संग्रहालयातील नाण्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे घडते दर्शन- महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागारचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर

संग्रहालयातील विविध कालखंडातील नाण्यांच्या माध्यमातून सांस्कृतिक एकात्मतेचे दर्शन घडते. नाण्यांना वाचण्याची कला मात्र अवगत असणे आवश्यक असल्याचे विचार महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागारचे संचालक डॉ. दिलीप बलसेकर यांनी व्यक्त केले. ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस’च्या औचित्याने गांधीतीर्थ येथे हॉबी क्लब मधील सदस्यांच्या दुर्मिळ ऐतिहासिक वस्तुंचे प्रदर्शन त्याच प्रमाणे संग्रहालय आणि सांस्कृतिक एकात्मता या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौ. रुबल अग्रवाल, गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त सेवादास दलुभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, हॉबी क्लब जळगावचे मजीद झकेरिया, सुरेश पांडे यावेळी व्यासपीठावर उपलब्ध होते.

या व्याख्यानाच्या आरंभी गांधीतीर्थ येथे जळगाव येथील जैन इरिगेशनचे सहकारी दामोदर इंगळे यांचे इंडिया बुक, लिम्का बुक, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्ड मध्ये नोंद झालेल्या ८५००० विविध बटनांचा संग्रह, मजीदभाई झकेरिया यांची मौर्य, गुप्त, सातवाहन काळातील चांदीची नाणी, बाबर ते आलमगीर पर्यंत सर्व मुघल राजवटीची नाणी, छत्रपती शिवाजी महाराज व मराठा कालखंडातील नाणी, ब्रिटीश व विविध संस्थानांची नाणी यांचा संग्रह. ११९ देशांच्या नोटा, फन्सी व चुकीची छपाई झालेल्या नोटा, जन्मदिन विशेष असलेल्या नोटा, भारत स्वतंत्र होतानाची ६०५ संस्थानांचे राजे-महाराजे यांची छायाचित्रे, गांधीजी बद्दलच्या चांदीच्या नोटा व त्यांची माहिती तसेच शेकडो अलंकार, अडकित्ते, शस्त्रास्त्रे यांचा संग्रह. डॉ. प्रकाश महाजन यांना आलेली, विविध देशातील पत्र मैत्रीमुळे संकलित केलेली १२ देशांची २००० तिकिटे ज्यात विविध पक्षी, वन्यप्राणी, व्यक्तिमत्वे, खेळ व निसर्ग अशा विविध विषयासंबंधीची पाकिटांसह संग्रह. साबीर शेख यांच्याकडील अतिशय जुन्या टाक, बोरू पासुन विविध देशांच्या वेगवेगळ्या रंगांच्या नव्या जुन्या १ इंचापासून पेन, एरीअल पेन, मार्बल पेन, वेगवेगळ्या कंपनींच्या १४००० पेन्स, विविध प्रकारच्या देश विदेशातील १६००० काडीपेटीचा संग्रह, २ सेमी ते ७ सेमी आकाराच्या – फुलांची चित्रे असलेल्या, विविध देवीदेवतांची चित्रे असलेल्या काडीपेटी आदी संग्रह प्रदर्शित करण्यात आला होता. त्याचे अवलोकन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, दलुभाऊ जैन, नाट्य कलावंत शंभू पाटील आदींनी केले.

मान्यवरांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. भुजंग बोबडे यांनी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवसाच्या औचित्याबाबत प्रास्ताविक केले. यूनेस्कोने मान्यता दिलेल्या जगातील संग्रहालयांना साहाय्यभूत ठरणारी संस्था इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ म्युझियम (ICOM) या संस्थेचे जगातील सांस्कृतिक परंपरांचे जतन, जीर्णोद्धार व संरक्षण करणे हे उद्दिष्ट आहे.  लेनिनग्राड येथे झालेल्या १९७७ सालच्या संस्थेच्या अधिवेशनात दरवर्षी १८ मे हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस’ म्हणून साजरा करण्याचा ठराव झाला. दरवर्षी या दिवशी आयकॉमने दिलेल्या विषयावर जगभरातील संग्रहालयांतून चर्चा, कृतिसत्र व अभ्यासवर्ग असे कार्यक्रम योजले जातात. १४५ देशांतील ३५,००० संग्रहालयामध्ये हा दिवस साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जैन हिल्स येथील गांधीतीर्थ येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

DSC_3833
गांधीतीर्थ येथे 18 मे रोजी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनाच्या औचित्याने आयोजित कार्याक्रमाचे दीप प्रज्ज्वलन करून उद्घाटन करताना महाराष्ट्र राज्य पुराभिलेखागार संचालक डॉ. दिलीप बलसेकर

जैन हिल्स येथील गांधीतीर्थमधील खोज गांधीजी की हे संग्रहालय आंतरराष्ट्रीय ख्याती मिळविलेले असून भारतातील संग्रहालय श्रेणीत सर्वप्रथम ग्रीन बिल्डींगचे मानांकन प्राप्त केलेले संग्रहालय  आहे. ३५,००० पेक्षा अधिक संग्रहालयांमधे साजरा होणारा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन जळगावातील हौशी संग्राहकांच्या हॉबी क्लबसोबत गांधीतीर्थ येथे आज साजरा केला. गांधीतीर्थचे सहकारी व इतिहास अभ्यासक भुजंग बोबडे यांनी तयार केलेल्या वस्तुसंग्रहालय वारसा यासंबंधी संपुर्ण माहिती असलेल्या www.museumsheritage.com या वेबसाईटचे लोकार्पण देखील जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

संग्रहालयात विविध पुरातन वस्तूंचा समावेश असतो परंतु त्या त्या राज्यकर्त्यांनी, त्या त्या कालावधीत चांदी, सोने आणि अन्य धातूंच्या नाण्यांची निर्मिती केली. सुमारे इसविसन पूर्व 600 म्हणजे अडीच हजार वर्षांपासून नाणे संग्रह संग्रहालयात आहेत. या नाण्यांमध्ये निसर्ग प्रतिके, देवी देवतांचे प्रतिके ठसविण्यात आले आहेत. भारत हा निसर्ग पूजक देश आहे, आपली संस्कृति निसर्ग पूजा करणाऱ्यांची असल्यामुळे ओघानेच निसर्ग प्रतिके नाण्यांवर आली आहेत. लिपी, आणि देवदेवतांची चित्रे देखील आलेली आहेत. या सगळ्यांची माहिती डॉ. बलसेकर यांनी आपल्या सादरीकरणातून दिली.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s