पद्मश्री भवरलालजी जैन यांचे देहावसान

जळगाव, दि. 25 (प्रतिनिधी) – शेती शेतकरी आणि गांधी विचारातील ग्रामीण विकास या त्रिवेणी संगमासाठी उभे आयुष्य वेचत भारतासाह जगभरातील शेतकऱ्यांना ठिबक आणि उच्चकृषी तंत्रज्ञानाद्वारे पाणी बचतीसह समृद्ध शेतीचा मंत्र देणारे कृषक साधक भवरलालजी जैन यांचे आज मुंबई येथे सायंकाळी 4 वाजून 7 मिनिटांनी निधन झाले. येथील जसलोक इस्पितळात त्यांच्यावर मागील 10 दिवसांपासून उपचार सुरु होते. ते 78 वर्षांचे होते. त्यांचे पार्थिव जळगाव येथे आज रात्री उशिरा पोहोचणार असून उदया दिनांक 26 रोजी सकाळी 8.00 ते सायंकाळी 8.00 या वेळात जैन हिल्स येथील आकाश मैदानात त्यांचे अंत्यदर्शन घेता येईल.

(Click For Profile Info : डॉ. भवरलालजी जैन यांच्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा )

शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 8.00 ते 11.00 या कालावधीत अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव आकाश मैदानातच असेल. दुपारी 11.00 च्या सुमारास त्यांचे पार्थिव जैन हिल्स येथील त्यांच्या निवासस्थानी नेले जाईल. जैन धर्मानुसार धार्मिक विधी आटोपून, ज्या शेतात विविध प्रयोग करुन नाविन्याचा मंत्र त्यांनी दिला त्या जैन हिल्सच्या प्रात्यक्षिक भूमीवर त्यांच्यावर दुपारी ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. शनिवार दि. 27 रोजी जैन इरिगेशनची भारतातील सर्व आस्थापने बंद राहतील. याचबरोबर गांधीतीर्थ येथील गांधी म्युझियमही शनिवारी बंद असेल.

आपल्या 78 वर्षांच्या वाटचालीत त्यांनी साधी राहणी आणि निसर्गपूरक जीवनशैलीच्या माध्यमातून तब्बल 10 वेळा हृदयविकाराच्या आघाताला परतावून लावले होते. मागील १ दशक त्यांनी उच्चकृषी तंत्रज्ञानाचा नवा अविष्कार ठरलेल्या सौरऊर्जेच्या शेतीतील निसर्गपूरक वापरासाठी अहोरात्र मेहनत घेऊन खऱ्या अर्थाने मेक इन इंडियाचा अविष्कार ठरणाऱ्या स्वदेशीच सौरपंपाच्या उपलब्धतेत त्यांनी यश मिळविले. अवघ्या 7 हजार रुपयाच्या भागभांडवलावर त्यांनी 1963 मध्ये त्यांनी व्यवसायात पदार्पण केले. 1978 मध्ये त्यांनी पपेनच्या माध्यमातून औद्योगिक क्षेत्राचा श्रीगणेशा केला. 1980 मध्ये त्यांनी पीव्हीसी पाईपचे उत्पादन सुरु केले. 1988 मध्ये ठिबक सिंचनाचा भारतीय शेतीनुरुप त्यांनी अविष्कार साधत शेतकऱ्यांना कमी पाण्यावर भरघोस उत्पादनाचा नवा मार्ग खुला केला. 1989 मध्ये शेतकऱ्यांना उच्चकृषी तंत्रज्ञानाबाबत प्रशिक्षण देता यावे, त्यांना प्रात्यक्षिकाच्या पाहणीतून शिकता यावे यासाठी कृषी संशोधन व विकास केंद्राची जैन हिल्स येथे उपलब्धी केली. 1991 मध्ये प्लास्टिक शीटस्‌चे उत्पादन सुरु केले. 1994 मध्ये ऊती संवर्धित केळी निर्मिती सुरु केली व याचबरोबर कांदा, भाजीपाला निर्जलिकरण प्रक्रिया प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना अधिक सोयीचे ठरावे म्हणून पॉलिइथिलिन पाईप उत्पादन सुरु केले. सौरऊर्जा वॉटर हिटरचे उत्पादन याचवर्षी सुरु झाले. 1996 मध्ये फळप्रक्रिया उद्योगाचा प्रारंभ केला. हा प्रकल्प जळगाव येथे कार्यान्वित केला. 2004 मध्ये हरितऊर्जा व बायोगॅस प्लांट सुरु करण्यात आला. 2005 मध्ये सौरऊर्जा फोटोव्होल्टिक उपकरणांची निर्मिती सुरु केली. 2008 मध्ये सौरऊर्जा फोटोव्होल्टिक मॉडेल सयंत्र निर्मिती प्रारंभ केला. 2012 मध्ये जळगाव येथे सौरऊर्जा निर्मितीप्रकल्प व फळप्रक्रियेपासून जे बायोवेस्टेज निर्माण होते त्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित केला.

निसर्गपूरक उद्योगाबाबत त्यांचे सातत्याने संशोधन सुरु होते. शेतीसमवेत शेतकऱ्यांना त्यांचे जीवनमान अधिक समृद्ध कसे करता येईल यासाठी त्यांनी विविध प्रयोग केले. ग्रामीण भागातील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या उद्देशाने सौरऊर्जेवर चालणाऱ्या जलशुद्धिकरण यंत्राला विकसित करण्यात प्राधान्य दिले. अमेरिकेतील एमआयटी या विद्यापिठासमवेत विकसित करण्यात आलेल्या या जलशुद्धिकरण यंत्राला जागतिक पातळीवर अव्वल दर्जाचे म्हणून नुकतेच गौरविण्यात आले. कृषी व विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले. कृषी क्षेत्रातील शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेऊन भारतासह विदेशातील 28 कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना त्यांनी जैन इरिगेशनची द्वारे खुली करुन दिलीत.

शनिवार दि. 27 रोजी जैन इरिगेशनची भारतातील सर्व आस्थापने बंद राहतील. याचबरोबर गांधीतीर्थ येथील गांधी म्युझियमही शनिवारी बंद असेल.

————-

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि गांधी तीर्थचे संस्थापक आदरणीय श्री. भवरलालजी जैन यांचा परिचय. (पी.डी.एफ फाईल डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

BHJ Biodata Marathi (ISM)

श्री मोठे भाऊंबद्दल मान्यवरांचे मनोगत

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गांधी तीर्थचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याचा मान्यवरांनी 19 मार्च २०11 रोजी जळगाव येथील बालगंधर्व खुले नाट्यगृहात संपन्न झालेल्या जळगाव रत्न पुरस्कार प्रदान सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भावना. (युनिकोड मध्ये वर्ड फाईल खालील लिंकवरून डाऊनलोड करा)

श्री. मोठे भाऊंबद्दल मनोगत Matter

आपल्या प्रिय पत्नीविषयी अर्थातच स्व. कांताबार्ई जैन यांच्याबद्दल आदरणीय भवरलालजी जैन (मोठे भाऊ) यांनी ‘ती आणि मी’ हे आत्मकथनात्मक पुस्तक लिहिले. आतापर्यंत या पुस्तकाच्या मराठीत ८० हजारपेक्षा जास्त प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. हिंदीत ५ हजार प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. इंग्रजीतही याचा अनुवाद प्रसिद्ध झाला आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी मान्यवर लेखकांचे मनोगत व विस्तृत वृत्तांत खालील लिंकवर उपलब्ध आहे.

TEE & MEE Special Issue

Download Photos below:

Advertisements

2 thoughts on “पद्मश्री भवरलालजी जैन यांचे देहावसान

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s