गावांमध्ये पोहोचविला स्वच्छता व जलसाक्षरतेचा संदेश

जळगाव, दि. 10 (प्रतिनिधी)- लोक सहभागाच्या माध्यमातून प्रत्येक गावकऱ्याने आपल्या गावातील सुधारणेसाठी पुढाकार घ्यावा व सामूहिक श्रमदानातून गावात विविध कामांना सुरवात व्हावी या उद्देशाने गांधी रिसर्च फाउंडेशनने हाती घेतलेल्या जलसाक्षरता पदयात्रेचा समारोप काल ९ रोजी जळगाव जवळील वैजनाथ या गावी झाला. ३० जानेवारी, महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी पासून गांधीतीर्थ येथून सुरु झालेली ही पदयात्रेने जळगाव तालुक्यातील जळके, बिलवाडी, खर्ची खुर्द, दापोरी, खेडी खुर्द, बैजनाथ या गावांमध्ये ग्रामस्वच्छतेसह लहान मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले. लहान मुलांची दंतचिकित्सा, रांगोळी स्पर्धा, जलसाक्षरता, सूतकताई, शैक्षणिक मूल्यवर्धन, स्वच्छता आदी उपक्रमांना गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन पुढाकार घेतला.

प्रत्येक खेडेगावात पूर्वीच्या ग्रामसमृद्धीच्या खानाखुणा व्यवस्थित असल्या तरी कचरा व अस्वच्छतेमुळे संपूर्ण गावाचे गावपणं एका बकाल अवस्थेत झाले आहे. गावकऱ्यांना या वस्तुस्थितीची जाणीव करून देत गांधीतीर्थच्या सहकाऱ्यांनी स्वतः गाव स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला. यात गावकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग देऊन गांव स्वच्छतेची मोहीम यशस्वी करून दाखविली.

गावात उपलब्ध असलेल्या लहान मोठ्या नाल्याच्या खोलीकरणासाठी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन काम करण्याची तयारी दर्शविली आहे. जळके गावात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सहकार्याने हे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ही पदयात्रा यशस्वी करण्यासाठी गांधी रिसर्च फाउंडेशनचे सहकारी उदय महाजन, सुधीर पाटील, सी. डी.पाटील, बिरेंद्र सोनी, अशोक सोनार, अश्विन झाला, सुरेश पाटील, विश्वजीत पाटील, नरेंद्र चौधरी, राहूल लांबोले, सागर चौधरी, राजेंद्र जाधव, श्रीराम खलसे, अजय क्षीरसागर, गिरीश जगताप, डॉ. संतोष देशमुख, प्रमोद चिकेरूर आदी सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली.

फोटो कॅप्शन – महात्मा गांधी पदयात्रेत बिलवाडी येथे ग्राम स्वच्छता मोहिमे अंतर्गत गटारांची सफाई करताना गांधी तीर्थचे सहकारी व ग्रामस्थ.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s