कृषीक्षेत्राच्या भविष्यातील नायकांचे जैन हिल्सवर दोन दिवस विचारमंथन

जळगाव, ता. २१ : भारतातील शेतीला भविष्यातही एक समर्थ नेतृत्व मिळावे या दृष्टीने शाळेपासूनच विद्यार्थ्यांच्या अंगी शेतीची गोडी निर्माण व्हावी, कृषी क्षेत्राबाबत त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा व भविष्यातील आव्हाने ओळखून उच्च कृषी तंत्रज्ञानाचे बाळकडू त्यांच्यात रूजावे या महत्त्वपूर्ण उद्देशाने जैन इरिगेशन, नान्सी बेरी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘फली’ चे (फ्युचर ॲग्रीकल्चर लिडर्स ऑफ इंडिया) दोन दिवसीय संमेलन दि. २३ व २४ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील १८ शाळांमधील १५०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना मागील दोन वर्षांपासून शालेय अभ्यासक्रमासमवेत कृषी क्षेत्राबाबतही विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. या १५०० विद्यार्थ्यांपैकी २५० विद्यार्थ्यांची या विचारमंथनासाठी निवड झाली असून हे विद्यार्थी आपापल्या गटातर्फे वर्षभरात साध्य केलेल्या उपक्रमांचे सादरीकरण करतील.

 


‘फली’ उपक्रम हा दोन वर्षांपूर्वी भारतीय कृषी शिक्षणाच्या दृष्टीकोनातून अद्वितिय ठरला असून याद्वारे निवड करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रामीण भागातील मुलांमध्ये लक्षणिय परिवर्तन झाले आहे. शेतीला अधिक आकर्षक स्वरूपात व्यवसायाच्या माध्यमातून कसे केले जाऊ शकते, हे त्यांना तज्ज्ञ मार्गदर्शकांमार्फत शिकविले जात आहे. त्यांना कृषी आधारित विविध नाविण्यपूर्ण प्रकल्पाद्वारे स्वत:च्या अनुभवातून आत्मविश्वासावर शिकता यावे यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. भारतातील प्रतिथयश व्यवस्थापन संस्था, आयआयएम मधील पदवीधारक या उपक्रमाचे संनियंत्रण करत असून या १८ शाळांसाठी विशेष कृषी व पूरक व्यवसाय व्यवस्थापन शिक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे शिक्षक विद्यार्थ्यांना त्यांच्या निर्णयानुसार निवडलेल्या छोट्या प्रकल्पांच्या प्रारंभिक उभारणीसाठी मदत करतात. या प्रकल्प अथवा उच्च तंत्रज्ञानाने केलेल्या प्रायोगिक शेतीतून विद्यार्थ्यांना अनुभवासहित आर्थिक व्यवस्थापनही अप्रत्यक्षपणे शिकण्यास मिळत असल्याने शिक्षण क्षेत्रात या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

जैन इरिगेशन व नान्सी बेरी फाउंडेशन यांच्या वतीने मागील काही वर्षांपासून कृषी क्षेत्राला भविष्यात चांगले नायकत्व मिळावे, नेतृत्व मिळावे, या उद्देशाने विविध उपक्रम हाती घेतली आहेत. तीन वर्षांपूर्वी या दृष्टीने जैन हिल्स येथे देशभरातील सुमारे 70 पेक्षा अधिक राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कंपन्या व काही बँक प्रमुखांच्या सहभागातून ‘ॲक्शन प्लॅटफॉर्म’ची स्थापना करण्यात आली. या हा उपक्रम घेण्यात आला आहे.

जैन इरिगेशनचे संस्थापक पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन हे शालेय पातळीवरील कृषी शिक्षणाबाबत सदैव आग्रही असायचे. त्यांच्या या दूरदृष्टीतून कृषी क्षेत्राला चांगले नायक मिळावेत या दृष्टीने नियोजन केले आहे. त्यानुसार 2020 पर्यंत दोन कोटी शेतकर्‍यांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार ॲक्शन प्लॅटफॉर्मच्या समन्विका नान्सी बेरी यांनी व्यक्त केला. या संमेलनात त्यांची प्रत्यक्ष उणीव जाणवणार असली तरी विचारांनी, आठवणींनी ते आपल्यासोबत असल्याने त्यांचे भारतातील मुलांसाठीचे स्वप्न सत्यात उतरविण्याच्या दृष्टीने आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू असे त्यांनी स्पष्ट केले.

‘फली’चे ठळक वैशिष्ट्य

  • प्रत्येक शाळेत पूर्णवेळ कृषी तज्ज्ञांची नेमणूक
  • आठवड्यातून दोनदा शेती आणि शेतीसंबंधित व्यवसायांबद्दल विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती.
  • शाळांमध्ये प्रत्यक्षात नव्या तंत्राच्या साह्याने विद्यार्थी राबवितात प्रकल्प.
  • ग्रीन हाऊस, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, विविध औजारे शाळांमध्ये प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध.
  • विद्यार्थ्यांना माती परीक्षण, शेतमाल लागवड ते बाजारपेठबाबत मार्गदर्शन.
  • शेतीसाठी विद्यार्थ्यांना ऊतिसंवर्धित रोप लागवड, सुधारित वाणांचा उपयोग, कमी पाण्यासाठी ठिबक सिंचन, माहिती व तंत्रज्ञान, ग्रीन हाऊस, शेडनेट, विविध कृषी औजारे, दुग्धव्यवसायासाठी जनावरांच्या संकरित प्रजाती व आधुनिक पशुपालन तंत्र, कोल्ड स्टोररेज, शेतमाल साठवणूक, पॅकेजिंग व प्रक्रिया आदीबाबत मार्गदर्शन.
  • विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांनाही अप्रत्यक्ष मार्गदर्शन.
  • उपक्रमाअंतर्गत निवड करण्यात आलेले ९५ टक्के विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील.
  • कृषी शास्त्र, फलोत्पादन, पशुशास्त्र, कृषी यांत्रिकीकरण व कृषी अभियांत्रिकी, अन्न प्रक्रिया शास्त्र,  कृषी व्यवसाय इत्यादी विषय विद्यार्थ्यांना शिकविले जातात.

संबंधित सादरीकरण व इंग्रजी प्रेसनोटसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

FALI overview at April 2016.compressed

future agriculture leaders of India

Itinerary- 2nd FALI Symposium 23-24.04.2016

 

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s