गांधी रिसर्च फाउंडेशनचा सिव्हीक अवॉर्डने गौरव

जळगाव, दि. २८ प्रतिनिधी– जैन इरिगेशनच्या सामाजिक उपक्रमातील महत्वाच्या भाग असलेल्या गांधी रिसर्च फाउंडेशनला बाम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे आर्ट, कल्चर व हेरिटेजचा सिव्हीक अवॉर्ड काल मुंबई येथे बहाल करण्यात आला. वरळी येथील फोर सिझन्सच्या सभागृहात झालेल्या एका शानदार समारंभात जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संचालक अनिल जैन यांनी हा पुरस्कार नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णा यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी इन्शुरन्स रेग्युलेटरी ॲन्ड डेव्हलपमेंट ॲथॉरेटीच्या सदस्या श्रीमती व्ही. आर. अय्यर, बाम्बे चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पी. आर. रमेश, उपाध्यक्ष एफ. एन. सुभेदार आणि कार्पोरेट जगतातील अनेक मान्यवर उपस्थित होते.dsc_0042

नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णा यांच्या हस्ते सिव्हीक अवॉर्ड स्वीकारताना जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन व गांधी तिर्थचे समन्वयक उदय महाजन. शेजारी श्रीमती व्ही. आर. अय्यर व मान्यवर.

जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा गांधी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांची गांधी विचारांवर निष्ठा होती. या विचारातूनच त्यांनी आयुष्यभर शाश्वत विकासाला चालना देणारे विविध उपक्रम राबविले. नव्या पीढीपर्यंत गांधी विचार पोहचावेत, भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास नव्या पिढीला समजावा या उद्देशाने त्यांनी उभारलेल्या गांधी तिर्थला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अनिल जैन यांनी आनंद व्यक्त केला. गांधी विचाराचे आता हे जागतिक व्यासपीठ झाले असून याला शैक्षणिक जोड दिल्याने अधिकाधिक नव्या पीढीपर्यंत आम्ही पोहचत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भारतात विकासाचा विविध संधी दडलेल्या असल्याचे भक्कम चित्र आज आपण जगापुढे निर्माण करीत आहोत. मोठ्या प्रमाणात संधी आहेतही तथापि भविष्यातील विकासाच्या दृष्टिने पायाभूत विकासालाही तेवढ्याच भर आपण दिला पाहिजे याकडे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्णन यांनी लक्ष वेधले. यावेळी पुरस्कार विजेत्यांचे त्यांनी अभिनंदन केले.

गांधी तिर्थ विषयी माहिती

जैन हिल्स येथील दोन लाख चौरस फुटांच्या जागेवर गांधी रिसर्च फाउंडेशन आकारास आले आहे. या जागेवर 81 हजार चौरस फुटांचे बांधकाम कमी ऊर्जा संसाधन व साहित्यांचा वापर करून पूर्ण करण्यात आले. या बांधकामात जोधपुरी दगडांचा वापर करण्यात आला. येथील लॅण्डस्केपिंगसाठी वापरात येणारे पाणी हे शतप्रतिशत पुनर्वापर आणि प्रक्रिया केलेले आहे. हा कॅम्पस पूर्णतः वाहनमुक्त असून, केवळ बॅटरी ऑपरेटेड वाहनांनाच परवानगी आहे. परिसरातील ऑर्गेनिक वेस्टचा प्रक्रिया करून वापर केला जातो. या ठिकाणी लागणाऱ्या ऊर्जेची गरज ही अधिकाधिक प्रमाणात‘ग्रीन ऊर्जा बायोगॅस निर्मिती व सौरऊर्जेच्या माध्यमातून केली जाते.

बांधकाम करताना परिसरात तब्बल 450 मोठी झाडे वाचविण्यात आली असून, इतर वृक्षेही मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहेत. बांधकामात जास्तीत जास्त प्रमाणात रफ कोटा दगडांचा वापर, मातीच्या विटांऐवजी प्लायॲशपासून तयार केलेल्या विटा, सिमेंटऐवजी अधिकाधिक चुन्याचा वापर करण्यात आला असून, केवळ स्लॅबसाठी सिमेंटचा वापर केला गेला आहे. ऊर्जासंवर्धनाच्या दृष्टिकोनातून सौरतंत्रज्ञानाचा वापर करीत पाण्याच्या काटेकोर बचतपूर्ण वापराकडेही सुरवातीपासून लक्ष देण्यात आले आहे. वास्तूच्या आतील शीतलता अधिक राहावी यासाठी भिंतीत आतून पोकळी ठेवून बाहेरील बाजूसाठी दगडांचा वापर करण्यात आला आहे; याचबरोबर जास्तीत जास्त खेळती हवा व नैसर्गिक प्रकाश राहावा यासाठीही विशिष्ट रचना करण्यात आली आहे. वास्तूसाठी जोधपूर दगडांचाही वापर करण्यात आला आहे.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s