मागेल त्याला सौर कृषिपंपाची ‘नाबार्ड’ची योजना

शिरसोली, जळगाव, ता. १७ : मागेल त्या शेतकऱ्याला सौर कृषी पंप अशी नाबार्डची योजना असून या योजनेंतर्गत शेतकऱ्याला ४० टक्के अनुदान मिळते. वीज तुटवडा आणि भारनियमनातून मुक्त होण्यासाठी सौर कृषी पंपाचा वापर शेतकऱ्यांना फायदेशीर होणार असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी विजय भारंबे यांनी दिली. शिरसोली येथील भगवान बारी यांच्या शेतात संपन्न झालेल्या शेतकरी चर्चासत्रात व कृषी मेळाव्यात ते मार्गदर्शन करत होते.

जैन इरिगेशन आणि जैन इरिगेशनचे वितरक यांच्या संयुक्त विद्यमाने शिरसोली येथे आयोजित या मेळाव्यात एस. आर. पाटील, प्रगतीशील शेतकरी रामदास बारी, शेतकरी शरद पाटील, प्रदीप पाटील, यांच्यासह कृषीतज्ज्ञ डॉ. अनिल ढाके, बी.डी. जडे, गौतम देसर्डा तसचे अनुप आगीवाल, दिलीप बऱ्हाटे, अनिल पाटील, एम.पी. कुलकर्णी यांच्यासह पंचक्रोशीतील शेतकरी लक्षणीय संख्येने उपस्थित होते. तसेच चर्चासत्रातील महिला शेतकऱ्यांची उपस्थितीही लक्षवेधी होती.

श्री भारंबे पुढे म्हणाले, ‘विहीर, बोअरवेल, शेततळे, धरण अशा सर्व ठिकाणी दहा फुटांपासून ते हजार फुट खोलीवरून पाणी खेचण्याची क्षमता असलेल्या सौर कृषी पंपांमुळे दिवसाकाठी २० हजार लिटरपासून ते दोन लाख लिटरपर्यंत पाणी खेचता येते. आज अनेक शेतकऱ्यांना सौर कृषी पंप वापरातून फायदा झाला आहे.’’. त्यानंतर सूक्ष्मसिंचनातून पाणी बचत आणि कृषी उत्पादनवाढ या विषयावर बोलताना जैन इरिगेशनचे विपणन अधिकारी डी. एम बऱ्हाटे यांनी शेतीतील काटेकोर पाणी व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक ऑटोमेशन ठिबक प्रणालीबद्दल शेतकऱ्यांना माहिती दिली. या प्रणालीत पिकाची मुळे जमिनीत किती खोलवर वाढतात याचा अभ्यास करून तेवढ्या खोलीवर सेन्सर्स बसविली जातात. जमिनीतील ओलावा संपला की सेन्सर्सच्या मदतीने या ठिबकसिंचन प्रणालीतून आपोआपच पिकाला पाणी दिले जाते. यातील नियंत्रण यंत्रावर कुठल्या पिकाला, किती वेळ पाणी द्यायचे ही माहिती नोंदविली की रात्री बेरात्री वीज आली तरी संबंधित यंत्रणा आपोआप सुरू होते आणि शेतकऱ्याला स्वतंत्र माणूस ठेवण्याची त्यासाठी आवश्यकता लागत नाही.

कांदा पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन यासंदर्भात कृषी तज्ज्ञ बी. डी. जडे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कांदा पिकाची वाढ चांगली होण्यासाठी तसेच पिकाच्या मुळाशी हवा आणि पाणी खेळती राहून उत्पादन चांगले येण्यासाठी इस्त्रायलच्या धर्तीवर आपणही गादी वाफा पद्‌धत वापरायला हवी. कांदा पिकाची मुळे जमिनीत १५ सें.मी. खोलीपर्यंत राहतात. ती नाजूक असल्याने सूक्ष्मसिंचन पद्‌धत, त्यातही रेनपोर्टचा उपयोग फायद्याचा ठरेल असेही ते म्हणाले. कांदा पिकाचे कीड व रोग नियंत्रण आणि जैन गॅप बद्दल व्ही. आर. सोळुंके यांनी मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात उपलब्ध होणाऱ्या ‘सफल’ फायनान्सचे विविध पर्याय शामकांत गुजर यांनी उपस्थितांना सांगितले. कांदा करार शेतीबाबत गौतम देसर्डा यांनी मार्गदर्शन केले.

फोटोकॅप्शन : शिरसोली, ता. जळगाव येथील कृषी मेळाव्यात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषीतज्ज्ञ.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s