नभातल्या ‘त्या’ ताऱ्याला भवरलालजींचे नाव

जळगाव, ता. 12 : आकाशातल्या अनंत पोकळीला मर्यादा नसते. हेच आकाश मात्र रात्रीला लख्ख ताऱ्यांच्या प्रकाशात प्रत्येकाच्या दृष्टीत सामावून जाते. मानवी जीवनातील चैतन्याच्या या प्रवासाची गोळाबेरीज शेवटी त्या नभातल्या ताऱ्यापाशी जाऊन पोहोचते. प्रत्येकाला मोहात टाकणाऱ्या त्यातील एका ताऱ्याला आपल्या मानलेल्या भावाचे नाव अधिकृतरित्या कायमस्वरूपी देण्यासाठी अमेरिकेतून डॉ. रे गोल्डबर्ग सारख्या व्यक्तीने पुढाकार घेणे, हे त्या ताऱ्याच्या नावापेक्षाही कित्येक पटीने अधिक मोठा गौरव समजायला हवा.
सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात प्रगतीची बिजे पेरणाऱ्या पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करण्यासाठी डॉ. रे गोल्डबर्ग यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या पुढाकारातून इंटरनॅशनल स्टार रजिस्ट्री या जगमान्य संस्थेने Lyra RA 19h 13m 28s D 36′ 45′ या ताऱ्याला आता भवरलालजी जैन हे कायमचे नाव दिले आहे. हे नाव ‘द रजिस्ट्रिज व्हॉल्ट’ मध्ये स्वित्झर्लँड आणि अमेरिकेमध्ये कॉपीराईट कार्यालयात नोंदणीकृत करण्यात आले आहे. संस्थेचे रजिस्ट्रार ई. एम. स्टोलपे यांनी याबाबत अधिकृत पत्र व प्रमाणपत्र जैन इरिगेशनकडे सुपूर्द केले आहे.
जागतिक पातळीवर व्यवस्थापन शास्त्रातील अध्वर्यू म्हणून एक्यान्नव वर्षीय प्रो. डॉ. रे गोल्डबर्ग यांना ओळखले जाते. अमेरिकेतील हॉवर्ड बिझनेस स्कूलचे प्रोफेसर एमेरिटस् आहेत. कृषी व्यवसाय व्यवस्थापन शास्त्राचे जागतिक प्रणेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. जैन हिल्स, जळगाव येथे ‘ॲक्शन प्लॅटफॉर्म’ अंतर्गत झालेल्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी ते आले होते. जैन इरिगेशनने आपली व्यावसायिकता जपत सामाजिक कार्याद्वारे जो अपूर्व ठसा निर्माण केला त्याबाबत त्यांनी अभ्यास केला. जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. भवरलालजी जैन यांच्यावर स्वतंत्र अभ्यास करून एक विशेष असा अभ्यासक्रम अमेरिकेतील हॉवर्ड बिझनेस स्कूलच्या व्यवस्थापन शास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे.

मूल्यवृद्धीमध्ये भवरलालजींनी आपले नेतृत्व निर्विवादपणे सिद्ध करून दाखविले आहे. ग्रामीण दारिद्र्य आणि वातावणातील बदल या दोन्ही प्रश्नांवर मात करीत त्यांनी लाखो शेतकऱ्यांना उच्च कृषी तंत्रज्ञानाद्वारे प्रगतीचा मार्ग दिल्याचा गौरव डॉ. रे गोल्डबर्ग यांनी केला. मी एवढे कल्पक आणि रचनात्मक नेतृत्व माझ्या उभ्या आयुष्यात पाहिले नाही. छोट्या शेतकऱ्यांप्रती त्यांनी जे कार्य केले आहे, त्या कार्यापुढे आम्ही कृतज्ञ आहोत, असा गौरव त्यांनी केला.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s