ब्रिटिशकालीन पाणीपुरवठा पाइपलाईनमुळे मेहरुणची पाणी गळती अनेक वर्षांपासून गळती होणारे कोट्यवधी लिटर्स पाणी वाचणार– अशोक जैन

मेहरुण तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स होणारी पाणी गळती ही ब्रिटिश कालीन पाणी पुरवठ्यासाठी केलेल्या इंटेकवेल व पाईपलाईनमधून असल्याचे तज्ज्ञांच्या निदर्शनास आले. जैन इरिगेशनने युद्धपातळीवर कामाच्या नियोजनुसार प्राथमिक काम 3 दिवसांत पूर्ण केले आहे. आता गळती रोखण्याच्या उपाययोजना उद्या 16 पासून कार्यान्वित होतील. येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल अशी माहिती जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कामाची पाहणी करताना दिली. त्यांच्यासमवेत महापौर नितीन लढ्ढा, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष भरत अमळकर, सभापती नितीन बरडे आदी उपस्थित होते.

गळती शोधण्यासाठी मेहरुण तलावाच्या उत्तरेकडील बाजूला असलेल्या सांडव्याचे खोदकाम गेल्या तीन दिवसांपासून करण्यात येत आहे. या खोदकामात ब्रिटिश कालीन जुनी पाणी पुरवठ्याची पाईपलाईन आणि व्हॉल्व्ह आदी सापडले. काल रात्री एक छोटी पक्क्या बांधणीची पाणी पुरवठा विहीर आढळून आली. त्याकाळी तलावातील जलपातळीत वाढ होऊन बांधाला धोका पोहचू नये, यासाठी बांधातून पाइप टाकून वरच्या बाजूस फ्लोटर व्हॉल्व्ह बसविण्यात आला होता. त्याच प्रमाणे खालच्या बाजूला पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्ह बसविण्यात आलेला असल्याचे निदर्शनास आले. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी 2 मैल अंतराची लोखंडी पाईपलाईन टाकून मेहरूण तलावातून जळगावला पाणी पुरवठा होत असे.

मेहरुण पाणी पुरवठा योजनेचा संदर्भ गॅझेटियरमध्ये…

1878 -79 मध्ये जळगाव नगर पालिकेने तत्कालिन सरकारकडून 6547 पाउंड अर्थात 65, 470 रुपये कर्ज घेऊन रस्ते, विहिरी, गटारी आणि मुख्यत्वाने मेहरुणच्या या पाणी पुरवठा योजनेचाही समावेश होता. 1881 मध्ये जळगावची लोकसंख्या 9 हजार 918 इतकी होती. असा संदर्भ 1886 मध्ये लंडन येथून प्रकाशित झालेल्या द इंपरियल गॅझेटीयर ऑफ इंडिया’ या गॅझेटीयरमध्ये नोंद आढळलेली आहे. हा उपलब्ध जुना संदर्भ विचारात घेतला असता दीडशे वर्षेपूर्वीची ही पाईपलाईन असल्याचे सिद्ध होते. कालांतराने ही पाणी पुरवठा योजना संपुष्टात आली. गेल्या अनेक वर्षांपासून त्या व्हॉल्व्ह व पाइपलाईनीतून गळती होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया जात होते.

मेहरुण तलावाच्या कामात खान्देश कन्या बहिणाबाईंचाही सहभाग…

बहिणाईची गाणी या पुस्तकात बहिणाबाईंचे पुत्र कवी स्व. सोपानदेव चौधरी यांनी या तलावाच्या कामात खान्देशकन्या सुप्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचाही सहभाग असल्याची नोंद केली आहे. सोपानदेव चौधरी यांच्या लेखनानुसार, बहिणाबाई 16- 17 वर्षांच्या असताना जळगावला आल्या. त्यावेळी दुष्काळ होता. शासनातर्फे मेहरुण तलावाचे काम सुरु होते. या कामात मजूर म्हणून बहिणाबाई चौधरी यांनी देखील काम केले आहे. मेहरुण तलावाच्या कामात बहिणाबाईंचाही सहभाग असल्याचे या पुस्तकात लिहिले आहे.

गळती रोखण्या संदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते याचे निदान होऊ शकले नव्हते. जैन इरिगेशनच्या पुढाकाराने संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होत असल्याचे तज्ज्ञांच्या लक्षात आले. तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरशः वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या पुढाकाराने कंपनीचे सिव्हिल विभागाचे सहकारी अव्याहत कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, सिव्हिल विभागाचे अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. सामाजिक बांधिलकी मानून जैन इरिगेशनने मेहरुण तलावाची गळती रोखण्यासाठी कृतिशील पाऊल उचलून प्रत्यक्ष काम सुरू केले. याबाबत महापौर नितीन लढ्ढा यांनी जैन इरिगेशनचे आभार मानले.

Mehrun photo 15 May 2015

फोटो कॅप्शन – मेहरुण येथील पाणी गळती दुरुस्तीच्या कामाला भेट देताना जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, शेजारी महापौर नितीन लढ्ढा, क्रेडाईचे अनिष शाह, भरत अमळकर, पी.एम. चोरडिया, अभियंता भिरुड आदी मान्यवर

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s