जागतिक परिषदेत 30 मे रोजी अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

जैन हिल्स येथे सुरु असलेल्या भविष्यातील आव्हानांचे स्वरुप आणि कृषीक्षेत्रातील पर्याय या विषयावरील जागतिक परिषदेच्या समारोपाला दि. 30 मे रोजी भारतातील विविध राज्यातील 19 प्रगतशिल व प्रयोगशिल शेतकऱ्यांचा अमित उद्यानरत्न पुरस्कार (२०१६) गौरव करण्यात येणार आहे. त्यांची माहिती पुढील प्रमाणे…

Continue reading “जागतिक परिषदेत 30 मे रोजी अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव”

Advertisements

जैव, माहिती आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरातच शेती व शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग एस. के. पट्टनायक, केंद्रिय सचिव, कृषी मंत्रालय, भारत सरकार

जळगाव, दि. 28 (प्रतिनिधी) – भारतातील कृषी क्षेत्रासमोर यापूर्वीही अनेक आव्हाने आली. त्या- त्या काळात आलेल्या आव्हानांवर मात करुन कृषी क्षेत्राने अन्न सुरक्षिततेमध्ये स्वयंपूर्णता साध्य करुन दाखविली. आता दुष्काळाच्या माध्यमातून पाण्याचे व वातावरणातील बदलाचे कृषी क्षेत्रासमोर आव्हान आहे. हे आव्हान परतवून लावण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर, कमी पाऊस असलेल्या भागात जलसंधारण व शेततळ्यांची निर्मिती आणि जे पाणी आहे त्याच्या योग्य वापरासाठी सूक्ष्मसिंचनाचा कटाक्षाने वापर करणे क्रमप्राप्त झाल्याचे प्रतिपादन केंद्रिय कृषी विभागाचे सचिव एस. के. पट्टनायक यांनी केले. गांधीतीर्थ येथील सभागृहात आयोजित भविष्यातील आव्हानांचे स्वरुप आणि कृषीक्षेत्रातील पर्याय या विषयावरील जागतिक परिषदेच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. ए. श्रीवास्तव, डॉ. ए. आर. पाठक, डॉ. राजेंद्र एस. परोडा, जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन, डॉ. पी. एल. गौतम, डॉ. डी. पी. रे, श्रीमती बिमला सिंग, डॉ. एच. पी. सिंग उपस्थित होते. लेफ्टनंट अमितसिंग मेमोरियल फाऊंडेशन, जैन इरिगेशन सिस्टीम्स्‌ लि. ए. एस. एम फाउंडेशन, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आठव्या प्रेम जागृती संगोष्ठी अंतर्गत ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. Continue reading “जैव, माहिती आणि नॅनो तंत्रज्ञानाच्या वापरातच शेती व शेतकऱ्यांना प्रगतीचा मार्ग एस. के. पट्टनायक, केंद्रिय सचिव, कृषी मंत्रालय, भारत सरकार”

सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती

सकस, दर्जेदार अन्न शेतीतून पिकविण्याच्या दृष्टीने सायने (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथील थोर गोसेविका स्व. जमनाबेन कुटमुटिया यांचे सुपुत्र जितेंद्रभाई कुटुमुटिया यांनी आपली जमीन सेंद्रिय कर्ब, लाभदायक जिवाणू व सुपीक घटक यांनी श्रीमंत केली आहे. त्यांचा “निसर्गप्रेम’ फार्म म्हणजे सेंद्रिय शेतीची खुली प्रयोगशाळाच झाली आहे. साधारणपणे २०१० पासून सुरु झालेल्या या त्यांच्या प्रयोगाला आता चांगले स्वरुप प्राप्त झालेले आहे. सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणाऱ्या जितेंद्र कुटमुटिया यांच्या प्रेरणादायी यशस्वी सेंद्रीय शेतीच्या प्रयोगाबाबत त्यांच्याशी जैन इरिगेशनचे पत्रकार किशोर कुळकर्णी यांच्याशी झालेल्या चर्चेचा संपादीत गोषवारा…

Continue reading “सकस अन्ननिर्मितीचा ध्यास घेणारी जितूभाईंची सेंद्रिय शेती”