जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा दिवस साजरा

१४ एप्रिल हा दिवस भारत सरकारच्या आदेशान्वये “आग सेवा दिवस” म्हणून पाळला जातो. याच अनुषंगाने जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमिटेडच्या जैन हिल्स, जैन व्हॅली, जैन प्लॅस्टिक पार्कसह विविध आस्थापनात अग्निशमन सेवा दिवस साजरा करण्यात आला. याबरोबरच दरवर्षांप्रमाणेच या वर्षीदेखील १४ ते २० एप्रिल दरम्यान ‘सुरक्षा सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आले आहे. ‘आपले जीवन व संपत्ती वाचविणारा खरा सोबती – फायरमन’ या संकल्पनेवर आधारित हा सप्ताह साजरा करण्यात  येत आहे. आजपासून या सप्ताहाची सुरुवात झाली असून अग्नीशमन विभागातील आग विझवणा-या साहित्य व अग्नीशमन वाहनाचे पूजन वरिष्ठ अधिकारी सुनिल देशपांडे यांनी केले. तसेच मुंबई डॉकयार्ड व इतर आगीच्या अपघातांमध्ये वीरगती प्राप्त झालेल्या अग्नी सुरक्षा रक्षकांना श्रदधांजली अपर्ण करण्यात आली. यावेळी कंपनीचे वरिष्ठ सहकारी एस डी गुप्ता, व्ही पी पाटील, संजय पारख व इतर सहकारी उपस्थित होते.

यावेळी सुरक्षा विभागाचे प्रमुख डी. जे. शितोळे यांनी या दिवसाचे महत्त्व विषद केले. या वर्षाचा संदेश “आपले जीवन व संपत्ती वाचविणारा खरा सोबती – फायरमन” असा असून आपला जीव धोक्यात घालून जबाबदारी पार पाडणाऱ्या अग्नी सुरक्षा रक्षकांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव त्यांनी केला. कंपनीच्या अग्नीशमन विभागाने मागील वर्षात जळगाव आणि परिसरातील लागलेल्या आगीच्या वेळी पुरविलेल्या सेवेविषयी सहका-यांना माहिती देण्यात आली. तसेच कंपनीतील सर्व सुरक्षा रक्षकांचा सत्कार करण्यात आला. सप्ताहाभराच्या नियोजित कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.

IMG_1732
अग्नीशमन विभागातील आग विझवणा-या साहित्याचे पूजन करताना कंपनीचे वरिष्ठ अधिकारी सुनिल देशपांडे, सुरक्षा विभागाचे प्रमुख डी. जे. शितोळे व सुरक्षा विभागातील सहकारी.
Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s