अनुभूती निवासी शाळेची पवईच्या राष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेत निवड

जळगाव, दि. 30 मार्च 16 (प्रतिनिधी) – पवई (मुंबई) आयआयटी येथे 1 ते 3 एप्रील दरम्यान आयोजित रोबोटीकस्पर्धेच्या सेमीफायनलसाठी अनुभूती निवासी शाळेतील इयत्ता ९ वीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यात दर्शील शहा, इंशात भुईभार, श्रमण पांडे, हर्षील जैन व सिध्दार्थ अग्रवाल या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांना विज्ञान शिक्षक यु.व्ही. राव यांचे मार्गदर्शन लाभले.

एन. आर. सी. इंडिया कंपनीने ऑगस्ट २०१५ मध्ये राष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेत अनुभूती शाळेने पहिले स्थान पटकाविले होते. राष्ट्रीय रोबोटीक स्पर्धेत देशातील विविध शाळांनी सहभाग घेउन रोबोटच्या तंत्रांतील संशोधन सादर केले. युद्धकालीन परिस्थितीत मानवरहीत रोबोटीक उपकरणांचे महत्त्व अधोरेखीत करून अतिशय उत्तम, तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण असे रोबोटीक उपकरण अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी बनविले. त्यास पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. या पारितोषिकासह अनुभूती शाळेने सेमिफायनलमधे प्रवेश मिळवला आहे. हे पाचही विद्यार्थी पवई येथे होणाऱ्या सेमिफायनलसाठी जळगाव येथून आजच रवाना झाले आहेत. त्यांना अंतिम फेरीतील यशस्वीतेसाठी संचालिका निशा जैन, प्राचार्या सुशा सतीश यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

कॅप्शन – पवईच्या राष्ट्रीय रोबोटीकस्पर्धेत निवड झालेल्या दर्शील शहा, इंशात भुईभार, श्रमण पांडे, हर्षील जैन व सिध्दार्थ अग्रवाल या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्या सुशा सतीश, संचालिका निशा जैन व विज्ञान शिक्षक यु.व्ही. राव .

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s