयोग करून शाश्वत शेती कशी होईल या प्रामाणिक उद्देशाने मेळाव्याचे आयोजन करण्यात येते असे जळगाव धुळे विभागाचे व्यवस्थापक डी.एम. बऱ्हाटे यांनी प्रास्ताविकात सांगितले.

केळी तज्ज्ञ के.बी. पाटील यांनी गुणवत्तापूर्ण, वजनदार घड असलेल्या केळीचे उत्पादन कसे घ्यावे याबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. पारंपरिक पद्धतीत केळी जून ते ऑगस्टमध्ये करण्यात येते व ऐन फलधारणात उन्हाळा, पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागते परंतु हीच केळी फेब्रुवारीत लावली, पाणी, खते, अन्नद्रव्ये, काढणी या सगळ्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने पालन केले तर कमी पाण्यात देखील निर्यात योग्य उत्तम गुणवत्तेची केळी पाचोरा परिसरातील शेतकरी पिकवू शकतात याबाबत सांगितले. कृषितज्ज्ञ बी.डी. जडे यांनी कापसातील ठिबक सिंचन पद्धती याबाबत मार्गदर्शन केले.

संजय पाटोळे यांनी स्वयंचलीत ठिबक सिंचनाचे व्यवस्थापन, घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. उमेश नावंदर यांनी ग्रीन हाऊस तंत्रज्ञानाचा अवलंब करून केवळ १० गुंठ्यांमध्ये भाजीपाला, फुलशेती, विदेशी भाज्यांचे उत्पादन घेऊन आपल्या उत्पादनात वाढ करून घेऊ शकतात. अनुप आगिवाल यांनी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या कृषि पंपाबाबत सविस्तर माहिती दिली. करार शेती पांढरा कांदा याबाबत सोळुंखे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांनी तज्ज्ञांना प्रश्न विचारून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले. पाचोरा पंचक्रोशितील शेकडो शेतकरी यावेळी उपस्थित होते. मेळाव्याच्या ठिकाणी विविध उत्पादनांचे स्टॉल तसेच सौर कृषि पंपाचे प्रात्यक्षिक मांडण्यात आले होते.

फोटो कॅप्शन – पाचोरा येथे शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन करताना पाचोरा तालुका कृषि अधिकारी डी.आर. ठाकूर, के.बी. पाटील, बी.डी. जडे, संजय पाटोळे, प्रगतशील शेतकरी ठाकूर, बाबुशेठ संघवी व मान्यवर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s