हे तर जगाला अहिंसेचा मंत्र देणारे केंद्र -हिरोशी शिमो, उपराज्यपाल, वाकायामा, जपान गांधी म्युझियमला जपानी शिष्टमंडळाची भेट

महात्मा गांधी यांच्या जीवनकार्याशी आणि त्यांच्या शांतीच्या संदेशाशी आम्ही खूप मनापासून जुळलेलो आहोत. जपानमध्ये शालेय अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना गांधींचे जीवनकार्य शिकविले जाते. आम्ही त्यांच्याविषयी जो अभ्यास केला त्याची प्रत्यक्षातील अनुभूती आम्हाला इथे गांधीतीर्थच्या म्युझियममध्ये अनुभवावयास मिळाल्याचे गौरवोद्‍‌गार जपानच्या वाकायामाचे उपराज्यपाल हिरोशी सिमो यांनी काढले. त्यांनी आज गांधी तीर्थला भेट देऊन संपूर्ण म्युझियमची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत थोरु कितायामा, योशिओ यामाशिता, अकिओ नाकागावा, हिदेकाज हिराई, तुषार टिंगोटे, महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक आण्णासाहेब शिंदे, शैलेंद्र बोरसे आदी उपस्थित होते.IMG_0238

जैन हिल्सस्थित गांधीतीर्थ येथील म्युझियमची पाहणी करताना वाकायामा, जपानचे उपराज्यपाल हिरोशी सिमो व मान्यवर.

गांधीतीर्थच्या म्युझियमसोबत जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांना या शिष्टमंडळाने भेट दिली. सिमो यांनी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन यांच्याशी यावेळी विविध विषयांवर चर्चा केली. गांधीतीर्थची पाहणी करताना सिमो म्हणाले, महात्मा गांधीजींनी जगाला सत्य, अहिंसा, प्रेमाचा मंत्र दिला. त्यांनी त्याकाळी अहिंसात्मक मार्गाचा अवलंब करुन मोठे परिवर्तन घडवले. हे म्युझियम पाहताना त्या काळात असल्याचा भास झाल्याचे ते म्हणाले. आजच्या धावत्या आणि अस्थिर वातावरणात विध्वंसाच्या टोकावर उभ्या असलेल्या जगाला गांधीजींचे विचार आवश्यक आहेत. त्यादृष्टिने गांधीतीर्थ हे म्युझियम आंतरराष्ट्रीय पातळीवर अहिंसेचा संदेश देण्यासाठी समर्थ असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. अनुभूती स्कुललाही या शिष्टमंडळाने भेट दिली. यावेळी जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूति इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन यांनी माहिती दिली.

IMG_0221

म्युझियमच्या पाहणीप्रसंगी वाकायामा, जपानचे उपराज्यपाल हिरोशी सिमो यांना माहिती देताना जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकीय संचालक अतुल जैन, अनुभूति इंग्लिश स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s