शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग

जळगाव, ता ३० : पिकातील तणाचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबकसारख्या उच्च कृषी तंत्रज्ञानाचा वापर शाश्वत व प्रभावी असून याद्वारे तणांचे ७० टक्केपर्यंत नियंत्रण होते. शेतकऱ्यांची एरवी तण व्यवस्थापनात होणारी दमछाक व खर्च टाळण्यासाठी ठिबक प्रणाली अधिक निसर्ग पूरक असल्याने यासाठी पुढाकार घेण्याची गरज राष्ट्रीय तण व्यवस्थापनावरील वार्षिक आढावा बैठकीत झालेल्या विचारमंथनातून शास्त्रज्ञांनी बोलून दाखविली. जबलपूर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन परिषदेच्या तण व्यवस्थापन संचालनालयाची जैन हिल्स येथे आयोजित २३ व्या वार्षिक आढावा बैठकीचा आज समारोप झाला. भारताच्या विविध राज्यांतील कृषी शास्त्रज्ञ आणि संशोधक या बैठकीत सहभागी झाले होते. Continue reading “शेतीतील तण व्यवस्थापनासाठी ठिबक तंत्राचाच प्रभावी उपयोग”

Advertisements

भवरलालजी जैन यांचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्यमिता पुरस्काराने जम्मूकाश्मीर येथे गौरव

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी): जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांना यावर्षीचा काउंसील ऑफ स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲन्ड इन्व्हेसमेंट कार्पोरेशन ऑफ इंडीया (कॉसीडीसी) चा उत्कृष्ठ उद्यमिता पुरस्कार बहाल करण्यात आला. जम्मूकाश्मीरचे वाणिज्य उद्योगमंत्री चंदर प्रकाश गंगा यांचा हस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनचे दिल्ली येथील वरिष्ठ सहकारी विजयकुमार लाभ यांनी स्वीकारला. यावेळी कॉसीडीसीचे अध्यक्ष पी जॉय ओमेन, जम्मू ॲन्ड कश्मीर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा कॉसीडीसीचे उपाध्यक्ष अमीत शर्मा व देशभरातील निमंत्रीत उद्योजक या समारंभासाठी उपस्थित होते. Continue reading “भवरलालजी जैन यांचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्यमिता पुरस्काराने जम्मूकाश्मीर येथे गौरव”

स्व. भवरलालजी जैन यांना ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनुर’ पुरस्कार

चिंचवड, पुणे (प्रतिनिधी) 24 : – स्व. भवरलालजी जैन यांचे खान्देशच्या विकासात मोलाची भर घातली त्यांच्या या कार्यास अधोरेखित करून पुण्यातील कान्हदेश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्रतर्फे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांना 2016 चा ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनुर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. Continue reading “स्व. भवरलालजी जैन यांना ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनुर’ पुरस्कार”

फलीच्या दोन दिवसीय सम्मेलनाची सांगता

ग्रामीण भागातील एक लाख विद्यार्थ्यांपर्यंत  ‘फली’ उपक्रम पोहोचविण्यासाठी प्रयत्नरत राहू – अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन

सद्यस्थितीसह भविष्याचा वेध घेण्यासाठी जैन हिल्स हे प्रेरणास्थळ : नान्सी बेरी

जळगाव, ता. २४ : कृषी क्षेत्रातील सद्य:स्थितीला सक्षम पर्याय देण्यासह या क्षेत्राचे भविष्यातील नायक घडविण्यासाठी भवरलालजी जैन यांची कर्मभूमी, जैन हिल्स समर्थ असून आता हे एक शक्तीस्थळ झाल्याचे प्रतिपादन जागतिक बँकेच्या महिला विभागाच्या माजी प्रमुख तथा ॲक्शन प्लॅटफॉर्म’ च्या समन्वयिका नान्सी बेरी यांनी केले. Continue reading “फलीच्या दोन दिवसीय सम्मेलनाची सांगता”