भवरलालजी जैन यांचा राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट उद्यमिता पुरस्काराने जम्मूकाश्मीर येथे गौरव

जळगाव दि. २८ (प्रतिनिधी): जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांना यावर्षीचा काउंसील ऑफ स्टेट इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट ॲन्ड इन्व्हेसमेंट कार्पोरेशन ऑफ इंडीया (कॉसीडीसी) चा उत्कृष्ठ उद्यमिता पुरस्कार बहाल करण्यात आला. जम्मूकाश्मीरचे वाणिज्य उद्योगमंत्री चंदर प्रकाश गंगा यांचा हस्ते हा पुरस्कार जैन इरिगेशनचे दिल्ली येथील वरिष्ठ सहकारी विजयकुमार लाभ यांनी स्वीकारला. यावेळी कॉसीडीसीचे अध्यक्ष पी जॉय ओमेन, जम्मू ॲन्ड कश्मीर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक तथा कॉसीडीसीचे उपाध्यक्ष अमीत शर्मा व देशभरातील निमंत्रीत उद्योजक या समारंभासाठी उपस्थित होते.

जैन इरिगेशनने जम्मू व काश्मीरच्या औद्योगिक विकासासाठी पुढे यावे असे ना. गंगा यांनी आवाहन केले. सरकारच्या वतीने आम्ही सर्वोतोपरी सहकार्य करु असे त्यांनी स्पष्ट केले. जैन इरिगेशनने तेथील केशर व सफरचंदाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत ठिबक सिंचन व कृषीतंत्र पोहचविले. यामुळे शेतकऱ्यांना आता अधिकचे उत्पन्न घेता येणे शक्य झाले. याचबरोबर तेथील उणे तापमानातही सक्षम ठरणाऱ्या एचडीपीई पाईप प्रणालीची उपलब्धी जैन इरिगेशनने करून दिल्याने तेथील पाणी पुरवठा योजनांना नवे तंत्रकुशल स्वरूप आले आहे. लडाख-लेह येथे वृक्षलागवडीला पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने सोनम वॉगचुक यांच्या द आईस स्तुपा प्रकल्पाला जैन इरिगेशनने कमी तापमानातील मजबूत ठरणारी पाइपलाईन व ठिबक सिंचन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. जम्मू-काश्मीरमध्ये उच्च तंत्रज्ञानाच्या या उपलब्धीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

कॉसीडीसी ही भारतातील प्रत्येक राज्याच्या वित्तीय महामंडळ व औद्योगिक विकास महामंडळाची शिखर संस्था आहे. या संस्थेतर्फे हे पुरस्कार दिले जातात. भवरलालजी जैन यांनी लघु उद्योगापासून सुरवात केली. पपेन, फळप्रक्रिया, पाईप, कृषी, सूक्ष्म सिंचन, पीव्हीसी शीटस्‌, उतीसंवर्धन, सौर ऊर्जा, सौर पंप या क्षेत्रात जैन इरिगेशनला जागतिक नकाशावर पोहचविले. व्यवसायाच्या वित्त व्यवस्थापनातील पारदर्शकता व त्यांच्या योगदान लक्षात घेवून निवड समितीने भवरलालजी जैन यांचे नाव निश्चित केले.

आईस स्तुपा प्रकल्पाविषयी –

जम्मु काश्मीरच्या लेह-लडाख परिसरात कडाक्याच्या थंडीसह पाण्याचाही प्रश्न आहे. उन्हाळ्यात उष्णतेमुळे तेथील बर्फ वितळून याचे पाणी नदी, नाल्यांना मिळते. या पाण्याचा शाश्वत उपयोग होण्याकरीता जैन इरिगेशनने तेथील पिकांसाठी वातावरणाच्या गरजेनुरूप ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले. ज्या भागात नदी नाले नाहीत अशा भागासाठी आइस स्तुप अर्थात बर्फाचे छोटे टेकडे कृत्रिमरित्या तयार करण्यात आले. यासाठी हिवाळ्याच्या तोंडावर पहाडातील पाणी नैसर्गिक गुरुत्वाकर्षण शक्तीने एचडीपीई पाईपलाईनच्या माध्यमातून स्तुपाच्या केंद्रापर्यंत वळविण्यात आले. याच पाण्याच्या माध्यमातून कडाक्याच्या थंडीमुळे तेथे बर्फाचा छोटा डोंगर निर्माण झाला. याच डोंगराचे पाणी पुढे पिकांसाठी देता आले. हे मानव निर्मित स्तुप सुमारे ३० मिटर उंचीचे उभारून त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Photo caption – जम्मूकाश्मीरचे वाणिज्य उद्योगमंत्री चंदर प्रकाश गंगा यांचा हस्ते उत्कृष्ठ उद्यमिता  पुरस्कार स्वीकारताना जैन इरिगेशनचे दिल्ली येथील वरिष्ठ सहकारी विजयकुमार लाभ

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s