जागतिक परिषदेत 30 मे रोजी अमित उद्यान रत्न पुरस्काराने शेतकऱ्यांचा गौरव

जैन हिल्स येथे सुरु असलेल्या भविष्यातील आव्हानांचे स्वरुप आणि कृषीक्षेत्रातील पर्याय या विषयावरील जागतिक परिषदेच्या समारोपाला दि. 30 मे रोजी भारतातील विविध राज्यातील 19 प्रगतशिल व प्रयोगशिल शेतकऱ्यांचा अमित उद्यानरत्न पुरस्कार (२०१६) गौरव करण्यात येणार आहे. त्यांची माहिती पुढील प्रमाणे…

अमित उद्यानरत्न पुरस्कार (२०१६) –

बनप्पा एस तेली – कर्नाटकातील हंडीगुंड येथे गेल्या ४० वर्षापासून शेती करीत आहेत. आपल्या शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वाधिक उत्पादन त्यांनी घेतले आहे. उत्पादन वाढीच्यादृष्टीने त्यांनी इतर शेतकऱ्यांना देखील प्रोत्साहन दिले आहे. त्यांनी केळी, ऊस, हळद आणि भाजापाला या पिकांसाठी ठिबक सिंचन, जैन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. यापूर्वी त्यांचा कर्नाटक सरकारतर्फे कृषी पंडित हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. धारवाडच्या कृषि विद्यापीठाने देखील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना कृषि पंडीत म्हणून गौरविले आहे.

सिद्धराम बिरादार – उच्च विद्या विभूषीत सिद्धराम बिरादार कर्नाटक राज्यातील हिंगणी (बिजापूर) येथे २०१० पासून शेती करीत आहेत. २५ पैकी १४ एकरमध्ये त्यांनी स्वयंचलित ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केलेला आहे. उतिसंवर्धीत केळीची लागवड त्यांनी केली आहे. त्या जोडीला त्यांनी ऊसाची उत्तम शेती केली असून या दोन्ही पिकांसाठी ठिबक सिंचन प्रणाली त्यांनी वापरली आहे. उत्तम पिक असावे तर बिरादार यांचे. स्वयंचलित अत्याधुनिक ठिबक सिंचनाचा पाणी बचत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाबाब ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात.

बालक राम शर्मा – हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील उच्च विद्या विभूषित बालक राम शर्मा २००७ पासून आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करीत आहेत. सफरचंदाची ५ एकर शेती आहे. त्यातील पावणे चार एकरावर तीन वर्षांपूर्वी ठिबक सिंचनाचा अवलंब करून सफरचंदाची लागवड केली आहे. त्यांना ३० टन सफरचंदाचे उत्पादन मिळाले. यावर्षी त्यांना ६० टन उत्पादन होईल अशी त्यांची अपेक्षा आहे.

धीरेनभाई भानुभाई देसाई – गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातील पनेठा गावातील धीरेनभाई देसाई हे १९९४ पासून शेती करीत आहेत. त्यांनी शेतीचे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले आहे. ठिबक सिंचन यंत्रणेचा आणि उतिसंवर्धित केळी रोपांची लावगड त्यांनी केली आहे. त्यांनी एका हेक्टरमध्ये १२३.४ टन केळीचे सर्वोच्च उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन केवळ १० महिन्यात घेऊन हा विक्रम साध्य केलेला आहे. आपली संपूर्ण केळी त्यांनी दुबईला निर्यात केली आहे. त्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे तंत्र इतर शेतकऱ्यांना महत्त्व पटवून दिले आहे. त्यांच्यामुळे अनेक शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती करण्याची प्रेरणा मिळाली आहे. जैन इरिगेशनतर्फे २०१५ मध्ये गौराई उच्चतंत्र केळी पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.

अरविंदभाई भाईलालभाई पटेल – गुजरात राज्यातील आनंद जिल्ह्यातील ओडे गावातील उच्चविद्याविभूषीत अरविंदभाई पटेल हे १९९० पासून शेती करीत आहेत. ठिबक सिंचन, फर्टिगेशनसारख्या अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करून भाजीपाल्याचे उत्पादन घेत आहेत. त्यांनी १ हेक्टरमधून ६१ मे.टन इतके विक्रमी असे मिरचीचे उत्पादन घेतले आहे. ते इतर शेतकऱ्यांनी देखील उच्च कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा आग्रह धरतात.

जयप्रकाश गहलोत – राजस्थान राज्यातील कोटा येथील शेतकरी जयप्रकाश गहलोत २००२ पासून शेती करीत आहे. त्यांनी २०१० पासून ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा वापर यासारख्या आधिक तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे. शेतीतील नाविण्याची बाब म्हणजे ते सौर ऊर्जेवर चालणारा पंप वापरतात. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या शेती पंपाचा वापर इतर शेतकऱ्यांनीही वापरावा याबाबत ते मार्गदर्शन करीत असतात. त्यांची प्रेरणा घेऊन त्यांच्या गावातील सुमारे ८० टक्के शेतकरी ठिबक सिंचनाचे तंत्र आपल्या शेतीत वापरत आहेत. मुख्यत्वाने आपल्या शेतीत त्यांनी बटाटा, गहू, तांदूळ, लसूण या पिकांची लागवड करतात. २०१५ या वर्षाचा उत्तम शेतकरी म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.

रमेश शर्मा – राजस्थान राज्यातील अलवर येथील शेतकरी असून ते १९९५ पासून शेती करतात. २०१० पासून त्यांनी ठिबक व विद्राव्य खतांचा वापर करून भाजीपाला उत्पादन घेत आहेत. प्रति हेक्टरी २४ टन कांद्याचे उत्पादन त्यांनी घेतले आहे. त्याच प्रमाणे प्रतिहेक्टर ७६.८ टोमॅटोंचे उत्पादन घेतले आहे. गत वर्षी त्यांना प्रतिहेक्टरी भाजीपाल्यापासून साडेसात लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. टमाटर का पंडित म्हणू त्यांचा अलवर भागात नावलौकीक आहे.

चंद्रू सत्यनारायण – ओडिसा राज्यातील बारगड येथील शेतकरी असून ते २०१० पासून शेती करतात.  उतिसंवर्धित केळी रोपांची लागवड, ठिबक सिंचन आणि फर्टिगेशन हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य म्हणता येईल. ओडिसा राज्यात सर्वाधिक केळी उत्पादन घेण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. त्यांनी प्रति हेक्टर ३० टन इतके विक्रमी उत्पादन घेतले आहे. ठिबक सिंचनाचा अवलंब करून पामची शेती देखील ते करतात. त्यांना ओडिसा शासनाने फलोत्पादनाबाबतचा पुरस्कार देऊन गौरविले आहे.

गुणानिधी पांडे – ओडिसा राज्यातील बारगड येथील शेतकरी असून ते २०११ पासून शेती करतात.  आपल्या नाविण्यपूर्ण फळबागेसाठी ते नावाजलेले आहे. केळी आणि डाळिंबाचे उत्पादन ते घेतात. यासाठी त्यांनी संपूर्ण शेतीवर ठिबक सिंचन बसवून घेतले आहे. केळी व डाळिंबाचे उतिसंवर्धित रोपे ते लावतात. यांनी देखील ओडिसा राज्यातील केळीचे सर्वाधिक पीक घेण्याचा मान पटकाविला आहे.

कोंडूमुरी लक्ष्मणा मूर्ती – तेलंगणा राज्यातील खम्मम येथील शेतकरी असून ते २००५ पासून शेती करतात.  छोटे स्प्रिंकलर्स वापरून पाम वृक्षाची शेती ते करतात. त्यापासून त्यांना प्रति एकर १४ टन इतके पाम फळाचे उत्पादन घेतले आहे. तेलंगणा शासनाच्यावतीने उत्तम शेतकरी म्हणून त्यांचा गौरव झालेला आहे.

परापांडु रंगाराव – तेलंगणा राज्यातील खम्मम येथील शेतकरी असून ते १९९५ पासून शेती करतात.  ठिबक आणि विद्राव्य खतांचा अवलंब करून त्यांनी भाजीपाल्याचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. त्यांनी मिरची उत्पादनात विक्रम केला आहे. त्यांच्या शेतावर देश विदेशातील कृषि अभ्यासक येऊन त्यांच्या उत्पादन पद्धतीचा अभ्यास करतात. इतर शेतकऱ्यांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत अवलंब करावा याबाबत प्रेरणा देत असतात.

के. रमेश नायडू – आंध्रप्रदेश राज्यातील चित्तूर येथील शेतकरी असून गेल्या २० वर्षांपासून ते शेती करीत आहेत. त्यांच्या शेतात अतिघनदाट लागवड पद्धतीने आंब्याची लागवड केली आहे. केवळ तिसऱ्या वर्षात त्यांनी प्रति एकर ४.५ टन आंब्याचे उत्पादन घेतले आहे. हे उत्पादन प्रतिएकरी ६ टनांवर नेण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. अति घनदाट पद्धतीने आंबा लागवड करण्याबाबत ते इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात.

चरणसिंग ठाकूर – महाराष्ट्र राज्यातील अकोला येथील शेतकरी असून ते २००० पासून फलोत्पादन करतात. आपल्या ५० एकर क्षेत्रावर त्यांनी ठिबक आणि विद्राव्य, जैविक खतांचा अवलंब करून त्यांनी आंबा, संत्राचे उत्पादन घेतात. त्यांनी मिरची उत्पादनात विक्रम केला आहे. त्यांच्या शेतावर देश विदेशातील कृषि अभ्यासक येऊन त्यांच्या उत्पादन पद्धतीचा अभ्यास करतात. इतर शेतकऱ्यांना देखील आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत अवलंब करावा याबाबत प्रेरणा देत असतात.

विशाल रामेश्वर अग्रवाल – महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील अटवाडा येथील उच्चविद्याविभूषीत शेतकरी असून ते २००८ पासून शेती करतात. त्यांनी ठिबक आणि विद्राव्य खते यांचा अवलंब करून केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. प्रति एकरी ३७ टन केळीचे उत्पादन घेतले आहे. एका घडाचे सरासरी २६ किलो वजन घेतले आहे. ६ वर्षाच्या अल्पावधीतच ते प्रगतशिल शेतकरी म्हणून नावारुपास आले आहे.

प्रशांत वसंत महाजन – महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यातील तांदळवाडी येथील उच्चविद्याविभूषीत शेतकरी असून ते २००० पासून शेती करतात. ते २००८ पासून केळीची उतिसंवर्थित रोपे, ठिबक आणि विद्राव्य खते यांचा अवलंब करून केळीचे उत्पादन घेत आहेत. प्रति हेक्टर १०० टन एवढे केळीचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. काढणी आणि काढणी पश्चात हाताळणी, पॅकिंग हे त्यांचे वैशिष्ट्य असून त्यांनी आपल्या शेतातून थेट इराणला केळीची निर्यात केली आहे.

शहाजीराव नारायणराव जाचक – महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जाचकवस्ती येथील उच्चविद्याविभूषीत शेतकरी आहेत. आपल्या २० एकर जमिनीत ठिबक आणि विद्राव्य खते यांचा अवलंब करून उतिसंवर्थित केळी आणि डाळिंबाची लागवड त्यांनी केली आहे. दुष्काळी परिस्थितीत कमी पाण्यावर डाळिंब लावड करण्याबाबत जत तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. त्यांना १९९५ ला वसंतराव नाईक प्रतिष्ठानचा प्रगतशिल शेतकरी पुरस्कार तसेच १९९८ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या शेती विषयक पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे.

साधूराम शर्मा – उत्तर प्रदेश राज्यातील सहारणपूर जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी साधूराम शर्मा यांची वैशिष्ट्यपूर्ण शेती प्रसिद्ध आहे. २० वर्षांपासून त्यांनी मधुमक्षिकापालनाची वाट चोखाळली आहे. मधुमक्षिका पालन करण्याबाबत ते उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, सिक्कीम, पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तराखंडच्या शेतकऱ्यांनी देखील मधुमक्षिका पालन करावी याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले आहे. भारतातील सुमारे साडेचार हजारांवर शेतकऱ्यांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण दिले आहे. मध व मधापासून बनविलेले उत्पादने ते मध्यपूर्व राष्ट्रे आणि अमेरिकेत निर्यात करतात. त्यांनी मधुमक्षिका उत्पादन व प्रशिक्षण कंपनीची स्थापना केली आहे.

आर. मूर्ती – तमिळनाडू राज्यातील कोडाईकॅनल येथील प्रगतशिल शेतकरी आहेत. त्यांनी फुलोत्पादनाची शेती केली आहे. त्यांच्या बागेत गुलाब आणि शोभेची सर्वप्रकारची फुले मिळतात. कोडाईकॅनलच्या डोंगरांवर केशर लागवड करण्याचे प्रयोग केले आहेत. कोडाईकॅनलसारख्या भागात केसराची यशस्वी शेती होते हे त्यांच्या प्रयोगांनी सिद्ध करून दाखविले आहे. शेतकऱ्यांनी फलोत्पादनाकडे वळावे यादृष्टीने शेतकऱ्यांचे प्रबोधन देखील ते करीत असतात.

लव्हकुश चंद्राकर – छत्तीसगड राज्यातील दूर्ग येथील प्रगतशिल शेतकरी आहेत. गत ३० वर्षांपासून त्यांनी शेती करण्यास सुरवात केली. यांची १०० एकर शेती असून त्यात केळी, पपई, भाजीपाला आणि तांदूळाचे उत्पादन घेतात. त्यांनी ही सर्व पिके ठिबक सिंचन व विद्राव्य खते या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घेतली आहेत. ४५ एकरांवर उतिसंवर्धित केळी रोपे, ठिबक सिंचन, मल्चिग पेपर आदी वापरून प्रति एकरी ३३ टन एवढे केळीचे उत्पादन घेतले आहे. त्यांचा प्रति एकर सरासरी नफा सव्वा लाख रुपये इतका आहे. आधुनिक शेतीचा अभ्यास करण्यासाठी २००९ मध्ये ते इस्त्राईलच्या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले होते.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s