पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

जळगाव, १3 : शेतमाल प्रक्रियेच्या क्षेत्रात १९९४ पासून कार्यरत राहून रोजगारनिर्मितीबरोबरच शेतकऱ्यांच्या आयुष्यात समृद्धी आणणारी जैन इरिगेशन कंपनी आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी संत्रा प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी धोरणांपैकी एक असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहात देशाचे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत यासंदर्भात शनिवारी (ता. १३) मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. जैन इरिगेशन, हिंदुस्थान कोका कोला व महाराष्ट्र सरकारचे कृषी आणि विपणन खाते यांच्या सहकार्यातून विदर्भात संत्रारस प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

यावेळी महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषीमंत्री एकनाथराव खडसे, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल जैन, कोकाकोलाचे अध्यक्ष श्री. इरिल फिनान आणि सीईओ श्रीकृष्ण कुमार उपस्थित होते. मुंबईत सुरू असलेल्या मेक इंडिया सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी पहिला सामंजस्य करार करण्याचा बहुमान जैन इरिगेशनला या निमित्ताने प्राप्त झाला. विदर्भात उभारण्यात येणाऱ्या संत्रा प्रक्रिया आणि बाटलीबंद संत्रा रसाच्या या प्रकल्पाच्या माध्यमातून २० हजार संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच ५००च्यावर रोजगारनिर्मिती होणार आहे. या करारानुसार संत्र्यासाठीच्या ‘उन्नती’ या प्रकल्पातून संत्रा उत्पादकांना अधिक किंमत मिळू शकणार आहे.

या प्रकल्पा अंतर्गत संत्राची अत्याधुनिक रोपवाटीका उभारण्याबरोबरच अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांचे प्रात्यक्षिक उभारले जाईल. जेणे करून शेतकऱ्यांना त्याची प्रेरणा मिळेल. हा प्रकल्प म्हणजे जैन इरिगेशनच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या कृतज्ञ भावनेचे पुढचे पाऊल ठरणार आहे. या प्रकल्पामुळे शासनाच्या ‘नोगा’ ब्रॅण्डचे पुनरुज्जीवन होण्यास मदत मिळणार आहे.

या संदर्भात जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन म्हणाले की, ‘संत्रा प्रक्रियेच्या माध्यमातून हिंदुस्थान कोकाकोला कंपनीशी असलेली आमची भागीदारी विस्तारणार असल्याचा आम्हाला आनंद आहे. महाराष्ट्रातील हवामान आणि जमिनीची प्रत प्रक्रियेसाठी उपयुक्त व जास्त उत्पादन देणाऱ्या संत्रांच्या नवीन वाणांसाठी अनुकुल आहे. याचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर संत्राच्या प्रक्रिया उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होईल. शेतकऱ्यांना त्यासाठी बरोबर घेण्याचा आणि योग्य मार्ग दाखविण्याचा आमचा प्रयत्न राहिल. कदाचित यामुळे संत्रा पल्प निर्मिती आणि पुरवठ्यात भारत जगात अग्रणी होईल असा विश्वास व्यक्त केला.

आजपर्यंत जैन इरिगेशनने सूक्ष्म सिंचन, शेतमाल प्रक्रिया, जैव तंत्रज्ञान, सौर ऊर्जा आणि सौर कृषी पंप यांच्या माध्यमातून देशातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात कृषी समृद्धी आणली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना शेतीबद्दल आत्मविश्वासही मिळवून दिला. विदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र थांबविण्यासाठी अलिकडेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जलयुक्त शिवारासह अनेक महत्त्वकांक्षी योजना राबविण्यास सुरवात केली आहे. येथील शेतकऱ्यांना सक्षम करून त्यांचा शेतीबद्दलचा विश्वास वाढावा आणि आत्महत्येपासून परावृत्त होऊन त्यांनी शेतीतून प्रगती साधावी हा यामागचा उद्देश आहे. याच उद्देशाने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाची हमी मिळावी आणि स्थानिकांना रोजगार मिळवून देण्यासाठी अलिकडेच मुख्यमंत्र्यांनी संत्रा प्रक्रिया प्रकल्पाबद्दल घोषणा केली होती. गेल्याच महिन्यात त्यांनी जैन हिल्सलाही भेट देऊन येथील आधुनिक आणि उच्च कृषी तंत्रज्ञानाचे कौतुक करत या तंत्रज्ञानाच्या आधारे जैन इरिगेशनच शेतीवरील समस्यांवर उत्तर शोधू शकेल असा विश्वास व्यक्त केला होता.

अलिकडेच जैन इरिगेशनचा खाद्य विभाग म्हणून नावारूपाला आलेल्या जैन फार्म फ्रेश फूड लि. (JFFFL) ने या उपकंपनीच्या माध्यमातून प्रक्रियायुक्त पदार्थांच्या रिटेल मार्केटमध्ये पदार्पण केले आहे.

फोटोकॅप्शन : सामंजस्य कराराच्यावेळेस उपस्थित मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, कृषीमंत्री एकनाथराव खडसे, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री अनिल जैन, कोकाकोलाचे अध्यक्ष श्री. इरिल फिनान आणि सीईओ श्रीकृष्ण कुमार

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s