मिरज रेल्वे पाईपलाइनच्या युद्धपातळीवरील पूर्तीसाठी सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी केला जैन इरिगेशनचा गौरव

जळगाव, ता. २ : लातूरकरांसाठी रेल्वेने दिल्या जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी सुमारे ३ किलोमीटर पाईपलाईन जैन इरिगेशन कंपनीने वेळेत उभारल्याबद्दल सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी अध्यक्ष अशोक जैन यांना खास पत्र पाठवून या कामाबद्दल गौरव केला आहे. पाईप व सूक्ष्मसिंचनाच्या व्यवस्थापनासाठी शेतकऱ्यांजवळ उन्हाळ्यात वेळ असल्याने या काळात जैन इरिगेशनकडे विविध उत्पादनाची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अशा व्यस्त वेळापत्रकातही मिरजसाठी त्यांच्या गरजेनुरूप विशेष आकाराचे पाईप जैन कंपनीने तयार करून दिल्याने हे काम वेळेत शक्य झाले.

पिण्याच्या पाण्यासाठी त्रासलेल्या लातूरकरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या सांगली जिल्हा प्रशासन व रेल्वेने युद्ध पातळीवर पाईपलाईनचे काम करून शासकीय कामातील गतिशीलतेचा एक नवा अध्याय निर्माण करून दाखविला. यातील आव्हानात्मक काम होते ते रेल्वे यार्डापर्यंतच्या पाईपलाईनचे. रेल्वेची यंत्रणा मर्यादित असल्याने नव्या पाईपलाईनचे काम वेळेच्या आत करणे अत्यंत आवश्यक होते. याचबरोबर यासाठी लागणाऱ्या ठराविक आकाराचे पाइप्स वेळेस उपलब्ध होणे गरजेचे होते. अवघ्या भारताचे लक्ष वेधून घेणाऱ्या या तात्पुरत्या स्वरूपातील प्रकल्पाची लवकरात लवकर उपलब्धी ही पाईपलाईनच्या पुरवठ्यावर व हे काम वेळेच्या आत पूर्ण करण्यावर अवलंबून होती.

सदर कामामध्ये जैन इरिगेशनने आपल्या सामाजिक कर्तव्याला पुढे ठेवत आपली संपूर्ण तंत्र कुशलता निवडक मनुष्यबळासहित वेळेत उपलब्ध करून दिली. या सहकार्यामुळे पाईपलाईनच्या कामासाठी काही महिन्यांचा लागणारा कालावधी अवघ्या नऊ दिवसावर आणता आला. या कामात सहा रेल्वेक्रॉस व दोन रस्ते क्रॉस होते. युद्धपातळीवर हे काम केल्यामुळे लातूरला वेळेत रेल्वेने पाणी पोचविता येऊ शकले. रेल्वेने यासाठी खास पन्नास वॅगनच्या दोन गाड्या कोटा येथून पाठविल्या. याचबरोबर यासाठी स्वतंत्र रेल्वे रूळासह यार्डाची उभारणी करावी लागली. या यार्डापर्यंत ठराविक अंतराला आऊटलेट असलेली पाईपलाईन उभारणे आवश्यक होते. या कामासाठी सांगली जिल्हा प्रशासनाने जैन इरिगेशनकडून सहकार्य मागितले होते. जैन इरिगेशनने विशेष जबाबदारी पार पाडल्यामुळे सांगलीचे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी खास जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांना पत्र पाठवून या कार्याबद्दल सदिच्छा व्यक्त केल्या.

फोटो कॅप्शन : १. जैन इरिगेशनतर्फे पाईपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वेच्या वॅगनद्वारे पाणी भरणे असे सोपे झाले आहे. २. रेल्वे क्रॉसिंगच्या खालून पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असताना.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s