ग्रंथातील विचारधन शेवटपर्यंत प्रवासातील सोबतीला

आनंद प्रवचन,जैनिझम, यासारख्या ग्रंथाचे स्व. भवरलालजी जैन यांचे सुरू होते वाचन

जळगाव, २७ :विचारवंत आणि साहित्यिक असलेला एकमेव उद्योजक अशी भवरलालजी जैन यांची ओळख होती. आजवर त्यांनी विविध विषयांवरची हजारो पुस्तके वाचली होती. मुंबईला रुग्णालयात दाखल होण्याच्या क्षणापर्यंत त्यांचे वाचन सुरू होते. आचार्य श्री आनंद ऋषी लिखित ‘आनंद प्रवचन’ हे हिंदी पुस्तक, रिकाडो सिमलर मेवरिक लिखित ‘ द सक्सेस स्टोरी बिहाईंड द वर्ल्डस्‌ मोस्ट अनयुज्वल वर्क प्लेसेस’, हे इंग्रजी पुस्तक तसेच जैनाचार्य ग्यानचंद्रजी लिखित ‘जैनिझम्‌- द युनिव्हर्सल फिलॉसॉफी’ या पुस्तकांचे ते वाचन करत होते. काही पुस्तकांत तर वाचनाच्या खुणाही त्यांनी करून ठेवल्या होत्या. त्यांच्या दालनातील टेबलावर त्यांनी व्यवस्थित रचलेली ही पुस्तके पाहणाऱ्याला अनामिक हुरहूर लावत होती.

जैन समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री भवरलालजी जैन यांना ग्रंथांचा व्यासंग करण्याची पहिल्यापासूनच आवड होती. मात्र त्यांच्या या वाचनाचा पैस खऱ्या अर्थाने विस्तारला तो २००७ नंतर असे निरीक्षण गांधी तीर्थचे ग्रंथपाल अशोक चौधरी नोंदवितात. स्व. जैन यांच्या पुस्तकप्रेमाबद्दलच्या साश्रुनयनांनी त्यांनी कथन केल्या. ते म्हणाले, ‘ भाऊंच्या साहित्यिक जाणिवा उच्चप्रतीच्या होत्या. म्हणूनच केवळ आत्मचरित्रापुरते मर्यादित न राहता आजची समाजरचना, शेतीविषयक प्रयोग अशा विविध विषयांवर त्यांनी आजतागायत १९ वर पुस्तके लिहिलीत. कुठलीही गोष्ट ते बारकाईने आणि अभ्यासपूर्वक करत असत. भाषण देण्यापूर्वी किंवा एखादा लेख लिहिण्यापूर्वी ते संबंधित विषयांवरील ग्रंथांचा अभ्यास करून त्यातून संदर्भ आणि टिपणांची नोंद करत आणि मगच लेख लिहित. विविध प्रसंगी पुस्तके भेट देण्यावर त्यांचा कटाक्ष असे.’

सन २०००सालापर्यंत स्व. भाऊंकडे असलेली ग्रंथसंपदा ६ हजारावर होती. पुढे त्यात वाढ होत राहिली आणि सद्य:स्थितीत ३८ हजार ४०० इतकी ग्रंथसंपदा जैन इरिगेशनच्या ग्रंथालयात आहे. गांधी तीर्थ येथील ग्रंथालयात महात्मा गांधीजी आणि सर्वोदयावर आधारित हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेतील शेकडो ग्रंथसंपदा आहे. त्यातील बहुतेक सर्व ग्रंथ आजवर मोठ्या भाऊंनी वाचलेले आहेत किंवा चाळलेली तरी आहेत, असे  श्री चौधरी अभिमानाने सांगतात. आजवर भवरलालजी जैन यांच्या कार्यकर्तृत्वावर देश विदेशातील विविध भाषांतील दीडशेहून जास्त साप्ताहिके, मासिके, नियतकालिकांत लिखाण प्रसिद्ध झालेले आहे, तर  ४५ पेक्षा जास्त पुस्तकांमध्ये त्यांच्या कार्याची विस्तृत नोंद घेण्यात आलेली आहे. या सर्वांचा जैन इरिगेशनच्या ग्रंथालयात अभ्यासू आणि जिज्ञासूंसाठी काळजीपूर्वक संग्रह करण्यात आलेला आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s