गांधी रिसर्च फाउंडेशनचा सिव्हीक अवॉर्डने गौरव

जळगाव, दि. २८ प्रतिनिधी– जैन इरिगेशनच्या सामाजिक उपक्रमातील महत्वाच्या भाग असलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनला बाम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे आर्ट, कल्चर व हेरिटेजचा सिव्हीक अवॉर्ड काल मुंबई येथे बहाल करण्यात आला. वरळी येथील फोर सिझन्सच्या सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अनिल जैन यांनी हा पुरस्कार नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णा यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲन्ड डेव्हलपमेंट ॲथॉरेटीच्या सदस्या श्रीमती व्ही. आर. अय्यर, बाम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पी. आर. रमेश, उपाध्यक्ष एफ. एन. सुभेदार आणि कार्पोरेट जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते. Continue reading “गांधी रिसर्च फाउंडेशनचा सिव्हीक अवॉर्डने गौरव”

Advertisements

महिला व पुरुषांच्या ऐकीतच वैष्विक शांती व विकासाची बिजे अहिंसा व सहिष्णुतेच्या प्रस्थापनेसाठी निर्धारासह परिषदेचा समारोप

 

जगभरातले २३ देश, ३५ भाषा यातील सीमारेषांना बाजुला सारत केवळ मानवता व मानवीमूल्यांना दृष्टिपथात ठेऊन गांधी तीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचा आज विश्वशांतीसाठी कटिबद्ध होऊन अधिक एकात्मतेने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करीत समारोप झाला. गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट ऑफ नॉनव्हायलन्स ॲण्ड पीस मदुराई यांच्या संयुक्तविद्यमाने जैन हिल्स येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषद आयोजण्यात आली होती.   Continue reading “महिला व पुरुषांच्या ऐकीतच वैष्विक शांती व विकासाची बिजे अहिंसा व सहिष्णुतेच्या प्रस्थापनेसाठी निर्धारासह परिषदेचा समारोप”

भवरलालजींच्या आठवणींसह त्या मातीवर स्थिरावल्या पिंपळाच्या मुळा!

_dsc1743

 

गांधीतीर्थ जैन हिल्स येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला परिषदेचा काल समारोप झाला. या परिषदेच्या अनोख्या उद्घाटनासाठी भारतासह 23 देशातील महिला प्रतिनिधींनी सोबत आणलेल्या मातीचे एकात्मरूप साधले गेले. गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, परिषदेच्या समन्वयिका जिल कार-हैरीस, मार्गारेट होगेनटोवियर, ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते पी.व्ही. राजगोपाल, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू सुदर्शन अयंगार, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, डॉ. जॉन चेल्लादुराई व परिषदेत सहभागी महिला प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. Continue reading “भवरलालजींच्या आठवणींसह त्या मातीवर स्थिरावल्या पिंपळाच्या मुळा!”