जैन इरिगेशन व जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेडमध्ये युकेच्या मंडाला व प्रवर्तकांची 804 कोटी रुपयांची गुंतवणूक

 

मुंबई,ता. ३०मार्च : कृषी आणि फळ व भाजीपाला प्रक्रियेतजगातअव्वलअसलेल्याजैनइरिगेशन सिस्टिम्स लि. व नव्याने स्थापित झालेल्या जैन फार्मफ्रेश फूडस् लिमिटेड कंपनीमध्येआज ग्रेटब्रिटन येथील वित्तीय संस्थेत अग्रणी असलेल्या मंडालाकॅपीटलने भरघोस अशी 804 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगात इतक्या मोठ्या प्रमाणावर नव्याने येणाऱ्या या गुंतवणुकीचे सर्वत्र आनंदात स्वागत केले जात असून कंपनीच्या इतिहासातील हा एक मोलाचा टप्पा म्हणून याकडे पाहिले जात आहे.

A1_passport_Finalसूक्ष्म सिंचन, ठिबक, उच्च कृषि तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या जैन इरिगेशनने जगातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणले आहे. भारतातल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगने कांदा उत्पादनाच्या क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीने जगाचे लक्ष वेधून घेतले. आंबा प्रक्रिया उद्योगात जैन इरिगेशनने संपूर्ण जगात पहिले स्थान निर्माण करून, तसेच कांदा प्रक्रिया उद्योगात जगात दुसऱ्या क्रमांकाचे स्थान निर्माण करून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे. 1994 मध्ये कंपनीने फळ व भाजीपाला प्रक्रियेच्या क्षेत्रात प्रवेश केला. आजमितीला दर वर्षी सुमारे 1 लाख 40 हजार मे. टन आंबा, 1 लाख 50 हजार मे टन कांदा तसेच केळी, पपई, टोमॅटो, स्ट्रॉबेरी, जांभूळ, पेरू हे सर्व मिळून 75 हजार मे. टन फळांची प्रक्रिया जैन इरिगेशन करते. अन्न सुरक्षिततेच्या दृष्टीने कंपनीने जागतिक पातळीवरील गुणवत्तेची सर्व मानांकने मिळविली असून व्यवसायातील सचोटी, वेळेचे नियोजन व व्यवसायातील तत्व या गुणांवर आपला व्यवसाय जागतिक पातळीवर विस्तारीत करून दाखविला आहे.

‘स्वत:बद्दल आत्मविश्वास ठेवा, तो चेहऱ्यावर प्रज्वलित होऊ द्या आणि त्याला अविरत कष्टाची आणि चिकाटीची जोड दिली तर यश नक्कीच प्राप्त होईल’ हा स्व. भवरलालजी जैन यांनी दिलेला मंत्र घेऊन सर्व सहकारी सिद्ध झाले आहेत.

जैन इरिगेशनने नुकतेच फार्मफ्रेश या छत्राखाली आमरस बाजारात दाखल केला असून याला ग्राहकांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांना फलोत्पादनातून अधिकाधिक पैसे मिळावेत यासाठी दुसऱ्या बाजूला कंपनीने भारतभर कृषिशिक्षण विस्ताराचे जाळे निर्माण केले. आज घडीला भारताच्या प्रत्येक जिल्ह्यात कंपनीचे कृषितज्ज्ञ आहेत. कंपनीने आंध्र प्रदेश व तमिळनाडू मध्ये आंबा उत्पादन वाढीतून शेतकऱ्यांना आर्थिक प्रगतीसाठी प्रवृत्त करण्याच्या उद्देशाने उन्नती हा प्रकल्प हाती घेतला आहे. जैन इरिगेशनच्या फळ प्रक्रिया उद्योगात प्रचंड वाढ झाल्याने व भविष्यातील व्यवसायाच्या विस्तारलेल्या संधी लक्षात घेऊन जैन फार्म फ्रेश फूडस्‌ लिमिटेड या उपकंपनीची स्थापना करण्यात आली आहे. यापुढील सर्व फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग हे या कंपनीअंतर्गत जोमाने घोडदौड करत राहतील. कंपनीचे भारतात जळगाव, चित्तूर (आंध्र प्रदेश) आणि वडोदरा (गुजरात) तसेच अमेरिका, यु.के. इथे फळ व भाजीपाला प्रक्रिया प्रकल्प आहेत. कंपनीने आपला विस्तार वाढविण्यासमवेत मूळ उत्पादक शेतकऱ्यांना या प्रगतीत सामावून घेतले आहे. जवळजवळ ४० पेक्षा अधिक देशांत ‘जैन फार्म फ्रेश फूडस्‌’ची उत्पादने विक्री होत आहेत.

मंडाला कॅपिटल, ही युकेस्थित भांडवली गुंतवणुक करणारी अग्रेसर कंपनी आहे. आजमितीला जगात अन्नप्रक्रिया व्यवसायाचे क्षेत्र सर्वात वेगाने वाढणारे म्हणून गणले गेले असून या व्यवसायावर मंडालाने लक्ष केंद्रित केले आहे. या क्षेत्रात जागतिक पातळीवर आपल्या गुणवत्तेच्या माध्यमातून ठसा उमटविणाऱ्या कंपन्यांची पाहणी करून त्यांनी जैन इरिगेशन व जैन फार्म फ्रेश फूडस्‌ लिमिटेडमध्ये भांडवल गुंतवणुकीचा निर्णय घेतला. त्यानुसार 804 कोटी रुपयांच्या या एकूण गुंतवणुकीतील जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. चे 289.60 कोटी रुपयाचे समभाग खरेदी केली आहेत व जैन इरिगेशन सिस्टिम्सच्या प्रमोटर्सनीसुद्धा 112.80 कोटी रुपये गुंतविले आहेत. तसेच जैन फार्म फ्रेश फूडस्‌ लिमिटेड या उपकंपनीचे 14.27% समभाग व रोखे इत्यादीच्या माध्यमातून भांडवली स्वरूपात एकूण गुंतवणूक 402.20 कोटी रुपये घेऊन व्यवसायात भागीदारी देऊ केली आहे.

जागतिक विश्वासार्हतेसह शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध  –अशोक जैन, अध्यक्ष जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि.

‘कंपनी ही वाहत्या नदीसारखी आहे, तिला वाहतच ठेवले पाहिजे. मात्र, तिला दिशा देण्याचे काम आपण केले पाहिजे’ या स्व. भवरलालजी जैन यांच्या शिकवणीतून कंपनीचे संचालक मंडळ व सर्व सहकारी घडलेले आहेत. जागतिक पातळीवरच्या मंडालासारख्या वित्तीय संस्थेने आपल्या जैन इरिगेशन व जैन फार्म फ्रेश फूडस् लिमिटेड या कंपनीसाठी घेतलेला गुंतवणुकीचा निर्णय खऱ्या अर्थाने आपल्या जागतिक विश्वासार्हतेवर असलेले शिक्कामोर्तब आहे, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी दिली. स्व. भवरलालजींच्या आठवणींनी भावूक होत, ‘कंपनीच्या या नव्या विस्ताराला आशीर्वाद देण्यासाठी ते आज आमच्यात हवे होते. आपली कंपनी आता नवयुगाच्या सूर्योदयाशीच उभी असून या संधीतून प्रगतीचे महाव्दार खुली होणार आहेत. यात काही आव्हाने जरी असली तरी सांघिक पातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्ही आमचे स्थान असेच जागतिक पातळीवर अव्वल ठेऊन भूमिपुत्रांच्या विकासासाठी कटिबद्ध होत आहोत’, असेही त्यांनी सांगितले.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s