जैन इरिगेशनच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर

जळगाव दि.१५ (प्रतिनिधी) : देशातील दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा कल ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्राकडे वाढला असून देशांतर्गत ठिबक संचाच्या मागणीत वाढ झाली आहे. तसेच दुसऱ्या बाजूला शेतमाल प्रक्रिया उद्योगातही वाढ होत असून देशातील शेती आणि शेतकऱ्यांसाठी हे चांगले संकेत समजले जात आहेत. सूक्ष्म सिंचन क्षेत्रातील देशात सर्वात मोठी कंपनी म्हणून गणलेल्या व संपूर्ण जगात दुसऱ्या स्थानी असलेल्या जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.ने २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी तिसऱ्या तिमाहीचे व पाऊणवार्षिक (नऊ महिन्यांचे) लेखा परीक्षण न केलेले व एकत्रित निकाल १४ फेब्रुवारी रोजी जाहीर केले. त्यातून ही माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात रविवारी (१४ फेब्रुवारी) मुंबई येथे जैन इरिगेशनच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. त्यात लेखा परीक्षण न केलेल्या तिसऱ्या तिमाहीच्या व पाऊण वार्षिकीच्या निकालांना मंजूरी देण्यात आली. यंदाच्या दुष्काळाच्या परिस्थितीतही कंपनीने आपली वाढ आणि वाटचाल कायम राखली असल्याचे या अहवालावरून स्पष्ट होत आहे. तसेच सूक्ष्म सिंचनचा वापर आणि पाणी बचतीबद्दल शेतकऱ्यांमध्ये जागृती होत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट होत आहे.

या निकालांनुसार तिसऱ्या तिमाहीत जैन इरिगेशनचा देशांतर्गत सूक्ष्म सिंचन प्रणाली (ठिबक) व्यवसाय १३.९ टक्कयांनी वाढला, तर एकूण नऊ महिन्यांच्या कालावधीत या व्यवसायात ९.४ टक्के इतकी वाढ झाली. तसेच तिसऱ्या कंपनीच्या एकत्रित महसूलात ६.५ टक्कयांनी, तर पाऊण वार्षिकीत (नऊ महिन्यांत) ४.३ टक्क्यांनी वाढ झाली असून तिसऱ्या तिमाहीत १३.६५ कोटी रुपये निव्वळ करपश्चात नफा मिळाला आहे. तसेच तिसऱ्या तिमाहितील स्वतंत्र महसूलात ४.४ टक्के वाढ झाली, तर या आर्थिक वर्षातील सरलेल्या एकूण नऊ महिन्यांत स्वतंत्र महसूलात ५ टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. अलिकडेच कंपनीने ‘आमरस’ उत्पादन सादर करून किरकोळ ग्राहक बाजारपेठेत पदार्पण केले. तसेच आफ्रिकेतील टांझानियाच्या ‘दार ए सलाम’ शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अंदाजे २२० कोटी रुपयांचे कंत्राट कंपनीला मिळाले. याशिवाय  कंपनीकडे अन्नप्रक्रियेसंदर्भात देशांतर्गत आणि देशाबाहेरून एकूण १८३६.४ कोटी रुपयांची मागणी (ऑर्डर) नोंदविण्यात आली असून चौथ्या तिमाहीतही मागणी नोंदीचा जोर कायम राहिला आहे. याचा एकत्रित सकारात्मक परिणाम कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील निकालांवर पडलेले दिसून येतात.

यासंदर्भात जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अनिल जैन म्हणाले, ‘ भारतातील बदलते हवामान, कृषी क्षेत्रातील खालावलेली स्थिती आणि शेतमालाच्या बाजारभावात होणारे चढउतार यामुळे व्यवसायापुढील अनेक आव्हाने यंदाही कायम राहिली आहे. तरीदेखील कंपनीच्या महसूलात सकारात्मक वाढ करण्यात आम्ही यशस्वी झालो. त्यामुळे कंपनीवर असलेल्या कर्जाची आम्ही लवकरच परतफेड करू शकू. याशिवाय सध्याच्या अनिश्चित परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही काही पाऊले उचलतो आहोत. बदलते वातावरण आणि शेतीतील कमी उत्पादकता यावर उत्पादन आणि सेवेच्या माध्यमातून आम्ही मात करू शकू असा आम्हाला दृढ विश्वास वाटतो.’’.

तिसऱ्या तिमाहीतील स्वतंत्र कामगिरीचा आढावा
    मागील वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदाच्या तिमाहीत स्वतंत्र महसूलात ४.४ टक्यांनी वाढ झाली. निर्यातीतून मिळालेल्या महसूलात ११.३ टक्के वाढ झाल्याचे दिसते. तसेच देशांतर्गत व्यवसाय २.३ टक्क्यांनी विस्तारला आहे.
    मागील वर्षीच्या आर्थिक तिमाहीप्रमाणेच कंपनीच्या एकंदरीत सूक्ष्मसिंचन व्यवसायात ६.५ टक्के वाढीचे सातत्य कायम राखले गेले आहे. त्यापैकी देशांतर्गत व्यवसाय ६.१ टक्कयांनी वाढला, तर निर्यात ९ टक्के वाढली. देशांतर्गत व्यवसायापैकी किरकोळ व्यवसायात १३.९ टक्के वाढ झाली, मात्र प्रोजेक्टस्च्या व्यवसायात २१.७ टक्के नकारात्मक वाढ नोंदविण्यात आली. मागच्या वर्षी हाती घेण्यात आलेले प्रोजेक्टस् अजून पूर्णत्वास जायचे असून नवे प्रोजेक्टस् दृष्टीपथात आहेत.
     मागच्या वर्षीप्रमाणेच यंदाही पाईप व्यवसातील प्रगती कायम आहे. यंदा या तिमाहीत पाईप व्यवसायात १२. ८ टक्के वाढ झाली. मागील वर्षी याच तिमाहीत इतकीच वाढ नोंदविण्यात आली होती. या व्यवसायवृद्धीमध्ये पीई पाईप विभाग अग्रणी आहे. या विभागाला विविध संस्थांकडून मिळणाऱ्या सातत्यपूर्ण मागणीचा ओघ कायम राखण्यात यश आले आहे. त्यामुळे यंदाच्या तिमाहीत २३.८ टक्के वाढ दिसत आहे.

    या तिमाहीत कंपनीचा खाद्य विभागात एकंदरीत १.६ टक्यांनी वाढला आहे. त्यापैकी कांदा निर्जलीकरण व्यवसायाने ७६.७ टक्कयांची वाढ दर्शविली, तर फळप्रक्रिया विभागाने १५.४ टक्क्यांची नकारात्मक वाढ दर्शविली आहे. मध्यपूर्वेच्या ग्राहकांकडून पाहिजे तसा प्रतिसाद न मिळाल्याने हा परिणाम झालेला दिसतो.
    कंपनीच्या इतर व्यवसायांपैकी टिश्यू कल्चर व्यवसायात या तिमाहीत २.९ टक्के वाढ झाली, तर सोलरसारखे अन्य व्यवसायांची आर्थिक गती संथ राहिली.
    या तिमाहीत कंपनीला १३.६५ कोटी रुपये इतका निव्वळ नफा झाला. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीला २९.८६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

तिसऱ्या तिमाहीचा एकत्रित आढावा
तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या एकूण महसूलात ६.५ टक्कयांची वाढ झाली. कर व्याज घसारापूर्व उत्पन्न ०.१(एक दशांश) टक्क्यांनी घटले.
•    सूक्ष्मसिंचन, अन्न प्रक्रिया, पाईप्स व्यवसाय अनुक्रमे ७.९ टक्के, ११.३ टक्के, १३.१ टक्के वाढला. इतर व्यवसायांची वाढ संथ राहिली.
•    तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या एकूण महसूलात विदेशी बाजारपेठेचा वाटा ५०.५ टक्के इतका राहिला.
•    विदेशी बाजारपेठेतून मिळालेल्या महसूलात ११ टक्क्यांची वाढ झाली.
•    या तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफा ९.२१ कोटी रुपये झाला, मात्र मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला ३९.६८ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

पाऊण वर्षातील (नऊ महिन्यांच्या) स्वतंत्र कामगिरीचा आढावा
    या आर्थिक वर्षातील मागील नऊ महिन्यांमध्ये कंपनीच्या स्वतंत्र महसूलात ५.९ टक्के वाढ झाली. त्यापैकी देशांतर्गत व्यवसायात ५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कंपनीच्या निर्यातीत १.६ टक्कयांची निखालस वाढ झाली.

•    निर्यातीत घटल्यामुळे कंपनीचा एकूण सूक्ष्म सिंचन व्यवसाय २.५ टक्क्यांनी घटल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येते.
•    पाईप व्यवसायात १९.८ टक्के वाढ झाली आहे. त्यात पीई पाईप विभागाने ५८.६ टक्के इतकी मोठी वाढ नोंदविली आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या संस्थात्मक विक्रीमुळे हा परिणाम साधला आहे.
•    अन्न प्रक्रिया विभागाचा महसूल ४.२ टक्कयांनी सुधारला आहे. त्यात फळप्रक्रिया विभागाच्या महसूलात ७.३ टक्के वाढ झाली, मात्र भाजीपाला निर्जलीकरणात २.८ टक्क्यांनी नकारात्मक वाढ झाली.
•    ऊर्वरित व्यवसायांपैकी टिश्यूकल्चर व्यवसाय ३६.७ टक्यांनी वाढला आहे. सोलरसह अन्य व्यवसायाची गती संथ राहिली आहे.
•    एकंदरीत या आर्थिक वर्षीतील सरलेल्या नऊ महिन्यांचा आढावा घेतल्यास कंपनीला ६.८७ कोटी रुपयांचा निव्वल नफा झाल्याचे निदर्शनास आले. गतवर्षी याच कालावधीत ३३.१६ कोटी रुपयांचा तोटा नोंदविण्यात होता.

नऊ महिन्यांचा एकत्रित आढावा
•    २०१५-१६च्या आर्थिक वर्षातील मागील नऊ महिन्यांच्या कालावधीत कंपनीच्या एकूण महसूलात ४.३ टक्के वाढ झाली आहे. त्यासोबतच कर, व्याज, घसारापूर्व उत्पन्न ४ टक्के वाढले आहे.
•    नऊ महिन्यांच्या कालावधीत सूक्ष्मसिंचन व्यवसायात २ टक्क्यांची नकारात्मक वाढ नोंदविण्यात आली आहे. असे असले तरी अन्न प्रक्रिया आणि पाईप्स व्यवसायात अनुक्रमे ८.६ टक्के आणि १९.९ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. या तिमाहीत संथ गतीत राहिलेल्या इतर व्यवसायांनी मात्र या संपूर्ण पाऊण वर्षात ६.१ टक्के नकारात्मक वाढ नोंदविली आहे.
•    या आर्थिक वर्षातील सरलेल्या पाऊण वर्षाच्या कालावधीत विदेशी बाजारपेठेमार्फत कंपनीला प्राप्त झालेल्या महसूलाचा हिस्सा ४७ टक्के होता. या महसूलात २.५ टक्के वाढ झाली.
•    या आर्थिक वर्षातील सरलेल्या पाऊण वर्षाच्या कालावधीत कंपनीला १.५१ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदविण्यात आला. गत वर्षाच्या याच कालावधीत हा तोटा ४३.१४ कोटी रुपये इतका नोंदविण्यात आला होता.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s