जैन इरिगेशनचे संचालक प्रा. डॉ. अरूण कुमार यांचे निधन

जळगाव, ता १० : उद्योगांच्या धोरणनीतिचे प्रसिद्‌ध आंतरराष्ट्रीय विचारवंत, लेखक आणि जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडचे स्वतंत्र संचालक प्रा. डॉ. अरूण कुमार जैन (वय ६० वर्षे) यांचे नोएडा येथे शुक्रवार ८ एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी निधी जैन, मुलगी क्रिती जैन आणि जैन इरिगेशन कंपनीचा विस्तारित परिवार आहे.

डॉ. अरुण कुमार जैन हे सन २०११ पासून ‘जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’मध्ये स्वतंत्र संचालक म्हणून कार्यरत होते. मॅकेनिकल अभियांत्रिकीत सुवर्ण पदकासह पदवी मिळविणाऱ्या डॉ. जैन यांनी अहमदाबाद येथील इंडियन इन्स्टीटयूट ऑफ मॅनेजमेंट मधून नेत्रदीपक प्राविण्यासह पी.एचडी. संपादन केली होती. तसेच आयएफसी-वर्ल्डबँकेचेही ते स्नातक होते. अमेरिका, इंग्लंड, ग्रीस, फ्रान्स, जर्मनी आणि सिंगापूर येथील आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्यापीठांमध्ये त्यांनी धोरणनिती आणि उद्योगांच्या प्रशासनासंदर्भात अध्यापनाचे काम केले होते. लखनौच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट येथे उद्योजकीय प्रशासन आणि उद्योगांच्या धोरणनिती या विषयाचे प्राध्यापक होते.

जैन इरिगेशनमध्ये संचालक म्हणून कार्यरत असताना नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून कंपनीची उद्योजकीय धोरणनिती आणि प्रशासन बळकट करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला होता. त्यांच्या निधनाबद्दल कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, कंपनीचे संचालक मंडळ आणि विस्तारित सहयोगी परिवारातर्फे शोक व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s