स्व. भवरलालजी जैन यांना ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनुर’ पुरस्कार

चिंचवड, पुणे (प्रतिनिधी) 24 : – स्व. भवरलालजी जैन यांचे खान्देशच्या विकासात मोलाची भर घातली त्यांच्या या कार्यास अधोरेखित करून पुण्यातील कान्हदेश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक कला मंच महाराष्ट्रतर्फे जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांना 2016 चा ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनुर’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चिंचवड पुणे येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात तिसरे एकदिवसीय अहिराणी साहित्य संमेलन 24 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आले होते. भवरलालजी जैन यांना मरणोत्तर जाहीर झालेला हा पुरस्कार अहिराणीच्या अभ्यासक, साहित्यिक डॉ. उषा सावंत यांच्याहस्ते भवरलालजी यांचे नातू राहूल जैन व प्रसिद्धी विभागातील सहकारी किशोर कुळकर्णी यांनी स्वीकारला. यावेळी संमेलनाचे कार्याध्यक्ष नामदेव ढाके, स्वागताध्यक्ष विवेक ठाकरे, कान्हदेश अहिराणी कस्तुरी साहित्य, सांस्कृतिक कला मंचच्या संस्थापक सौ. विजया मानमोडे, अहिराणी साहित्यिक देविदास हटकर, डॉ. रमेश सूर्यवंशी, बापूसाहेब पिंगळे तसेच चित्रपट दिग्दर्शक विनोद तरडे, योगेश कुळकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

24 एप्रिल रोजी एक दिवसाचे अहिराणी बोली साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यात अहिराणीचे साहित्यिक, अभ्यासक यांच्यासह चिंचवड, जळगाव, धुळे, नाशिक आणि नंदूरबार येथील अहिराणी भाषा प्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. यावेळी या संमेलनाच्या अध्यक्ष तथा अहिराणीच्या अभ्यासक डॉ. उषा सावंत यांनी जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचा गौरव केला. ठिबक सिंचन, उच्च कृषी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ज्यांनी विकासाचा मार्ग खुला केला. त्यांना शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा ध्यास होता ते शेतीच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबद्ध होते. असे सांगून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. अहिराणीला वाहिलेल्या अहिराणी कस्तुरी या मासिकाच्या संपादीका सौ. विजया मानमोडे यांनी साहित्य संमेलनाबाबत माहिती दिली. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष विवेक ठाकरे यांनी देखील स्व. भवरलालजी जैन यांच्या जीवन कार्याची माहिती उपस्थितांना दिली.

फोटो कॅप्शन – ज्येष्ठ अहिराणी साहित्यिक, अभ्यासक डॉ. उषा सावंत यांच्याहस्ते स्व. भवरलालजी जैन यांचा ‘अखिल भारतीय खान्देश कोहिनुर’ पुरस्कार स्वीकारताना राहूल जैन, किशोर कुळकर्णी शेजारी विवेक ठाकरे, नामदेव ढाके, विजया मानमोडे आणि बापूसाहेब पिंगळे आदी

 

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s