ऊसाला ठिबकसाठी सर्वांनीच आग्रही राहणे गरजेचे- अनिल जैन ऊसाचेही टिश्युकल्चर रोपे येत्या दोन वर्षात जैन इरिगेशन उपलब्ध करणार

जळगाव, दि. 4 ( प्रतिनिधी) –ऊस पिकाबद्दल पाण्याच्या दृष्टीकोनातून महाराष्ट्रात व्यापक चर्चा सुरु आहे. ती चर्चा करताना आपण या ऊस पिकानेच राज्याला 2 कोटी रोजगार निर्मितीची क्षमता व लाखों शेतकऱ्यांना शेतीतील उत्पन्नाबद्दल विश्वासार्हता दिल्याचे लक्षात घेतले पाहिजे. मोकाट पाण्यावर ऊस घेतल्यास पाण्याचा अपव्यय होणारच आहे. याचे आम्ही समर्थन करणार नाही परंतु या शेतकऱ्यांना उच्च कृषि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऊस पिकाचे उत्पादन घेण्यास आपण सर्वांनी चालना दिली पाहिजे असे आवाहन जैन इरिगेशनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी केले. महाराष्ट्र व कर्नाटक राज्याने ऊस पिक शंभर टक्के ठिबकखाली आणण्याचे धोरण स्वीकारले असून याला आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चालना दिली आहे. केंद्रसरकारने या बाबत शासकीय पातळीवरून स्पष्ट निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले. Continue reading “ऊसाला ठिबकसाठी सर्वांनीच आग्रही राहणे गरजेचे- अनिल जैन ऊसाचेही टिश्युकल्चर रोपे येत्या दोन वर्षात जैन इरिगेशन उपलब्ध करणार”

Advertisements