अन् भवरलालजी आजही मॉर्निंग वॉकला…

Press Note

जळगाव, (प्रतिनिधी) – प्रत्येक व्यक्तिचा आयुष्यात बांधुन घेतलेला एक शिरस्ता असतो. ती व्यक्ती जर शिस्तप्रिय असेल तर मोसम कुठलाही असो, त्यात बदल होत नाहीत. गेली चार दशके ज्या परिसराच्या विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेतले त्या जैन हिल्स व व्हॅली परिसरात भवरलालजी जैन यांचा मॉर्निंग वॉक हा नित्याचा ठरलेला होता. ऋतु कुठलेही असो, उनं पाऊसाची पर्वा न करता या साधकाची पाऊले रोज सकाळी 6.00 वाजता प्रत्येक कोपरान् कोपरा झाडांचा वेध घेत जैन हिल्समध्ये मुक्तपणे फिरायची. या मॉर्निंग वॉकमध्ये विषयांची बांधणीही झाडांच्या बोली भोवतीच ठरलेली असायची.

निसर्गाचा वेध घेत या मॉर्निंग वॉकमध्ये चर्चेसाठीही रोज ठरलेले सहकारी असायचे. यात त्यांचे वैद्यकीय सल्लागार डॉ. सुभाष चौधरी, फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. व्ही. आर. बाला, डॉ. बी. के. यादव, डॉ. अनिल ढाके, पी.एम. चोरडिया, लक्ष्मण राठोड व इतर विभागातील सहकारी, नातवंडे हे हमखास असायचेच. यात विशेष म्हणजे बाहेरून जे व्यक्ती, विविध संस्थांचे प्रतिनिधी भाऊंना भेटायला यायचे ते ही या मॉर्निंग वॉकची अनुभूती घ्यायचे.

रोज नित्याचा ठरलेला हा शिरस्ता त्यांच्या अनंताच्या प्रवासापूर्वीही कुटुंबियांकडून  पाळला गेला. आज दि. 27 रोजी सकाळी बरोबर 6 च्या सुमारास भवरलालजी जैन यांचे पार्थिव शेवटच्या मॉर्निंग वॉकला निघाले तेव्हा ही सकाळची झुंजुमुंजुची वेळ गलबलून गेली. ज्या दूरदृष्टीने त्यांनी कांताई बंधारा उभारला तो कांताई बंधारा, टिश्युकल्चर पार्क येथेही आज त्यांचे पार्थिव नेण्यात आले. अनुभूती निवासी स्कूल ही तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात आवडीची वास्तू आणि परिसरही. शेवटची ही दहा वर्षे त्यांनी अनुभूतीच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षकांसमवेत मोठ्या आवडीने घालविली. दारिद्र्य रेषे खालील मुलांना चांगले शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरु केलेल्या शाळेतील विद्यार्थी ही त्यांचे जीव की प्राण झाले. या सर्व कष्टाच्या बेटांना त्यांचे पार्थिव सकाळी भेट देत पुढे निघाले तेव्हा जैन हिल्स पासून कांताई बंधारा, टिश्युकल्चर पार्क, अनुभूती स्कूल, फुडपार्क, एनर्जीपार्क, कोरडवाहू संशोधन प्रकल्प येथील सहकारीही या शेवटच्या मॉर्निंग वॉकला साक्षीदार होण्यासाठी पहाटेपासूनच आपापल्या कामाच्या ठिकाणी हजर होते.

फोटो – भवरलालजी जैन यांचे पार्थिव अनुभूती स्कूल येथे आले असताना त्यांच्या दर्शनासाठी जमलेले सहकारी

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s