महिला व पुरुषांच्या ऐकीतच वैष्विक शांती व विकासाची बिजे अहिंसा व सहिष्णुतेच्या प्रस्थापनेसाठी निर्धारासह परिषदेचा समारोप

 

जगभरातले २३ देश, ३५ भाषा यातील सीमारेषांना बाजुला सारत केवळ मानवता व मानवीमूल्यांना दृष्टिपथात ठेऊन गांधी तीर्थ येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचा आज विश्वशांतीसाठी कटिबद्ध होऊन अधिक एकात्मतेने पुढे जाण्याचा निर्धार व्यक्त करीत समारोप झाला. गांधी रिसर्च फाऊंडेशन, एकता फाउंडेशन ट्रस्ट भोपाळ आणि इंटरनॅशनल गांधी इन्स्टिट्युट ऑफ नॉनव्हायलन्स ॲण्ड पीस मदुराई यांच्या संयुक्तविद्यमाने जैन हिल्स येथे तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय महिला परिषद आयोजण्यात आली होती.  

परिषदेत सहभागी झालेल्या सर्व महिला प्रतिनिधींच्या संमतीने शांतता व सहिष्णुतेला अधोरेखित करणारे ठराव या परिषदेत पारित करण्यात आले. गेले तीन दिवस अत्यंत उत्साहात महाविद्यालयीन युवतींपासून ते विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यातून आपला अपूर्व ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ महिलांचा सहभाग हा या परिषदेचा मानबिंदू ठरला. तीन दिवसातील विविध चर्चासत्रातून नारी शक्तीचा, महिलांनी चालविलेल्या अनेक उपक्रमांचा, यातील सामाजिक योगदानाचा आलेख जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या महिलांनी पोटतिडकीने मांडला. अनेक आव्हाने येऊनही अत्यंत ध्यैर्य आणि संयमाने सहिष्णूता व अहिंसेला कुठेही तडा न लागू देता केलेल्या कार्याच्या अनुभवांचे आदानप्रदान करून या परिषदेत प्रत्येक महिलांनी बळ घेतले. ही परिषद या वैशिष्ट्यामुळे अधिक समृद्ध झाल्याची भावना या परिषदेच्या समन्वयिका तथा इंटरनॅशनल गांधीयन इनिशिटिव्ह फॉर नॉनव्हायलन्स ॲण्ड पीसच्या संचालिका जिल कार-हैरीस यांनी व्यक्त केले.

समारोपाच्या दिवशी दिवसभर झालेल्या ३ सत्रांमध्येही अरुणीमा शर्मा, गॅब्रिला कॅल्डरेओ (इटली), श्रेया जानी, डायना गिगलेमेनी आणि मरियम गेलास्वेली (जॉर्जिया), गॅब्रिला मोन्टेरियो (ब्राझील), रोया वयीअराद (द.आफ्रिका), लिया-ॲने इन्ग्राम (कॅनडा), झमिरा अबासोवा (अझरबैजान), सरस्वती (नेपाळ), लिली कुट्टी व भारतातील केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगड, बिहार आदी राज्यातील महिला प्रतिनिधींनी आपापल्या भागात शांती, समानता व सामाजिक क्षेत्रात सहिष्णुतापूर्ण मार्गाने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.

आंतरराष्ट्रीय महिला परिषद गांधीतीर्थ घोषणापत्र नावाने मांडले ठराव विश्वशांती आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेसाठी सर्वांनी एकजुट होऊन अहिंसेच्या मार्गानी आपापल्या पातळीवर पुढाकार घेण्याचे अपील या परिषदेत करण्यात आले. जगातल्या प्रत्येक व्यक्तिच्या सन्मानासमवेत प्रत्येकाची प्रतिष्ठा राखण्यासाठी पुढाकार, प्रत्येक मानवाला शांतीने राहण्याचा अधिकार प्राप्त करून देण्यासाठी एकमेकांना सहकार्य, शांती प्रक्रियेत महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाला अधोरेखित करणे, मानवी जीवनात महिलांच्या सहभागाशिवाय शांती ही अशक्यप्राय बाब आहेहे लक्षात घेऊन त्यांच्या सहभागाला चालना देणे, महिलांसमवेत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी पुरुषांना अधिकाधिक सहभागी करून घेणे याचा अंतर्भाव या परिषदेच्या ठराव अर्थात घोषणापत्रात करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्ती हा सुखद व शांतीमय भविष्यासाठी अधिक कटिबद्ध होईल. याच बरोबर आपल्या आईसमान पृथ्वी व पर्यावरणाचाही सन्मान करेल व याच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेईल. जिथे कुठे अन्याय असेल त्या अन्यायाचा विरोध हा अहिंसक माध्यमानेच करून प्रत्येक जण संहिष्णुतेला पुढे करेल यावर घोषणापत्रात भर दिला आहे.

गांधी रिसर्च फाउंडेशनचे चेअरमन न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी सर्व महिला प्रतिनिधींशी सकाळच्या सत्रात सुसंवाद साधला. भारतात शिव अर्थात शंकराला अर्धनारीश्वराचे प्रतिक मानले गेले आहे. स्त्रियांशिवाय पुरुषत्वाला पूर्णत्व नाही. चांगल्या समाज रचनेसाठी महिलांना सोबत घेणे आवश्यक आहे. आपले प्रयत्न हे स्त्री-पुरुष अशा दोघांच्याही समन्वयातून चांगल्या समाज रचनेसाठी असले पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.

International Woman Conf Group photo.jpg

फोटोकॅप्शन – आंतरराष्ट्रीय महिला परिषदेतील सहभागी देश-विदेशातील महिला प्रतिनिधींसह न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पी.व्ही. राजगोपाल आदी मान्यवर..

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s