माणसात राहून माणसासारखे आचरण करणे ही मनुष्यत्त्वाची मुख्य खूण- डॉ. बिपीन दोशी

महावीरांचा कोणताच पंथ नव्हता, ते जैन धर्माचे प्रखर प्रचारक होते. आपण सुखी कसे राहायचे हा मूलमंत्र त्यांनी समस्त मानवी समाजाला दिला. क्रोध, मान, माया, लोभ हे चार दुर्गुण आपले सुख हिरावून घेत असतात. आपण जन्माला येताना जसे काही सोबत आणत नाहीत तसे जातानाही रित्या हातीच जावे लागते हे माहिती असूनदेखील आपण स्वार्थ मोहापायी आयुष्याचे सुंदर क्षण जगणे विसरुन माया, मोहाच्या जाळ्यात फसतो. जे आपले नाही, जे आपले होणार नाही त्यासाठी आपण करीत असलेला आटापिटा स्वतःलाच दुःख देणारा असल्याचे मत प्रा. डॉ. बिपीनजी दोशी यांनी व्यक्त केले. सकल जैन श्री संघ जळगावच्यावतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी व्यासपिठावर माजी मंत्री सुरेशदादा जैन, ईश्वरलालजी जैन, रतनलालजी बाफना, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, कनकमलजी राका, सकल जैन श्री संघांचे अध्यक्ष दलीचंदजी चोरडिया, सुगनचंदजी राका, मनोजजी सुराणा, राजेशजी जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

मी जगभर फिरतो, सहकारभाव नजरेस पडतो, परंतु समन्वय दिसत नाही. जळगावला मात्र या दोन्ही गोष्टींचा प्रत्यय आला. समाजातील उत्तम संस्कारांचे दर्शन येथे घडले. मनुष्यभव, मनुष्यत्व, श्रद्धा, आचरण अशा समृद्ध देण आपल्याला लाभल्या आहेत यामुळे आपण खूपच भाग्यवान आहोत. या सर्व देण आपल्याकडे असताना मात्र आपण त्याचा किती सकारात्मक उपयोग करतो याचे आत्मपरिक्षणदेखील करणे गरजेचे आहे. माणसात राहून माणसासारखे आचरण करणे ही मनुष्यत्त्वाची मुख्य खूण असल्याचेही डॉ. दोशी यांनी सांगितले.

महावीरांनी क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा मंत्र आपल्याला दिला. मान, अहंकार सोडणे कठीण असते त्यासाठी आत्मपरिक्षण करण्याचा मंत्रही आपणास मिळाला आहे. मैत्री फक्त मानवी समाजापर्यंत सीमित न ठेवता मैत्रीची ही नाळ भूतलावरील समस्त सजीव सृष्टिशी जोडण्याचा मंत्र महावीरांनी आपल्याला दिला आहे. तसेच समाजातील आर्थिक, दुर्बल घटकांप्रती सेवाभावी वृत्ती ठेवत त्यासाठी कृतीशील होऊन करुणाभाव जोपासणे हा मंत्रदेखील आचरणात आणणे गरजेचे आहे. महावीरांचे विचार प्रत्यक्षात अंगिकारुन कृतीशील होण्याचे आवाहनही डॉ. बिपीन दोशी यांनी यावेळी केले.

सकल जैन श्री संघांचे अध्यक्ष दलीचंदजी चोरडिया यांनी प्रास्ताविकपर भाषणात सांगितले की, भवरलालजी जैन, सुरेशदादा जैन, ईश्वराल जैन तसेच समाजातील अनेकांच्या दूरदृष्टितून चाळीस वर्षांपूर्वी या संघाची स्थापना झाली. या संघामुळे समाजातील प्रत्येक घटकाशी नाळ जुळली गेली आहे. समाजातील युवकांच्या सहभागामुळे या संघाने देशभरात एक वेगळा सकल जैन श्री संघ म्हणून ओळख निर्माण केली आहे.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अशोक जैन यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, समाजात चांगल्या विचारांचा अवलंब होणे ही चांगल्या समाजाची नांदी असते. महावीरांचे विचार कृतीरुपात आणण्याची आजही गरज आहे. समाजातील सर्वांनी एकत्र येऊन एकसंघ होण्याची आवश्यकता आहे. सकल जैन एकतामध्ये आदरणीय भवरलालजी जैन यांचा मोठा विश्वास होता. महावीरांच्या विचारांना अंगीकारुन त्यांनी कृतीची जोड दिली. समाजातील घटक एकसंघ होण्यासाठी, समाजातील घडामोडींची सविस्तर माहिती होण्यासाठी ‘सकल सेतू’ नावाच्या ॲपचा शुभारंभ करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

_DSC6414
महावीर जयंतीनिमित्त भव्य वरघोडा शोभायात्रेत सहभागी जैन समाजबांधव
_DSC6456
ध्वजवंदनप्रसंगी प्रा. डॉ. बिपीनजी दोशी. दलीचंदजी चोरडिया, माजी मंत्री सुरेशदादा जैन, ईश्वरलालजी जैन, रतनलालजी बाफना, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व मान्यवर
_DSC6465
महावीरांचे विचार आचरणात आणण्यासंदर्भात शपथ घेतानाचे छायाचित्र.
_DSC6500
महावीर जन्मकल्याणक महोत्सवात मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. बिपीनजी दोशी. डावीकडून मनोजजी सुराणा, राजेशजी जैन, कनकमलजी राका, ईश्वरलालजी जैन, सकल जैन श्री संघांचे अध्यक्ष दलीचंदजी चोरडिया, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, रतनलालजी बाफना, सुगनचंदजी राका व मान्यवर
_DSC6523
महावीर जयंतीनिमित्त रक्तदान करताना जैन समाज बांधव.

महोत्सवाचे अध्यक्ष व माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या मनोगतातून समाजाला संदेश दिला. ते म्हणाले, आपण जैन धर्मात जन्माला आलो हे आपले भाग्यच आहे. यानिमित्ताने महावीरांचे विचार अंतरंगात भिनले आहेत. महावीरांचे विचार ज्यांनी अंगिकारले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले आहे. महावीरांच्या विचारांना कृतीची जोड देऊन आपल्या जीवनात आनंद, चैतन्य निर्माण करा, सोबतच सामाजिक भाव अंगिकारा. समाजातील प्रत्येक घटकाने एकसंघतेवर भर देणे आवश्यक  असल्याचे त्यांनी सांगितले. समाजात पूर्वापारपासून चालत आलेल्या काही प्रथांबाबत काळाची गरज म्हणून नियमावली करण्यात आली असून लग्नसोहळ्यात ठेवण्यात येणारे अवास्तव पदार्थ कमी करण्यात आले आहेत. यामुळे अन्नाची होणारी नासाडी तसेच आर्थिक नुकसान थांबणार आहे. सामाजिक हित जोपासण्यासाठी सर्व समाज बांधवांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहनही सुरेशदादा जैन यांनी यावेळी केले. पुढील वर्षी संपन्न होणाऱ्या महावीर जयंती महोत्सवात नवकारसी भोजनाची जबाबदारी गिरीधारीलालजी ओसवाल यांनी घेतली. तीन दिवस चाललेल्या या महोत्सवात आयोजित विविध स्पर्धांमध्ये समाज महिला मंडळ, युवा, बालमंडळ अशा अनेकविध मंडळांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नितीन चोपडा व अपूर्वा राका यांनी केले.

क्षणचित्र:

महावीर जयंतीनिमित्त भव्य वरघोडा शोभायात्रेचे आयोजन.

जैन इरिगेशनच्यावतीने व वा वाचनालय परिसरात महाप्रसाद तसेच शोभायात्रेत ज्यूस वा पाणीवाटप.

जैन इरिगेशनच्यावतीने साकारण्यात आलेला जैन अहिंसा भव्य रथावर महावीरांच्या विचारधनातून जनजागृती.

शोभायात्रा मार्गात घर व प्रतिष्ठान सजावट तसेच भगवान महावीर संदेश सजावट स्पर्धेचे आयोजन.

जैन नवयुवक मंडळाच्यावतीने रक्तदान शिबीराचे आयोजन.

स्वाध्याय महिला मंडळ व सुशील बहु मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा सरकारी रुग्णालय, वृद्धाश्रम, अपंग आश्रम, रिमांड होम आदी ठिकाणी बिस्कीट व फळ वाटप.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s